वाचक पत्रे लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
वाचक पत्रे लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 19 मई 2013

वाचक पत्रे

वाचक लिहितात
वाचक पत्रे
साप्ताहिकाचे नवे स्वरूप आकर्षक "सकाळ साप्ताहिका'चे नवे स्वरूप हे अधिक नक्कीच माहितीपूर्ण व आकर्षक आहे. जुना अंक फास्ट फूड सारखा आणि जुना अंक पारंपरिक थाळी सारखा वाटतो. एखाद्या कॉफी टेबल बुक सारखा नवीन अंक पटकन वाचून होतो. त्यामुळे कमी वेळात ज्ञानात&nbsp जास्त&nbsp भर पडते. काळानुसार बदल हा हवाच आणि तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे. - मीनल केळकर आडवाटेवरच्या ठिकाणांचीही माहिती द्यावी कमीत कमी वयात उत्तुंग झेप घेणारी भक्ती कुलकर्णीची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहे. तिने ग्रॅण्ड मास्टरपर्यंतचा प्रवास 20 ऑगस्टच्या सकाळ साप्ताहिकात सविस्तरपणे मांडला आहे. "सकाळ साप्ताहिका'च्या नव्या स्वरूपात तरुणांना प्रेरणा मिळेल, असे विषय गेल्या काही दिवसांमध्ये वाचायला मिळत आहे. यंग अचीव्हर्स या सदरात तरुणांच्या मनाचा ठाव घेणार संदीप खरे यांची कवी म्हणून झालेली वाटचालसुद्धा नेमक्‍या शब्दांत मांडण्यात आली होती. वेगवेगळे विषय साप्ताहिकात अत्यंत मुद्देसूद येत आहेत, त्यामुळे विषय चटकन वाचून होतो. पर्यटन हे सदर चांगले आहे मात्र अनेकदा माहीत असलेलीच ठिकाणे त्यात वाचायला मिळतात.
Read More »

9 ते 15 जुलै
मेष - आत्मिक बळ वाढेल. व्यवसायात अवघड कामात यश मिळेल. महत्त्वाकांक्षी योजना सफल होतील. नवचैतन्य सळसळेल. नोकरीत कमी श्रमात यश मिळवण्याचा प्रयत्न कराल. जोडधंद्यातून कामाई होईल. महिलांना खरेदीचा आनंद मिळेल. वृषभ- "मनी वसे ते स्वप्नी दिसे' या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात बराच काळ मनात रेंगाळणारे बेत साकार करण्याची संधी मिळेल. दूरदृष्टीने केलेली गुंतवणूक उपयोगी पडेल. नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल. वरिष्ठ व सहकारी पाठिंबा देतील. कुटुंबाला वेळ द्याल. मिथुन - अस्वस्थता कमी होऊन तुम्ही पुन्हा तुमच्या कार्यक्षेत्राकडे लक्ष देऊ शकाल. व्यवसायात बरेचसे प्रश्‍न सुटतील. स्पर्धकांवर मात करण्यासाठी आखलेली योजना फलदायी ठरेल. पैशाची चिंता मिटेल. परदेशव्यवहारांना चालना मिळेल. मोठ्यांचा सल्ला निर्णय घेताना उपयोगी पडेल. कर्क - मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. कार्यपद्धतीत बदल करून व्यावसायिक प्रगती साधाल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. प्रवास घडेल. प्रकृती सांभाळून कामे करा. शुभकार्ये ठरतील. खर्च आटोक्‍यात ठेवा. महिलांनी विनाकारण दगदग करू नये. सिंह - सुटकेचा निःश्‍वास टाकाल.
Read More »

वाचक लिहितात
प्रबोधन आणि परिवर्तन "सकाळ साप्ताहिक'ने गेल्या चोवीस वर्षांत एक उत्तम नवी पिढी घडवली आहे आणि यावर्षी हे साप्ताहिक रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असताना नवा उत्साह, नवी उमेद आणि प्रबोधन व परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. एक संस्कारक्षम साप्ताहिक म्हणून याची गणना प्रथम क्रमांकावर होते. वाचकांना उत्तम आणि प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून "सकाळ साप्ताहिक'ने वाचकवर्गाला प्रगल्भ केले आहे. ज्ञानाचा अमाप खजिना, देशविदेशांतील घडामोडी, स्त्रियांचे प्रश्‍न हे तर यातून जपले आहेच पण वेळोवेळी विविध विशेषांक काढून वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. त्यानुसार "सकाळ साप्ताहिक'ने गेल्या काही आठवड्यांपासून सतत नवे आणि आगळेवेगळे देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. विकेंडसोबतच साप्ताहिकचीसुद्धा आवर्जून वाट पाहिली जाते. हा अंक संपूर्ण कुटुंबासाठी असतो. आज वेळेचे गणित मांडताना कमी वेळात जास्तीत जास्त मजकूर देताना तो वाचनीयसुद्धा करण्याचे काम साप्ताहिकाने केले आहे. या अंकातील विषय सर्व वयोगटातील वाचकांना आवडतील असेच आहेत.
Read More »

वाचक लिहितात
पालक-मुलांमध्ये योग्य संवाद हवा&nbsp "सकाळ साप्ताहिक'मधील "मुलांचे करिअर आणि पालकत्व' हा लेख वाचला. अत्यंत योग्य वेळी व योग्य प्रसंगी हा लेख प्रकाशित करून पालक व मुले या दोघांनाही योग्य व विधायक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्नही चांगला आहे. दहावी, बारावीचे निकाल लागले, की अमुक अमुक शाखेला प्रवेश घेण्याचा होरा पालक मुलांच्यामागे लावतात. थोडक्‍यात, पालक आपल्या इच्छा-आकांक्षांचे ओझे मुलांवर लादतात. या सततच्या ओझ्यामुळे मुले अपयशी ठरतात व त्यांच्या भविष्याचे वाटोळे होऊ शकते. पालकांनी नववी-दहावीपासूनच मुलांसाठी योग्य व प्रामाणिकपणे संवाद साधून त्यांच्या मनांचा कल कुणीकडे आहे हे जाणून घ्यायला हवे. करिअर निवडताना मार्गदर्शन करणारा असा हा लेख आहे. याच अंकातील "देशातील सर्वांत मोठे ग्रीनहाऊस' या लेखापासून शेतकरी वर्ग निश्‍चितच प्रेरणा घेऊन व प्रगती साधेल, असे वाटते. - धोंडिरामसिंह राजपूत, औरंगाबाद करिअर विशेषांक आवडला "सकाळ साप्ताहिक'चा "करिअर विशेषांक' हा वाचकांच्या दृष्टीने खूपच उपयुक्त व महत्त्वाचा आहे. माझ्या मुलीने यंदा दहावीची परीक्षा दिली असल्याने पुढे काय हा प्रश्‍न आम्हालाही सतावत होता.
Read More »

वाचक लिहितात
स्फूर्तिदायक लेख मी एक शेतकरी असून "सकाळ साप्ताहिक'चा पूर्वीपासूनचा वाचक आहे. हा अंक वाचनीय आणि माहितीपूर्ण असतो. अंकाचे मुखपृष्ठ आणि आतील छायाचित्रेही खूपच सुंदर असतात. अंकाचे स्वरूप आकर्षक असून माहितीसुद्धा चांगली असते. "सकाळ साप्ताहिक'च्या 4 जूनच्या अंकातील माहिती स्फूर्तिदायक वाटली. या अंकातील "दुभंगून जाता जाता' व "कुठे होतो, कुठे आलो' हे लेख खूपच माहितीपूर्ण आहेत. असेच दर्जेदार माहितीचे लेख अंकात समाविष्ट करावेत. यामुळे वाचकांस प्रेरणा व स्फूर्ती मिळेल. पैसे गुंतवणुकीबाबतही अंकात माहिती दिली आहे. एकंदरीतच साप्ताहिकाचा संपूर्ण अंक दर्जेदार आहे. माधवराव पाटील, जळगाव पांडुरंग पोलेंचा लेख भावला "सकाळ साप्ताहिक'चे नवे रूप चांगले पाहिले. 28 मेच्या अंकातील ग्राफिक स्टोरी, आणि अखेर तो जिंकलाच, विनोद ही सदरे चांगली वाटली. पांडुरंग पोले यांनी शेतीबरोबरच अभ्यास करून आयएएस अधिकारी होण्यापर्यंत जो प्रवास केला, त्याचे यथार्थ शब्दांत चित्रण केले असून ते युवा पिढीला मार्गदर्शक आहे. शेती कामांची सवय आणि माहिती असल्याने त्यांनी कृषी अभ्यासक्रम सहज हाताळला.
Read More »

वाचक लिहितात
वाचकांच्या आवडी-निवडींना अंकात प्राधान्य "सकाळ साप्ताहिक'चा 28 मे 2011 चा अंक वाचनात आला. बदलत्या काळाबरोबर वाचकांच्या आवडी-निवडीला प्राधान्य देऊन हे बदल केले आहेत. फेकून द्या उणिवा, कशी ओळखाल खोटी नोट, बुकशेल्फ ही सदरे फारच आवडली. वाचनसंस्कृतीच्या वृद्धीसाठी ती निश्‍चितच पोषक आहेत मात्र ज्येष्ठांसाठी एखादे सदर सुरू केल्यास बरे होईल. अंक व अंकातील बदल उपयुक्त आहेत. - श. मा. गांधी, डोंबिवली&nbsp बदल चांगले नव्या-जुन्याचा समतोल हवा बदललेल्या स्वरूपातील "सकाळ साप्ताहिक' मिळाले. पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ मी सकाळचा वर्गणीदार आहे. त्यामुळे त्यात झालेले अनेक बदल मी बघितलेले आहेत. आता झालेले काही बदल निश्‍चितच चांगले आहेत. विषयाचा नेमकेपणा, मोहक रूप, मुद्देसूद माहिती या गोष्टींना प्राधान्य देताना अंकाचे साहित्यिक स्वरूप नाहीसे होऊन त्याला नॉलेजच्या पुस्तकाचे स्वरूप आले आहे, असे वाटते. थोडक्‍यात, पोटभर चौरस आहाराऐवजी "फास्टफूड' झाले आहे. मासिक/साप्ताहिक म्हणजे कथा, कविता, पाककृती, भविष्य असे स्वरूप असणे नक्की चुकीचे आहे आणि सकाळ तसा कधीच नव्हता.
Read More »

वाचक लिहितात
वाचकपत्रे नवा अंक संग्राह्य पाहताक्षणीच "सकाळ साप्ताहिक'चा नवा अंक आवडला. उत्सुकतेने चाळून वाचूनदेखील संपवला. अतिशय सुरेख, नावीन्यपूर्ण अंक आहे. विषयाचे वैविध्य व ते विषय सुरेख मांडलेले आहेत. वाचायलाही हा अंक सहज व सुलभ आहे. "कथा यशाची"मधील "निटॉर'चे सर्वेसर्वा सी. ई. पोतनीस व "अनिवासी गाववासी चळवळी'चे नायक प्रदीप लोखंडे यांची यशोगाथा अतिशय प्रेरक आहे. त्यातून एक नवी उमेद मिळाली. ठरवल्यास, निर्धार केल्यास काहीही अशक्‍य नाही. अशाच यशोगाथा यापुढेही अंकात प्रसिद्ध होतील, अशी अपेक्षा आहे. बाकी संपूर्ण अंक उत्तम व संग्राह्य आहे. "सकाळ साप्ताहिक'च्या नव्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! - अर्जुन चोरगे, मुंबई जुनी सदरे&nbsp सुरू करावीत नव्या स्वरूपातील "सकाळ साप्ताहिक'चा अंक पाहिला. या नव्या स्वरूपात काही उणिवा आढळल्या. नव्या स्वरूपात इंग्रजी, गर्जा महाराष्ट्र माझा, गुंतवणूक ही सदरे वगळली आहेत. मी गेल्या पंधरा वर्षांपासून "साप्ताहिक सकाळ'चा वाचक आहे. अंक हाती आल्यानंतर मी सर्वांत प्रथम गुंतवणूक हे सदर वाचतो. ते सदर या अंकात नसल्याने मी निराश झालो.
Read More »



fly