मराठी उखाणे 19 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मराठी उखाणे 19 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

बुधवार, 19 अक्टूबर 2011

मराठी उखाणे 19

 

------रावांच्या भोंवती पंगत पडली मित्रांची.
शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
------रावांची मी आवडती कांता.
गोकुळांत श्रीकृष्ण वाजवतो पावा,
------रावांचं नांव घेतें आशीर्वाद असावा.
यमुनेच्या तीरीं कृष्ण क्रीडा करी,
------रावांचं नांव घेतें चव्हाणांच्या घरीं.
बारीक बांगडी भरतें किंमतीनं,
------रावांच्या सहवासांत दिवस जातात गंमतीनं.
मेनकेच्या पोटीं जन्मली शकुंतला,
------रावांचे गुण पाहून अर्पण केली मला.
गणपती हरिश्चंद्र सुटला वारा, रास करा, गाडया भरा,
------राव तुम्ही पेवाला जागा करा.
एक शेर दुधाचा पावशेर खवा,
------रावांचं नांव घेतें लक्षांत ठेवा.
चंद्रभागेंत बुडवितें चांदीचा घडा,
------रावांनीं दिला मला सातारचा पेढा.
अनारसे काढते तळून, लाडू ठेवते वळून, आईबापांच्या इथं राहिलें होतें खेळून
------x राव आतां घ्या संभाळून.
चहा केला निवून गेला, पेरु देतें चिरुन, केळीची काढतें साल,
------रावांच्या जिवावर कुंकूं लेतें लाल.
कांचेच्या बरणींत दुहेरी बर्फी,
------रावांचं नांव घेतें दुहीतर्फी.
उत्तरदाणी, गुलाबदाणी, चौफुला केला नवा,
------राव कोल्हापूरची दाखवा मला हवा.
लहानपणीं तुळशीला घालीत होतें पळी पळी पाणी म्हणून आतां झालें
------रावांची राणी.
काळी चंद्रकळा नेसतें कसून,
------रावांनीं दिलेले पेढे खातें हसून.
काळी चंद्रकळा तिला कस्तुरी चांदणी,
------रावांचं नांव घेतें मोहित्यांची राणी.
मागं पुढं गोठ पाटल्या, मधीं लेतें छंद,
------रावांचं नांव घेतें गलबला करा बंद.
साताराच्या सडकेनं घोडयांची लाईन,
------रावांचं नांव घेतें भावांची बहीण.
द्राक्षांच्या वेलीला त्रिकोणी पान, बाबा हिंडले हिंदुस्थान,
तेव्हां सांपडले ------राव छान.
भाग्य उजळलं पत्नीाचं, अंगठीवर चमकला हिरा, आकाशांत चमकला तारा,
------रावांचं नांव घेतें हाच माझा भाग्योदय खरा.
नव्या संसारांत स्त्री असावी हौशी,
------रावांचं नांव घेतें मंगलकार्या दिवशीं.
एकादशीच्या दिवशीं विठ्ठेलाला वहातात तुळशी,
------रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या दिवशीं.
अंबाबाईच्या देवळांत सोन्याची आळी,

fly