वजन कमी करण्यासाठी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
वजन कमी करण्यासाठी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 18 सितंबर 2011

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी कोणत्याही जडीबुटीची गरज नसते. रोजच्या घरगुती पदार्थांतूनसुद्धा आपण वजनावर नियंत्रण ठेवू शकतो. साधारणत: या पदार्थांकडे वजन कमी करू इच्छिणारे लोक दुर्लक्ष करतात. आपण जेवणाची मात्रा कमी ठेवली तर वजन कमी होईल, असे म्हटले जाते. जेवणात हे पदार्थ ठेवा आणि ते पदार्थ ठेवू नका याची यादीही दिली जाते. पण असे काही नसते. वजन कमी करण्यासाठी आपल्या घरातलेच काही पदार्थ आपली मदत करू शकतात. या पदार्थांच्या सेवनामुळे चरबी जास्त वाढते. परिणामी वजन वाढते, असे समजले जाते. वजन कमी करण्यात कोणते पदार्थ हातभार लावतात हे जाणून घेऊ या.


रसाळ फळे

मोसंबी आणि स्ट्रॉबेरी ही फळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. या यादीमध्ये टोमॅटोचा प्रथम क्रमांक येईल.

असा होतो फायदा

रसाळ फळामध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे चरबी कमी करणार्‍या ‘कार्निटाइन’ची उत्पत्ती करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी पिघळते. अशा सोप्या उपायांनी वजन कमी करणे शक्य आहे.


काळी कॉफी

संशोधकांच्या मते, साखर आणि दूध नसलेल्या कॉफीनेसुद्धा वजन कमी होऊ शकते.

सुकामेव्याचे महत्त्व

यामध्ये जास्त कॅलरीज असतात. आहारतज्ज्ञांच्या मते, आहारात थोड्या प्रमाणात सुक्यामेव्याचा समावेश केला जाऊ शकतो. यामुळे वजन कमी करायला हातभार लागू शकतो.

असा होतो फायदा

यामधील प्रोटिन आणि फायबर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. बदाम आणि अक्रोडमुळे जास्त फायदा होतो. यामुळे शरीरात असलेली स्निग्धता कमी करतात.

अंडी

चव, पोषण आणि तृप्ती हे सर्व एकाच पदार्थामधून जर मिळवायचे असेल अंडी खावीत. वजन कमी करणार्‍यांनी न्याहारीत रोज एक अंडे घ्यायला हवे.

असा होतो फायदा

प्रोटिनयुक्त असल्याने याला पचण्यास वेळ लागतो. अंडी खाल्ल्यानंतर भूक कमी लागते. एका अंड्यात 75 टक्क्यांपर्यंत कॅलरीज असतात. अतिरिकत चरबी घटवण्यासाठी अंड्याला उकळूनसुद्धा खाता येऊ शकते.

दुधाचे पदार्थ

खाण्यापिण्याचे पथ्य पाळणारे असंख्य लोक दुधाच्या प्रत्येक पदार्थाकडे दुर्लक्ष करतात; मात्र पणीरसारख्या पदार्थांचे सेवन केले तर त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागते.

असा होतो फायदा

या पदार्थात जास्त कॅल्शियम असतो. संशोधकांच्या मते, चरबी कमी करण्यासाठी हे पदार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिवाय अशा पदार्थांपासून भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.

बटाटे

भाजलेले आणि उकळलेले बटाटे वजन कमी करण्याच्या अभियानाचा हिस्सा बनू शकतात, असे हल्ली झालेल्या एका शोधातून समोर आले आहे.

असा होतो फायदा

उकडलेले आणि भाजलेले बटाटे पाणी शोषून घेऊन आंतड्यामध्ये फुलतात. यामुळे पिष्टमय पदार्थ तयार होतो आणि तो मोठय़ा आतड्यात डायटरी फायबरची भूमिका बजावतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


वरील सर्व मते डॉ. अनिलभौ यांची वेयक्तीक मते आहेत. आपण आपल्या तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

fly