- शालेय क्रिकेटमध्ये कांबळीसोबत भागीदारी
२३ ते २५ फेब्रुवारी १९८८ - सचिन १४ आणि विनोद कांबळी १६ वर्षांचा असताना शारदाश्रम विद्यामंदिरकडून खेळताना या दोन फलंदाजांनी नाबाद ६६४ धावांची ऐतिहासिक विक्रमी भागीदारी केली होती. सचिनने नाबाद ३२६, तर विनोदने नाबाद ३४९ धावा पटकावल्या होत्या. मुंबईतील आझाद मैदानात हा सामना रंगला होता.
- प्रथम श्रेणीमध्ये शतक नोंदविणारा तरुण खेळाडू
११ डिसेंबर १९८८ - वय १५, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात शतक. या शतकामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक नोंदविणारा तरुण खेळाडूचा विक्रम सचिनच्याच नावावर
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम
१५ ते १९ नोव्हेंबर १९८९ - वयाच्या १६ व्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत विक्रम. या मालिकेत सियालकोट येथे झालेल्या सामन्यात वकार युनूसच्या चेंडू सचिनच्या नाकावर बसून रक्तस्त्राव आणि सचिन सामन्यातून बाहेर.
- कसोटीत शतक झळकाविणारा दुसरा तरुण खेळाडू
१४ ऑगस्ट १९९० - ओल्ड ट्रॅफर्डवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ११९ धावांची खेळी करीत कसोटीत शतक नोंदविणारा दुसरा तरुण खेळाडू होण्याचा विक्रम.
- कौंटीत यॉर्कशायरकडून खेळणारा पहिला खेळाडू
एप्रिल १९९२ - इंग्लंडमधील जगप्रसिद्ध कौंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर संघाकडून करारबद्ध होणाऱ्या पहिला परदेशी खेळाडू.
- हिरो करंडक जिंकून देण्याचा विक्रम
२४ नोव्हेंबर १९९३ - हिरो करंडक स्पर्धेत शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला सहा धावांची गरज होती. त्यावेळी सचिनने गोलंदाजी करीत केवळ तीन धावा देत संघाला विजय मिळवून दिला.
- श्रीमंत क्रिकेटपटू होण्याचा विक्रम
ऑक्टोबर १९९५ - वर्ल्डटेल कंपनीबरोबर ३१.५ कोटी रुपयांचा पाच वर्षांचा करार करुन जगात श्रीमंत क्रिकेटपटू होण्याचा मान.
- तेविसाव्या वर्षी कर्णधारपद
८ ऑगस्ट १९९६ - तेविसाव्या वर्षी भारतीय संघाचे कर्णधारपद मिळविले.
- एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा
३१ मार्च २००१ - इंदौर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३९ धावांची खेळी करीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम.
- कसोटीत डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला
ऑगस्ट २००२ - ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटीमधील २९ शतकांचा विक्रम हेडिंग्ले येथे मोडला.
- विश्वकरंडक स्पर्धेत मालिकावीराचा किताब
मार्च २००३ - दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ६७३ धावा करीत मालिकावीराचा किताब मिळविला.
- दोन्ही क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम
मार्च २००५ - पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात ५२ धावांची खेळी करीत कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा. यामुळे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम.
- ब्रायन लाराचा विक्रम मागे टाकला
ऑक्टोबर २००८ - कसोटीमधील ब्रायन लाराचा सर्वाधिक धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पीटर सीडलला चौकार मारुन मागे टाकला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला.
cricket लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
cricket लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
शुक्रवार, 23 अप्रैल 2010
विक्रमवीर सचिन!
सचिनचे आजपर्यंतचे विक्रम -
सदस्यता लें
संदेश (Atom)