मुंबईतून लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मुंबईतून लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 19 मई 2013

आरसा

आरसा
मुंबईतून
गड्या आपुला गाव बरा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला पोचलेल्या आमदारांनी हलक्‍या आवाजात अशोकराव कुठे आहेत, याची चौकशी सुरू केली. विलासरावांचे पद गेल्यानंतर ते अधिवेशनात अधुनमधून येऊन बसत. मराठवाड्याची उज्ज्वल परंपरा पाळून अशोकरावही तसेच अधेमधे हजेरी लावतील, असे मंडळींना वाटे पण अशोकराव काही दिसेनात. हायकमांडची मर्जी खप्पा झालेल्या अशोकरावांची चौकशी उघडपणे करणेही धोकादायक. मग लॉयलिस्ट आमदार आडून चौकशी सुरू करत. विरोधी बाकांवरचे आमदार मात्र छद्मीपणे ""अशोकराव भेटतील का जी आपल्याले,'' असे विचारीत. चौकशी करता करता पहिला आठवडा सरला पण अशोकरावांचे दर्शन कुणालाही झाले नाही. राजकारणातल्या माणसाने मनाला इतके लावून घेणे बरे नाही, अशी कुजबूज सुरू झाली. चर्चगेटजवळ त्यांनी ऑफिस थाटले आहे, नावामागचे रावही आता काढून टाकले आहे, अशीही माहिती बाहेर आली पण अशोकराव मात्र दिसेनात. कॉंग्रेसमधे असेच असते. ""गड्या आपुला पक्ष बरा,'' अशी कबुली शिवसेना-भाजपवाले देऊ लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनीही खासगीत एकमेकांना हेच सांगितले.
Read More »

ते म्हणतात1
दयेमुळे दुर्बलांना जग मृदू भासते आणि पराक्रमी माणसांना ते उदात्त वाटते. एडविन अरनॉल्ड राष्ट्रात ज्या प्रकारचे पुढारी निपजतात, त्या मानाने राष्ट्राची स्थिती सुधारते किंवा बिघडते. लोकमान्य टिळक लढाई केलीच, तर ती शांततेसाठी करावी. ऍरिस्टॉटल हृदयात कायम प्रेमाचा झरा असू द्या. तो नसेल, तर ऊनाअभावी सुकलेल्या फुलांसारखी अवस्था होईल. जो नेहमी पुढे जाण्याची धडपड करतो, तोच जिंकतो. डेल कार्नेजी भूतकाळात रमू नका, भविष्याची स्वप्ने रंगवू नका, सध्याच्या चालू घटनांवर तुमचे मन एकाग्र ठेवा. गौतम बुद्ध जो कुणी आत्मप्रौढी करेल, त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील, त्याला प्रतिष्ठा लाभेल. येशू ख्रिस्त आलेली संधी व वेळ तत्काळ आणि घट्ट पकडून ठेवण्यातच शहाणपण असते. लॅटिन सुविचार
Read More »

पोस्टातील योजना - भक्कम, सुरक्षित पर्याय
व्याजदरात चढ-उतार होणाऱ्या जमान्यात आणि गुंतवणुकीच्या अस्थिर वातावरणात टपाल खात्याच्या, म्हणजेच पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अल्पबचत योजना भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खेड्यापाड्यापर्यंत पोचलेले पोस्टाचे जाळे आणि गुंतवणूकदारांचा विश्‍वास, यामुळे या योजना कायम लोकप्रिय ठरलेल्या दिसतात. ट पाल खात्याने केवळ टपाल साहित्याच्या विक्रीपुरतेच आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता बॅंकेसारखी सेवा द्यावी आणि हे खाते व्यवसायाभिमुख बनवावे, अशी ब्रिटिशांची योजना होती. त्यातूनच अल्पबचत खात्याचा जन्म झाला. स्वातंत्र्यानंतर त्याचे कार्यक्षेत्र विस्तारत गेले आणि आता तर त्याने चांगलेच बाळसे धरले आहे. आर्थिक क्षेत्रात गुंतवणूकदारांना एक भक्कम, सुरक्षित व खात्रीचा पर्याय यामुळे लाभला आहे. बॅंकांमधील व्याजदरात सतत चढ-उतार होत असले, तरी या योजनांचा व्याजदर दीर्घ काळ तग धरून आहे. साधा, सोपा फॉर्म, स्थानिक पातळीवरच सर्व व्यवहार, नामांकनाची सोय, अशा सोयी-सुविधांमुळे अल्पबचतीच्या योजना स्वतःचे वेगळे स्थान राखून आहेत.
Read More »

फ.. फ... फंडाचा
गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर असतात पण सुरक्षितता, परतावा तसेच सोयीची असणारी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करताना फारसे कुणी दिसत नाही. परदेशात 45 ते 50 टक्के गुंतवणूक म्युच्युअल फंडात होते. भारतात तेच प्रमाण केवळ 3 टक्के आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड (एम. एफ.) हा एक ट्रस्ट आहे. कोणतीही व्यक्ती त्यात गुंतवणूक करू शकते. त्यातून जमलेला पैसा प्रबंधकांमार्फत विविध ठिकाणी गुंतवला जातो. याचे कार्यक्षेत्र प्रत्येक योजनेनुसार शेअर्सपासून डिबेंचर्सपर्यंत असते. या गुंतवणुकीमधून मिळालेला नफा आणि मुद्दलाच्या किमतीमधील वाढ सर्व भागधारकांमध्ये त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात विभागली जाते. यामुळे म्युच्युअल फंड सामान्यांसाठी गुंतवणुकीचा अत्यंत योग्य पर्याय आहे. म्युच्युअल फंड इतर गुंतवणुकीच्या साधनांच्या तुलनेत कमी खर्चात गुंतवणुकीची संधी देतो.
Read More »

सोने पे सुहागा
भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी गुंतवणूक करणे आता गरजेचे झाले आहे. त्यासाठी सोन्यातील गुंतवणूक हा नवा पर्याय उपलब्ध आहे. सुरक्षेची हमी आणि नफ्याची खात्री यामुळे सोन्याच्या दागिने करणाऱ्यांसोबतच प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. जुने ते सोने असा एक वाक्‌प्रचार आहे. यावरून आपल्या देशात सोन्याला असलेले महत्त्व अधोरेखित होते. सोन्याचे दागिने हा तर बायकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे कोणताही सणसमारंभ असेल, तर घरात सोन्याचा दागिना घेतला जातो. अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणून सोने घेऊन ठेवण्याची पद्धत भारतात खूप पूर्वीपासूनच रूढ आहे. त्यामुळे आपल्या देशात सोन्याला प्रचंड मागणी असते. खरे तर भारतामध्ये सोन्याचे उत्पादन होत नाही मात्र जगात उत्पादित होणाऱ्या सोन्याला पंचवीस टक्के मागणी भारतातून होते. त्यामुळे भारत सोन्याची निव्वळ आयात करतो. आजकाल जुन्या पद्धतीचे दागिने कोणाला आवडत नाहीत. पूर्वीचे दागिने मोडून पुन्हा नवे करायचे झाले, तर थोडेफार पैसे घालावे लागतात. त्यामुळेच आता सोन्यात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
Read More »

देओरकरांच्या कस्टडीत दोन दिवसांची वाढ
देओरकरांच्या कस्टडीत दोन दिवसांची वाढ नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे पूर्व अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहाय्यक शेखर देओरकर यांची कस्टडी दोन दिवसांनी वाढवली आहे. मागच्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये करोडो रुपयांच्या गैरव्यवहारात सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली गेली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नसल्याने आणि आरोपी अन्वेषण विभागाला सहकार्य करत नसल्याने त्याच्या कस्टडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. तो ग्राह्य धरून कोर्टाने कस्टडीत वाढ करण्याचा निर्णय दिला. या बाबतीत सीबीआय परीक्षक ओ. पी. सैनी म्हणाले, की या गैरव्यवहाराची पार्श्‍वभूमी आणि आरोपांची वैधता तपासून बघण्यासाठी कस्टडी वाढ करणे गरजेचे आहे. या प्रकरणी पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले असून, मिळालेल्या माहितीबाबत गुप्तता राखली गेली आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी देओरकरांना १९ फेब्रुवारीपर्यंत कस्टडी देण्यात येत आहे.
Read More »

देओरकरांच्या कस्टडीत दोन दिवसांची वाढ
नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे पूर्व अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहाय्यक शेखर देओरकर यांची कस्टडी दोन दिवसांनी वाढवली आहे. मागच्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये करोडो रुपयांच्या गैरव्यवहारात सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली गेली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नसल्याने आणि आरोपी अन्वेषण विभागाला सहकार्य करत नसल्याने त्याच्या कस्टडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. तो ग्राह्य धरून कोर्टाने कस्टडीत वाढ करण्याचा निर्णय दिला. या बाबतीत सीबीआय परीक्षक ओ. पी. सैनी म्हणाले, की या गैरव्यवहाराची पार्श्‍वभूमी आणि आरोपांची वैधता तपासून बघण्यासाठी कस्टडी वाढ करणे गरजेचे आहे. या प्रकरणी पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले असून, मिळालेल्या माहितीबाबत गुप्तता राखली गेली आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी देओरकरांना १९ फेब्रुवारीपर्यंत कस्टडी देण्यात येत आहे.
Read More »

नोंद - शुभ्र काही...
शुभ्र काही... आ पल्या आयुष्यात रंगांना किती महत्त्व असते, हे वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. प्रत्येक रंगाचे महत्त्व वेगळे. मात्र, या सगळ्या रंगांना उठाव मिळतो पांढऱ्या रंगामुळे! रंगांच्या दुनियेतील मंडळींना या रंगाचे माहात्म्य माहिती आहेच आपणही रोज वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातल्यानंतर जेव्हा पांढऱ्या कपड्यांत येतो, तेव्हा व्यक्तिमत्त्वात फरक पडल्याचे जाणवते. हीच शुभ्रतेची जादू! अमेरिकेतही सध्या पांढऱ्या रंगाची चर्चा आहे. रंगांची इतकी विविधता उपलब्ध असतानाही कार घेताना सर्वसाधारणपणे पांढऱ्या रंगालाच अजूनही प्राधान्य मिळते आहे, असे तेथे झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. 2007पर्यंत तेथे सिल्व्हर रंग लोकप्रिय होता पण त्यानंतर आतापर्यंत पांढऱ्या रंगाने सर्वच रंगांवर मात केल्याचे या वार्षिक सर्वेक्षणात म्हटले आहे. याचे कारण काय असावे, यासाठी सर्वेक्षण करणाऱ्यांनी काही तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यात प्रामुख्याने पाच निष्कर्ष निघाले. 1. आर्थिक कारण ः पांढऱ्या रंगाच्या निवडीचा संबंध अनेक तज्ज्ञांनी आर्थिक मंदीशी जोडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणताही ग्राहक व्यावहारिक विचार करतो.
Read More »

समुद्रात बोगदा!
समुद्रात बोगदा! "क्‍वीन्स नेकलेस', "मुंबईचा मुकुटमणी' आणि "नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारकादळे जणू नगरात' अशा पंक्ती ज्या परिसरावर कुसुमाग्रजांनी लिहिल्या त्या दिमाखदार मरिन ड्राईव्हचा तोरा येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. वांद्य्रापासून येणाऱ्या "सी लिंक'ला जोडणारा एक सामुद्री रस्ता नेपियन सी' रस्त्याच्या परिसरात उभारला जाणार आहे. या रस्त्याचे टोक म्हणून मरिन ड्राईव्ह रुंदावण्याची योजना आहे. "मरिन ड्राईव्ह'वरून एकाच वेळी दोन्ही बाजूंनी चार वाहने सध्या जाऊ-येऊ शकतात. मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढणाऱ्या महानगरातील वाहनांना चार लेनही पुरेशा पडत नाहीत. दोन्हीकडे सहा वाहने सामावू शकतील अशा रस्त्याचे डिझाईन आता तयार केले जात आहे. एक मोठा बोगदा वरळीच्या आसपास सागरात कोरला जाईल. सागराच्या पोटातून बाहेर पडणाऱ्यांसाठी सध्या रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दीर्घांवर वाहने धावू द्यायची, की मरिन ड्राईव्हला समांतर असणारे रस्ते समुद्रात उभारायचे यावर खल सुरू आहे. 1400 कोटींची ही योजना प्रत्यक्षात आली, तर ते बांधकाम क्षेत्रातील एक आश्‍चर्य ठरेल.
Read More »

वादळ वेडं घुसतं तेव्हा...!
धांगडधिंगा चित्रपट, गाणी नकोशी वाटतात...सारखं काहीतरी हळवं बोलत राहावं...सूर्यास्त, मारवा, एकटेपणा, स्वप्न, सोबत, गझल हे शब्द बोलण्यात पुनःपुन्हा यायला लागतात. तिनं हळवं व्हावं आणि आपण तिला सावरावं हा प्रसंग कितीही वेळा घडला तरी कंटाळवाणा वाटत नाही...सगळ्या चित्रपटात, गाण्यात अगदी "हम बने, तुम बने इक दूजे के लिए...' ही ओळसुद्धा कशी आपल्यासाठीच आहे, असं वाटायला लागतं... ए के दिवशी सकाळी अचानक चि. पप्पू त्याच्या बाबांना खड्या आवाजात बजावतो, "बाबा, मला मित्र-मैत्रिणींसमोर पप्पू म्हणू नका हो, विक्रांत म्हणा...हवं तर विकी म्हणा...' बाबा म्हणतात, "का रे? पप्पू किती छान वाटतं...!' "झश्रशरीश हो बाबा, मग मृण्मयी पण मला पप्पू म्हणते...' बाबा समजून घेतात की, चि. पप्पू यांना वयाच्या विसाव्या वर्षी अचानक क्रिकेटपेक्षाही, शाळेतल्या मित्रांपेक्षाही खूप खूप असं महत्त्वाचं कुणीतरी भेटलंय... हे झालं अगदी छोटंसं प्राथमिक लक्षण...
Read More »



fly