बुधवार, 5 अप्रैल 2023

इंद्रजाल

 इंद्रजाल


इंद्रजाल हि वनस्पती मुख्यत्वेकरून समुद्रात सापडते, या वनस्पतीला पानं नसतात तर फक्त छोट्या छोट्या एकमेकाला चिकटलेल्या फांद्या असतात. वास्तुशास्त्रात वास्तुदोष निवारणासाठी याचा वापर केला जातो. घरातील तअसेच कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्याचे काम इंद्रजाल करते. मुख्य दरवाजा समोर इंद्रजाल लावली असता नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून अटकाव करते. 


अतिशय दुर्मीळ अशा इंद्रजलची नित्य नियमाने पूजा केल्यास लगेच परिणाम दिसून येतात. याचा वापर नजरबाधा, वास्तुदोष, चोरांपासून रक्षण, नकारात्मकता कमी करण्यासाठी, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी, मालकाच्या भाग्याला चालना देण्यासाठी केला जातो. वैज्ञानिक भाषेत हिला समुद्र पंखा म्हणतात तर काही ठिकाणी समुद्र फणी सुद्धा म्हणतात.


ज्या घराच्या उत्तर-पुर्व किंवा उत्तर दिशेला याची स्थापना केली जाते तिथे सुख, समृद्धी, यश, बाहेरच्या बाधेपासून मुक्ती, आणि पैशाची चणचण भासत नाही. 


हीच्या अनेक जाती असून अनेक रंगात ही वनस्पती मिळते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची पूजा केली जाते. अतिशय दुर्मिळ अशी ही वनस्पती आहे. मानसिक स्थैर्य, कौटुंबिक स्वास्थ वाढवण्यास मदत करते. तसेच व्यवसायात प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हीचा वापर केला जातो. पैसा आणि शक्ती देणारी ही दुर्मिळ वनस्पती आहे. 


महत्त्व आणि उपयोग :


वैदिक काळापासून या वनस्पतीचा वापर करण्यात आला आहे. आयुष्यातील बर्याच समस्या सोडवण्यासाठी इंद्रजालचा वापर केला जातो, कारण इंद्रजाल ही प्रभावी वनस्पती असून  बाधा, काळी जादू, नजर बाधा दूर करते. 


★ आर्थिक समस्या, तोटे भरून काढण्यासाठी व्यवसायाला चालना देण्याचे काम करते. मुख्य दरवाजासमोर किंवा दक्षिण दिशेत याची स्थापना केल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण भासत नाही. पैसे येत राहतात. आर्थिक स्थैर्य येते


★ वास्तुदोष दूर करण्याचे काम करते


★ घरातील/ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आसपास सकारात्म ऊर्जा प्रवाहित करते.


★तुमच्या भोवती तसेच तुमच्या कुटुंबाभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करते.


इंद्रजालचा वापर/स्थापना :


सिद्ध केलेले आणि पूजा केलेले इंद्रजाल लगेच परिणाम दाखवते. तंत्रसाधनेत इंद्रजालला विशेष महत्त्व आह


  • √घराच्या दिवाणखाण्यात, दर्शनी भागात उत्तरेच्या किंवा पूर्वेच्या भिंतीवर लावू शकतात.
  • √कार्यालयाच्या किंवा घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर लावू शकतात.
  • √रवि पुष्य नक्षत्र, नवरात्र, दीवाळी इत्यादि शुभ दिनी इंद्रजालची स्थापना करून आपल्या कार्यालयात अथवा घरात अध्यात्मिक लाभ मिळवू शकतात. 


सहा प्रकारची प्रचलित हळद

 सहा  प्रकारची प्रचलित हळद


आंबे हळद  जेवणात वापरणारी हळद  आहे 

 कपूर हळद

काळी (जांभळी हळद )

हिरवी हळद

 पांढरी हळद

पिवळी हळद

 या बाहेर  शेंदूर  हळद कामाख्या  हळद  लाल हळद  म्हणून  एकदर 40 जाती आहे


काळी हळद  ,जांभळी  हळद  ,लसांनी  कुकवी  पांढरी  शेदरी  पिवळी .  ➖➖➖➖➖➖➖


  काळ्या  हळदी चे महत्व ..

 

➖➖➖➖➖➖➖


                       

          काळीहळद


काळी हळद शास्त्रीय नाव:Curcuma caesia

हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.


या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, ह्याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या; वास व रुची कापरासारखी. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात.


हळदीचे काही प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार आहे. काळी हळद वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. काळ्या हळदीचे रोप हे कण्हेरीच्या झाडासारखे असते परंतु फरक हा असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी काळ्या रंगाची रेष असते. काळी हळद सहजा सहजी मिळत नाही. सर्वात उत्तम प्रतीची काळी हळद अमरकंटक, मध्यप्रदेश येथे मिळते तसेच कामाख्या मंदिराच्या आसपास मीळते. काळी हळद ओळखता आली पाहिजे नाहीतर काळी हळद सांगून आंबेहळद पण दिली जाते.


. हळदीचे ७ प्रकार आहेत त्यात एक प्रकार काळी हळद म्हणून प्रचलित आहे.


 काळ्या हळदीचा उपयोग !


१. काळ्या हळदीचे रोप असलेली कुंडी तुमच्या ऑफिस मध्ये किंवा दुकानाच्या दरवाजा बाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते.


२. घराच्या बागेत ह्याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते. काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने ३ दिवस पर्यंत तहान भूक लागत नाही. त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात.


३. काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखाएवढा तुकडा तोंडात ठेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात. तसेच पैशाची कामे किंवा कोणाला कर्जाऊ दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते.


४. रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.


५. हळदीचे पान असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते पटकन लागते कारण ह्या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते. ज्या प्रमाणे व्याघ्रसनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रीत होते त्याच प्रमाणे ह्याच्या पानांचा उपयोग असनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो.


६. रोज ह्या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशी प्रमाणेच धूप दीप दाखवल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.


७. काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैऋत्य कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरात शिरत नाहीत.


हळदीचा उपयोग स्वयंपाकात तसेच पूजा सामग्रीमध्ये होतो,हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. काळ्या हळदीचे सेवन केले जात नाही परंतु या हळदीचा उपयोग तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो. काळी हळद धन आणि बुद्धी कारक मानली जाते. तंत्र क्रियेमध्ये काळी हळद खूप पूजनीय आणि उपयोगी मानली गेली आहे.विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होतात.


१)काळ्या हळकुंडाचे ७ ते ९ दाने तयार करून घ्या. एका दोर्‍यामध्ये ओवून घ्या. त्यानंतर त्यावर धूप, गुगळ लावून गळ्यामध्ये धारण करा. जो व्यक्ती अशा प्रकारची माळ घालतो तो अशुभ ग्रहांच्या दुष्प्रभावांपासून दूर राहतो.


२)गुरुपुष्य योगामध्ये काळ्या हळदीला शेंदूर लावून धूप-दीप दाखवून लाल कपड्यामध्ये एक रुपयाच्या नाण्यासोबत तिजोरीत ठेवा. याच्या प्रभावाने धनामध्ये वृद्धी होईल.


३)महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी काळ्या हळदीचा टिळा लावावा. या उपायाने कामामध्ये यश मिळेल.


४)तुम्हाला एखद्या व्यक्तीला आकर्षित करण्याची इच्छा असेल तर दररोज सकाळी काळ्या हळदीचा टिळा लावावा. कोणालाही आकर्षित करण्यासाठी काळ्या हळदीचा टिळा एक सोपा तांत्रिक उपाय आहे.


५)काळ्या हळदीचे चूर्ण दुधामध्ये टाकून चेहरा आणि शरीरावर हा लेप लावल्यास त्वचा तजेलदार होईल.

fly