bookmark these 10 we sites if you want to be rich लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
bookmark these 10 we sites if you want to be rich लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

गुरुवार, 29 अक्तूबर 2015

bookmark these 10 we sites if you want to be rich


 
 
 
 
Photo - wise-bread
वाइज ब्रेड- या वेबसाइटवर लहान आणि महत्त्वाचे लेख उपलब्ध आहेत. रोजच्या जगण्यातील काही सोप्या गोष्टींमुळे तुम्ही आर्थिक आघाडीवर यशस्वी ठरण्याच्या टिप्स या वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. खरेदी असो की कर्ज घेणे, सर्व समस्यांचे समाधान या ठिकाणी उपलब्ध आहे.
Photo - investopedia
इनव्हेस्टोपीडिया- व्यक्तीगत गुंतवणुकीसाठीच्या टिप्स, अनेक ट्यूटोरियल, स्टॉक सिम्युलेटर आणि निवृत्तीनंतरचे व्यवस्थापन या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी ही एक उत्तम वेबसाइट आहे. जर तुम्ही नवे गुंतवणुकदार आहात तर इनव्होस्टोपीडियावरल ८ भागांच्या ट्यूटोरियल विभागाला जरूर भेट द्या.
 
Photo - kiplinger
किपलिंगर- घर खरेदीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या सर्व विषयांवर मार्गदर्शन करणारी ही वेबसाइट तुम्हाला गुंतवणुकीच्या बाबतीत नेहमी अपडेट ठेवते. जर तुम्हाला मोठे लेख वाचण्यास आवडत नसले तर किपलिंगरवर स्लाइडशोच्या माध्यमातून विषय समजून घेऊ शकता.
Photo - credit-dot-com
क्रेडिट डॉट कॉम- या वेबसाइटवर तुम्ही मोफत खाते उघडू शकता, त्यावर तुम्हाला क्रेडिट स्कोर मिळतात. या स्कोअरचा उपयोग एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर होतो. या वेबसाइटवर व्यक्तीगत गुंतवणूक, कर्जाचे व्यवस्थापन यासंदर्भातील लेख उपलब्ध आहेत. पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे तुम्हाला या वेबसाइटवर वाचण्यास मिळतील.
Photo - rockstar-finance
रॉकस्टार फायनान्स- जगभरातील पर्सनल ब्लॉगर आणि लेखकांचे लेख तुम्ही या वेबसाइटवर वाचू शकता. तुम्ही ई-मेलद्वारे रॉकस्टारवरील सर्व लेख वाचू शकता.
Photo - i-will-teach-you-to-be-rich
आय विल टीच यू टु बी रिच- व्यक्तीगत गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या रमित सेठी यांनी त्यांच्या लोकप्रिय पुस्तकाच्या नावावरूनच ही वेबसाइट सुरु केली आहे. ज्या व्यक्तींना मोठे व्हायचे आहे त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे प्राथमिक सल्ले या वेबसाइटवर देण्यात आले आहेत. त्याच बरोबर तुमची आवडती नोकरी, अधिक पैसे कमवण्याचे मार्ग आणि स्वतःचा व्यवसाय करण्याचा सल्ला सेठींनी या वेबसाइटवर दिला आहे.
Photo - morning-star
मॉर्निंग स्टार- म्यूचअल फंड्सना रँकिंग देण्याची सुरुवात मॉर्निंग स्टारनेच केली होती. आता या वेबसाइटवर गुंतवणुकदार स्वतःचे पोर्टफोलियो देखील रिव्ह्यू करू शकतील. तसेच तातडीने टॉप फंड्ससंदर्भातील माहिती मिळवू शकतात. कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करताना त्याची पूर्ण माहिती आणि विश्लेषण माहिती करून घेणे आवश्यक असते.
Photo - khana
खान अकॅडमी- गुंतवणुकदारांच्या सर्व गरजांचा विचार करुन या वेबसाइटवर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. त्याच बरोबर चालू आर्थिक मुद्द्यांवरील चर्चेचे व्हिडिओ उपलब्ध असतात. ज्यांना व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याची सवय आहे त्यांचज्यासाठी ही एक उत्तम वेबसाइट आहे.

 
Photo - the-motely-fool
द मोटीली फूल- या वेबसाइटचा मुख्य उद्देश इनव्हेस्टमेंट कम्युनिटी तयार करण्याचा आहे. या ठिकाणी म्यूचअल फंड, स्टॉक सेक्टर आणि अन्य गुंतवणुकीसंदर्भातील ए टू झेड माहिती देण्यात आली आहे. मोटली फूलच्या वेबसाइटसह पुस्तके, वृत्तपत्रातील लेख, रोडिओ स्टेशनवरील कार्यक्रम आणि न्यूजलेटर सुद्धा तुमच्या मदतीला आहेत.

fly