silver price लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
silver price लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 18 सितंबर 2011

सोन्याच्या भावात तेजी-मंदी

 
जागतिक बाजार
जागतिक बाजारात धातूविषयक भावातील तेजी-मंदी असेच सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

तज्ज्ञांच्या नुसार  आगामी काळात तेजीवाले तसेच मंदीवाले सोन्याच्या सौद्यात मोठ्या प्रमाणात उलाढाल करतील.

गोल्ड इटीएफ मालामाल   
 
सणासुदीचा  विशेष करून लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने नजीकच्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची भीती ग्राहकांना वाटत आहे. त्यामुळेही सराफ बाजारात सोने खरेदीचा सपाटा वाढला आहे.  विदेशी बाजारातल्या तेजीमुळे सोन्याचा भाव वाढून आहे

एचएसबीसी  आणि धातूविषयक सल्लागार फर्म जीएफएमएसने सोन्याच्या किमती प्रतिऔंस 2000 डॉलरवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे.  गेल्या आठवड्यात स्वीस नॅशनल बँकेने आपल्या फ्रँक या चलनातील मजबुती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची खरेदी केली होती. 

 भाव
भावात 100 डॉलरचे करेक्शन आल्यास आश्चर्य वाटायला नको. तर एचएसबीसीच्या (हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन) मते 2012 मध्ये सोन्याचे दर प्रतिऔंस 2025 डॉलर पर्यंत जाऊ शकतात.

एकीकडे जेथे 1800 डॉलर प्रतिऔंस या पातळीवर गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होताना दिसतो आहे, तर दुसरीकडे अस्थिर वातावरणामुळे विविध देशांतील सरकारचा ओढा सोन्यातील गुंतवणुकीकडे राहील. 


यामुळे सोन्याच्या भावात मोठी हालचाल दिसून आली. काही मिनिटांतच सोन्याच्या भावात 50 डॉलरची तेजी-मंदी दिसून आली होती. सेक्सो बँकेचे  वरिष्ठ व्यवस्थापक ओले हेनसन यांच्या मते, डॉलर आणखी मजबूत झाला तर सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येईल. 
 
दिवाळीपर्यंत ३० हजार?
 अमेरिका व युरोप  कर्जबाजारी होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी अमेरिकेतील रोख्यांमधील रक्कम परत मागण्यास सुरुवात केली आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यनही सोन्याची मागणी वाढवत आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ३० हजार रुपयांपर्यंत तर मार्च २०१२पर्यंत हाच भाव ३३ ते ३५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सोने खरेदी आताच केलेली बरी असे मत बुलियन तज्ज्ञ नंदख़ुमार मासे यांनी व्यक्त केले.

fly