हे अग्नी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
हे अग्नी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शनिवार, 8 अप्रैल 2023

हे अग्नी, सकल मर्त्यजन हवि हातांत घेऊन

  त्वाम् अग्ने हविष्मन्तः देवम् मर्तासः ईळते ।

मन्ये त्वा जातऽवेदसम् स हव्या वक्षि आनुषक् ॥ १ ॥


हे अग्नी, सकल मर्त्यजन हवि हातांत घेऊन तुज भगवंताचे स्तवन करीत असतात; हे सर्वज्ञा मीही तुझेच चिंतन करीत असतो, तर आमचे हविर्भाग देवांकडे तूं निरंतर नेऊन पोहोंचीव. ॥ १ ॥


अग्निः होता दास्वतः क्षयस्य वृक्तऽबर्हिषः ।

सम् यज्ञासः चरन्ति यम् सम् वाजासः श्रवस्यवः ॥ २ ॥


जो दर्भाग्रें नीटनेटकीं कापून टाकून त्याचे आसन बनवून ते देवाकरितां पसरून ठेवतो, आणि जो दानधर्म व हविर्भाग अर्पण करतो अशा पुरुषाच्या घरांतील मुख्य यज्ञसंपादक म्हटला तर हा अग्निच होय; सर्व यज्ञसमारंभ त्यालाच पावतात आणि सत्कीर्तिप्रेरित सत्वसामर्थ्येहीं सुद्धां त्याच्याच पाठिमागें धांव घेतात. ॥ २ ॥


उत स्म यम् शिशुम् यथा नवम् जनिष्ट अरणी इति ।

धर्तारम् मानुषीणाम् विशाम् अग्निम् सु अध्वरम् ॥ ३ ॥


बालकाला मातेनें जन्म द्यावा त्याप्रमाणें अभिनवरूप अग्नीला "अरणि"नें प्रकट केलें. तो हा अग्नि अखिल मानवजातीचा सांभाळ करणारा आहे; उत्कृष्ट याग ज्याच्या प्रीत्यर्थ होतात असाही तो अग्निच आहे. ॥ ३ ॥


उत स्म दुःऽगृभीयसे पुत्रः न ह्वार्याणाम् ।

पुरु यः दग्धा असि वना अग्ने पशुः न यवसे ॥ ४ ॥


सर्पाचें पिल्लूसुद्धां अचपळ असतें त्याप्रमाणें तूंही दुर्निवार आहेस; आणि एखादा बैल तृण धान्याचा पार फडशा उडवून देतो, त्याप्रमाणें हे अग्नि, तूंही असंख्य अरण्यें जाळून फस्त करतोस. ॥ ४ ॥


अध स्म यस्य अर्चयः सम्यक् सम्ऽयन्ति धूमिनः ।

यत् ईम् अह त्रितः दिवि उप ध्माताऽइव धमति शिशीते ध्मातरी यथा ॥ ५ ॥


पहा ह्या धूम्रपरिवेष्टित अग्नीच्या ज्वाळांचा झोत आकाशाकडे एकसारखा लागून राहतो कारण अशावेळीं, त्रित हा एखाद्या लोहाराप्रमाणें त्या अग्निला जोरानें फुंकून प्रज्वलित करीत असतो अथवा एखाद्या शिकलगाराप्रमाणें त्याला तीव्रपणा आणीत असतो. ॥ ५ ॥


तव अहम् अग्ने ऊतिऽभिः मित्रस्य च प्रशस्तिऽभिः ।

द्वेष्ःऽयुतः न दुःऽइता तुर्याम मर्त्यानाम् ॥ ६ ॥


हे अग्नि, तुज मित्राच्या साहाय्यानें, तुझी स्तुति केल्यानें मी आणि माझे आप्तजन असे आम्ही सर्वजण द्वेषबुद्धि विलयाला नेऊन मर्त्यमानवांच्या हात धुवून पाठीमागें लागणार्‍या सर्व संकटांतून सुखरूप पार पडूं असें कर. ॥ ६ ॥


तम् नः अग्ने अभी नरः रयिम् सहस्वः आ भर ।

सः क्षेपयत् सः पोषयत् भुवत् वाजस्य सातये उत एधि पृत्ऽसु नः वृधे ॥ ७ ॥


तर हे दर्पदलना अग्ने, आम्हां शूर पुरुषांना तें अप्रतिम वैभव तूं प्राप्त करून दे. आम्हांस भरंवसा आहे कीं देव आम्हांकडे असें वैभव खचित पाठवील. तो आमचा उत्कर्ष करील आणि आम्हीं सत्वसामर्थ्य मिळवावें म्हणून आम्हांला प्रोत्साहन देईल. तर हे देवा आम्हांस विजयश्री प्राप्त व्हावी ह्या करितां तूं युद्धांत आमच्या बरोबर रहा. ॥ ७ ॥

[9:16 AM, 4/8/2023] +91 88059 58414: 🌹 कर्मयोग 🌹



भाग १

 

‘कर्मयोग’ या शब्दाचा व्युत्पत्यर्थ ‘कर्माची युक्ती’ किंवा ‘कर्माची कुशलता’ असा आहे. कोणतेही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग, असा त्याचा भावार्थ आहे. धर्मशास्त्रात, विशेषत: वेदांमध्ये, विहित असलेली कर्मे हीच युक्त कर्मे होत, असे वैदिक धर्माच्या संदर्भात मानलेले आहे. या अर्थामध्ये भगवद्‌गीतेने अधिक भर घालून तो अर्थ संपुष्ट केला. युक्त कर्मे फलाची आसक्ती सोडून आणि लाभ-अलाभ, सुख-दुःख, राग-द्वेष, सिद्धी-असिद्धी, जय-पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत करीत राहणे म्हणजे कर्मयोग होय, असा भगवद्‌गीतेचा अभिप्राय आहे. निष्काम बुद्धीने वरील द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता व निरहंकार बनून शास्त्रविहित कर्मे करीत राहिल्याने पापनाश होऊन चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीच्या योगाने आत्मा प्रसन्न होऊन परतत्त्वाचा किंवा परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने मोक्ष सिद्ध होतो, असा कार्यकारणभाव भगवद्‌गीतेत सांगितलेला आहे. अद्वैतवादाप्रमाणे जीवात्माच तत्त्वत: परमात्मा आहे. हे जीवात्म्याचे तात्त्विक स्वरूप म्हणजे परमात्मा असून त्याचा चित्तशुद्धीद्वारा साक्षात्कार होतो. जीवात्म्याहून परमात्मा हा भिन्न आहे, असे विशिष्टाद्वैतवाद किंवा द्वैतवाद मानतो. परमात्मा म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचा साक्षात्कार होण्याकरिता कर्मयोगाला भक्तियोगाची जोड द्यावी लागते, असे अद्वैतवादही मानतो. विशिष्टाद्वैतवाद व द्वैतवाद भक्तियोगास प्राधान्य देतात व कर्मयोग हा भक्तियोगाचे अंग किंवा सहकारी कारण समजतात. शंकराचार्यप्रणीत अद्वैतवादाप्रमाणे गृहस्थाश्रमातील कर्मयोगाचे महत्त्व मर्यादित आहे, असे समजले जाते. साक्षात्काराची इच्छा द्दढ झाल्यानंतर गृहस्थाश्रमीने कर्मयोग सोडून संन्यासाश्रम स्वीकारावा, असे शंकराचार्यांचे मत आहे. यास ‘विविदिषा संन्यास’ म्हणतात. कर्मयोगाला भक्तियोगाची जोड शांकरमतालाही मान्य आहे. भक्तियोग, कर्मयोग ही या मताप्रमाणे ज्ञानयोगाची अंगे होत. या मतानुसार मध्यवर्ती किंवा मुख्य स्थान ज्ञानयोगाला आहे. संन्यासाश्रमात आत्मतत्त्वाचे श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे प्रमुख होय. आत्मतत्त्वाचे श्रवण, मनन, निदिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार मिळून ज्ञानयोग होय. या ज्ञानयोगाला भक्तियोग व कर्मयोग यांची जोड द्यावीच लागते. शंकराचार्यांच्या मताप्रमाणे ज्ञानयोगच मोक्षाचे मुख्य साधन असल्यामुळे, त्यांनी विविदिषा संन्यासाचा आग्रह धरला आहे. परंतु संन्यासाश्रमावाचूनही गृहस्थाश्रमातील कर्मयोग आचरीत असताना भक्तियोग व ज्ञानयोग यांचे सहकार्य घेऊन आत्मसाक्षात्कार होतो व मोक्षाची प्राप्ती होते, असेही शंकराचार्यांनी भगवद्‌गीतेवरील भाष्यात म्हटले आहे.





fly