raj thakare news लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
raj thakare news लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शुक्रवार, 4 नवंबर 2011

श्री. राज ठाकरे

 



 राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्‌ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना माझ्या मनात येत नाही ही माझी दुर्बलता वाटत असे. पण राजला भेटल्यावर माझ्या मनातली भावना न्यूनगंडासारखी होती, ती माझ्या शक्तिस्थानासारखी वाटू लागली.


राजमध्ये प्रचंड करिष्मा आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा राजचा करिष्मा किंवा राजची ती जादू योगायोगाने किंवा अपघाताने आलेली गोष्ट नाही. राज वयाच्या तेवीसाव्या वर्षापासूनच राजकारणात आहे. तेव्हापासून त्याने कण-कण करून माणसं जोडलेली आहेत. त्यांची काळजी केलेली आहे. आजही राज जेव्हा बाहेर कुठेही किंवा दौर्‍यावर जातो, तेव्हा बरोबरच्या माणसांची आधी काळजी घेतो. त्यांची सोय नीट होते आहे की नाही यावर त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. राज आक्रमक राजकारण करतो किंवा त्याची वक्तृत्वकला तडफदार आहे म्हणून केवळ जादू पसरत नाही, तर सोबतच्या माणसांची तो पराकोटीची काळजी घेतो. जनतेला असा नेता आवडला तर नवल काय? व्यवसायामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रकारामुळे देशातले अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मी पाहिले. बहुतेकांना आपल्या बायका-मुलांपलीकडे कुणी माणसं आपल्यासोबत असतात आणि त्यांची काळजी आपणच वाहायला हवी याची जाणीवच नसते. राज या सार्‍यांपेक्षा अगदी वेगळा आहे.

नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीसाठी संपूर्ण शिवसेना कोकणात उतरली. त्या वेळी राजचा मुक्काम कणकवलीच्या हॉटेल शर्मिलामध्ये होता. तिथे परिस्थिती अशी होती की माणसं भरपूर होती आणि रुम्स कमी होत्या. राणेंनी मतदारसंघातील सर्व हॉटेल्स आधीच बुक करून ठेवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भलतीच पंचाईत झालेली होती. अशा वेळी राज हॉटेलमध्ये आपल्या खोलीत जास्तीत जास्त जणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्या वेळेला शिवसेनेचे अनेक बडे नेते आपली हॉटेलमधली सोय कशी अधिक 'फुलप्रूफ' होईल ते पाहण्यात मग्न होते. आता शिवसेनेचे नेते असलेले आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते रामदास कदम हे शर्मिला हॉटेलमधल्या आमच्या शेजारच्याच रूममध्ये राहत होते. इतर अनेक नवे कार्यकर्ते येऊन आपल्या राहण्याच्या सोयीवर आक्रमण करू पाहताहेत हे पाहिल्यावर रामदास कदम हे ‘मानापमाना’ चा खेळ सुरू करून बॅगा घेऊन निघाले होते. ‘‘तुमच्या निवडणुका तुम्ही लढवा. मी चाललो खेडला’’, असे बाणेदार उद्‌गार काढून ते निघाले. तेव्हा ज्येष्ठ - कनिष्ठतेचा वाद बाजूला सारून राज स्वत: समजूत काढून कदमांना परत घेऊन आला. शिवसेनेच्या इतिहासातल्या सारगर्भ दिवसात मी निवडणूक क्षेत्रात राजसोबत होतो. त्या क्षणी सभोवतालच्या परिस्थितीचं अचूक राजकीय आकलन त्याच्याएवढं दुसर्‍या कोणत्याच शिवसेना नेत्याला नव्हतं. त्या काळात राजने शिवसेना सोडण्याचं ठरवलेलं होतं अशा वावड्या नंतर उडवण्यात आल्या. खरं तर त्या काळात राजने कमालीचा संयम पाळला होता. जो पाळणं हे कमालीचं कठीण होतं. एक तर संपूर्ण निवडणूक मोहिमेची आखणी ही राजला वगळून करण्यात आलेली होती. दुसरं म्हणजे, त्याला राणेंशी लढवून एकंदरीत महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवावा अशी पुढच्या काळासाठीची संकल्पना शिवसेनेत आकारत होती. राजला हे कळत होतं. तो प्रचंड अस्वस्थ होता. गंमत म्हणजे त्याची ही अस्वस्थता राजकीय असुरक्षिततेतून आलेली नव्हती, तर त्याला त्रास होत होता तो भावनिक. संपूर्ण शिवसेना आणि शिवसेना नेते हे कमालीच्या राजकीय असुरक्षिततेने भेदरलेले होते.

राजला त्याबाबतीत मात्र कधीच काही असुरक्षितता नव्हती. त्याचा स्वत:च्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. पण त्या काळात त्याची भावनिक आंदोलनं ही त्याच्या जवळच्यांना प्रचंड अस्वस्थ करत होती. तेव्हा आणि त्यानंतरच्या अनेक रात्री राजने जागून काढलेल्या आहेत. त्याच्या मनात विचार फक्तं बाळासाहेबांचाच असे. He loves me, He loves me not... असं काहीसं त्याच्या मनाशी चाललेलं असे. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम नाहीए... अशा मानसिक आंदोलनात त्याने इतक्या शक्यतांचा विचार केला होता की मला नाही वाटत की, त्याच्या राजकीय आणि व्यक्तिगत शत्रूंनी बाळासाहेबांसंबंधी त्याच्या एक लक्षांश विचार केला असेल. अगदी निष्पक्षपणे, नीरक्षीरविवेक ठेवून आणि ईश्वराला स्मरून जर मी लिहायचं ठरवलं, तर मी बाळासाहेबांसोबतच्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वातल्या पहिल्या वर्तुळातल्या प्रत्येक माणसाला त्या काळात अगदी जवळून पाह्यलंय. मी नि:संदिग्धपणे असं म्हणेन की, बाळासाहेबांवर राजइतकं निस्सीम आणि इतकं परिपक्व प्रेम इतर कुणीही केलेलं नाही. मुख्य म्हणजे त्याच्याइतके बाळासाहेब कुणाला नीट कळलेच नाहीत. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या चुकांसहित राजने त्यांना समजावून घेतलं आणि निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम केलंय. 
 

समज आणि गैरसमज...

राजची आणि माझी ओळख नव्हती त्या काळात मला राज हा अतिशय उद्धट आणि अतिआक्रमक वाटायचा. त्याची माझी मूळ ओळख उदय तानपाठक नावाच्या आमच्या एका मित्राने करून दिली. तो एका सकाळी मला राजकडे घेऊन गेला. ती भेट सकाळी फार लवकर ठरल्याने माझ्या डोळ्यांवर फार झोप होती. मी एकाच गोष्टीमुळे राजच्या भेटीबाबात प्रतिकूल होतो. त्या भेटीत राजने हिंदुत्वाबाबत आपली मतं मांडल्याचं मला आता स्मरतं. राज तेव्हा मला म्हणाला होता, ‘‘हिंदुत्व वगैरे सगळं ठीक आहे. पण खरं तर महाराष्ट्रात मराठी माणूस, गुजराती आणि मारवाडी-जैन माणूस मिळून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायला हवा. शिवाय मराठी माणूस म्हटलं की, खेड-मालेगावचा मुसलमान नाही तर वसईचा ख्रिश्चन तुम्ही कसा वगळणार?’’ मी ते ऐकून चाट पडलो. राजची प्रतिमा तेव्हा प्रतिबाळासाहेब अशी होती. मला वाटलं होतं तो त्या पद्धतीने बोलेल पण ऐकलं ते हे. नंतर अलीकडे एकदा बोलतानासुद्धा तो म्हणाला, ‘‘आपली ज्या प्रकारची तपश्चर्या असते, त्याच प्रकारचं आपण बोलावं. म्हणजे त्यावर आपला विश्वास बसतो आणि लोकांचाही. आमच्या आजोबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलत. बाळासाहेबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलले. मी तेच बोलतो ज्यावर माझा विश्वास आहे. उगाच बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्‌स ऐकून हिंदुत्वावर बोलण्याने माणसाचा विदूषक होईल. तपश्चर्येशिवायचे इशारे म्हणजे साबणाचे फुगे! मला ते उडवायचे नाहीत.’’ राज विचार करतो तो असा.

पहिल्या भल्या सकाळच्या भेटीनंतर त्याची अन्‌ माझी मैत्री झाली असं नाही. गंमत म्हणजे राजच्या अगोदरपासून माझी आणि उद्धवची ओळख होती. राजच्या संदर्भात जो उद्धव येतो तेवढंच या ठिकाणी लिहिणं अपरिहार्य. उद्धवच्या बाजूने राज आणि राजच्या बाजूने उद्धव जेवढा मला कळला, त्यातून मला जे आकलन झाले ते तसं क्लेशदायक होतं. इथे उद्धव किंवा राजच्या राजकारणाचं मूल्यमापन मी करत नाहीए. दोघांनाही त्यांचं राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी जे जे करावं लागतं, ते करण्याचा व ते करताना डावं-उजवं न पाहण्याची दोघांनाही मुभा आहे. परंतु राजच्या बाबतीत जे झालं ते नि:संदिग्धपणे अन्यायकारक होतं. कारण शिवसेनेमध्ये राजची राजकारणाची समज त्यांच्या पिढीतली सर्वात अव्वल समज होती. त्याच्यामध्ये सर्व काही मंगल करण्याची स्वप्नं होती. त्याच्याकडे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे तरुण होते. त्याची मागणी ही कामाच्या, जबाबदार्‍यांच्या वाटपाची होती. याचं उत्तर ‘तुझ्यासाठी सर्व महाराष्ट्र खुला आहे’ हे असू शकत नव्हतं. (अर्थात या उत्तराच्या शेवटी त्याने योग्य तो बोध घेतलाच!) वास्तवात जे होत होतं, त्याची सामान्य जनतेला योग्य ती कल्पना नाहीए. मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेलं एक उदाहरण लिहितो. राज शिवसेनेत प्रचंड लोकप्रिय होता. तो जिथे जात असे, तिथे त्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी चोरून-चोरून भेटायला येत असत. मी ‘चोरून चोरून’ असं लिहिलं आहे त्याचं उदाहरण एकदा मला पाहायलाच मिळालं. त्या अगोदर या सार्‍यांना राजला भेटायचं असेल, तर चोरून भेटावं लागतं असं मी ऐकलेलं होतं. पण माझा त्या कथांवर विश्वास नव्हता. पण एकदा पुण्यात राज असताना असेच शिवसेनेचे काही पदाधिकारी त्याला (चोरून) भेटायला येत होते. इतक्यात पुण्याचे संपर्कप्रमुख असलेले रवींद्र मिर्लेकर राजला भेटायला ‘अधिकृत’ पणे येत आहेत अशी बातमी आली. तेव्हा आपापल्या भेटी गुंडाळून तत्कालीन शिवसेना पदाधिकारी मिटिंग आवरून अक्षरश: राजच्या घरातून पळून गेले! त्यांना म्हणे, त्यांच्या नावाची यादी ‘मातोश्री’वर सादर होईल अशी भीती होती! त्या वेळीही त्यांच्यावर राजचं म्हणणं गमतीशीर होतं, तो म्हणायचा, ‘‘पदांवर बेतलं तर उड्या टाकून पळून जाणार्‍यांच्या जीवावर महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार? उद्या महाराष्ट्रावर संकट आलं, तरीही हे उड्या टाकूनच पळणार. वेळ कोणतीही असली, तरी पाय रोवून उभे राहतील असे पाच लोकसुद्धा महाराष्ट्राचं भलं करतील!’’ गंमत म्हणजे, त्या उड्या टाकण्याच्या प्रसंगात शिवसेनेच्या एकाच पदाधिकार्‍याने उडी टाकली नव्हती. ते म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन आमदार दीपक पायगुडे! मला वाटतं, आपलं आपलं राजकारण करण्याचा आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आपण मान्य केला, तरीही क्षुद्र आणि स्वार्थी माणसांच्या सल्ल्यावरून राजची जी मानखंडना होत होती ती खचितच समर्थनीय नव्हती. या काळात सुभाष देसाई हे शिवसेनेच्या पहिल्या वर्तुळाचे नाना फडणवीस होते. या काळात राजची जी मानसिक घालमेल होत होती, ती पराकोटीची त्रासदायक होती. आपण काही निर्णायक पाऊल उचललं तर बाळासाहेबांना जो त्रास होईल तो एकीकडे आणि एका कर्तृत्ववान पुरुषाला संघटनेतल्या पाच हजारो मनसबदारांकडून जी मानखंडना करून घ्यावी लागत होती ती दुसरीकडे. या कात्रीत राज सापडला होता. पिंजर्‍यात सापडलेल्या वाघासारखा राज तडफडत असे. मी स्वत: त्याच्यासोबत अशा अनेक संध्याकाळी बोलत काढलेल्या आहेत. ‘पिंजर्‍यामध्ये वाघ सापडे, बायका-पोरे मारिती खडे’ म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकच तेव्हा शिवसेनेने उभे केले होते. फरक एवढाच होता की, इथे पिंजरा बाळासाहेबांच्या प्रेमाचा होता. तो नंतर राजने तोडला. पण ते खूप नंतर. अगदी भिंतीला पाठ टेकल्यावर. त्या अगोदर खूप रामायण घडलं. त्यातल्या प्रत्येक नाही, तरी बर्‍याच घटनांचा मी साक्षीदार आहे. एवढं मात्र खरं की, राज त्या काळात खूप प्रतिष्ठेने आणि संयमाने वागला


राज : कल्पनेतला आणि खरा...

हे सगळं घडायच्या आधी मी राजची एक मुलाखत घेतली होती. ती घेत असताना मी राजसोबत कम्फर्टेबल नव्हतो. बहुदा तोही नसावा. मला सतत असं वाटत होतं की, मी जाणीवपूर्वक समोरच्याला अडचणीत आणण्याकडे कल असणारा मुलाखतकार आहे असा त्याचा कुणीतरी समज करून दिला होता. तो सतत प्रश्न कापून उत्तर देण्यावर भर देत बोलत होता. त्याअगोदर किणी प्रकरणामध्ये त्याच्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आले होते, संपूर्ण समाजवादी कंपू कुणाला तरी नष्ट करण्यात नेहमीच आनंद व उत्सव मानतो, तशाच प्रकारे सर्व तयारीनिशी त्या प्रकरणात उतरला होता. त्या समाजवादी आरोपांवर व्यक्तिश: माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींवर जादू करणार्‍या या तापट आणि आक्रमक नेत्यावर त्या प्रकरणाचा एवढा धुरळा का उडाला याचा शोध घ्यावा असे मला सातत्याने वाटत होते. खूप मागोवा घेतल्यावर हाती जे लागलं ते हेच होतं की, अशा प्रकारच्या षड्‌यंत्रात गोवण्यासाठी व राजची प्रतिमा मलीन करण्याचा कट खूप अगोदरपासून चालू होता. फक्त जोडण्याकरता योग्य ते प्रकरण हाताशी लागत नव्हतं. वास्तविक या प्रकरणाचं जे काही होतं, ते आणि राजच्या वर्तुळाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही त्या काळात समाजवादी पत्रकारांनी राजला त्याच्या प्रत्यक्ष शत्रूंपेक्षाही मानखंडित केलं. प्रत्यक्ष पुराव्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी हे संपूर्ण प्रकरण आधारहीन असल्याचे निष्कर्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे देऊनही, त्या काळात राजला, त्याच्या कुटुंबीयांना अपरिमित त्रास सोसावा लागला. मला असं वाटतं की, या षड्‌यंत्रात अशा रीतीने फसावं असे काही दोष राजमध्ये आहेत. हे अर्थात मला नंतर कळलं. तो माणसांवर चटकन विश्वास टाकतो. नको इतका विश्वास टाकतो. कुणी आपलं वाईट करेल यावर त्याचा विश्वासच नसतो. त्याचं इतक्या जणांनी, इतक्या वेळेला, इतकं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कल्पना म्हणून आपण त्या जागी असण्याची मला प्रचंड भीतीच वाटते. तरी हे पचवून राज माणूसवेडा राहिला आहे. एखाद्या किंवा कुणाही माणसावर दुसर्‍या भेटीतच संपूर्ण विश्वास टाकणारा राज हा भारतातला एकमेव राजकीय नेता असावा! याचा अर्थ तो चतुर नाही असं नव्हे, तो प्रसंगी अतिचतुरतेने वागतो. मुख्य म्हणजे तो कोणतीच गोष्ट कधीच विसरत नाही. तुमची एखादी बारीकशी हालचाल, उद्‌गार किंवा युक्तिवाद त्याच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. जेव्हा वेळ येते, तेव्हा तो ते आपल्या पोतडीतून बाहेर काढून त्याचा वापर करतो. अगदी जवळून पाह्यलेलं असल्याने मी हे सांगू शकतो की, याबाबतीत त्याची तुलना शरद पवारांशीच करावी लागेल. फक्त्त फरक एकच. पवारसाहेबांनी छोट्या माणसांची नावं आणि मोठ्या माणसांची कामं लक्षात ठेवली असं इतिहास सांगतो. राज नेमकं उलटं करतो. अनेक छोट्या माणसांच्या कसल्या कसल्या कामांसाठी राजने कुणाकुणाला फोन केल्याचं मी पाह्यलंय. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी राजकडे माणसं उभी असतात आणि राज स्वत: फोन करून नंतर काम झाल्याची खात्री करून घेतोय हे दृश्य मी दरवर्षी पाहत आलोय. गंमत म्हणजे इतर सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि नेत्यांची मुलं त्यांच्याच पक्षाची सत्ता राज्यात आणि देशात असताना यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी राजकडे येतात आणि ती कामं करून घेतात. इथे नावं लिहिणं किंवा त्यांची कामं संयुक्तिक नसल्याने मी ती लिहीत नाही. नाहीतर ती यादी आणि कामं वाचून बर्‍याच जणांना चक्कर आली असती.
 
 
राज नावाचा मित्र
(मा. राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख.)
राजू परुळेकर -
राजकीय विश्लेषक व लेखक
 
 

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे संकेतस्थळ प्रकाशित करत असताना मला मनापासून आनंद होतो आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आनंद मला तुमच्यापर्यंत रोज पोहोचता येणार आहे.

आजवर अनेक हिंदी, इंग्रजी वाहिन्यांनी (व काही मराठी पत्रकार व वाहिन्यांनीही) माझ्याविषयी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या माझ्या पक्षाविषयी आणि मी चालवत असलेल्या लढ्यासंबंधी तद्दन खोटी, विखारी व भंपक माहिती आपणापर्यंत पोहोचवली. ज्याचा वेळोवेळी खुलासा करण्याचा मी व माझे सहकारी यांनी प्रयत्न केला. परंतु योग्य साधनांअभावी तो प्रयत्न बर्‍याचदा अपुरा ठरला.


महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.

महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते.

महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणार्याम सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणार्याम सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे.


  पोशाख मराठीत

हे बोला हे टाळा
सदरा शर्ट
विजार पॅंट
गुंडी बटन
पट्टा बेल्ट
गळबंद टाय
सुती कॉटन
साडी सारी
झगा गाऊन
टोपी कॅप
पायताण सॉक्स
मोजे रिझल्ट
बंडी बनियन





व्यंगचित्रे | लेख-मुलाखती-पत्रे | चलचित्र संग्रह | छायाचित्र |





 lABLE:maharashtra navnirman sena song,raj thackeray,mns raj thackeray wallpaper,mns raj thackeray videos,mns raj thackeray marathi website,raj thakre mns raj thackeray download,mns raj thackeray photo,mns raj thackeray images,manase,mns website,raj thackeray,raj thakre,shiv sena,shivsena,manase manase,manase manase song,manase relax,manase relax please,manase manase lyrics,manase tonga,o manase,manase guvvai,manase samoa,marathi manase,manase guvvai,manase manase lyrics,manase manase song,manase samoa,manase tonga,marathi manase,o manase,manase manase,raj thakre video,raj thakre,raj thakre latest news,raj thakre speech,raj thakare ringtone,raj thakare photos,raj thakare videos,wallpapers raj thakare, raj thakare SPEACH,  raj thakar HOUSE,  raj thakare PHOTO,  raj thakare STUDIO,raj thakre bhashan,raj thackeray biography

fly