रविवार, 8 अक्तूबर 2023

बहुगुणी तीळ...!

 बहुगुणी तीळ! तीळ :- 


तीळ मजबुत हाडांसाठी. तीळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तीळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. 

तीळ in english 

तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. हिवाळा स्वास्थासाठी चांगला मानला जातो. थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तीळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत तीळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तीळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. 

अंगावरील तीळ in English

वैज्ञानिकदृष्ट्या तीळाच्या तेलामध्ये केसांसाठी पोषक घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तीळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं.

जाणून घ्या! तीळ खाण्याचे ‘हे’ १० फायदे

◼️तीळात सेसमीन नावाचे एन्टीऑक्सिडेन्ट आढळतात जे कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात. 


◼️तीळाच्या सेवनामुळे भूक वाढते. तीळ वात, पित्त आणि कफची समस्या कमी करण्यास मदत करते. 

तीळ खाण्याचे फायदे तोटे 

◼️तीळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. 


◼️थंडीच्या दिवसांत तीळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तीळाच्या सेवनाने चेहरा चमकदार होण्यास मदत होते. 

जवस खाण्याचे फायदे 

◼️पोटात दुखत असल्यास काळे तीळ गरम पाण्यासोबत खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. 


◼️तीळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे तणाव, डिप्रेशनच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळू शकते.


◼️तीळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने सुक्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. 

खसखस खाण्याचे फायदे

◼️कान दुखत असल्यास तीळाच्या तेलात लसून एकत्र करुन, तेल हलकं गरम करुन लावल्यास कानदुखी कमी होऊ शकते.


◼️तीळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.

 तिळाच्या तेलाचे फायदे 

◼️सतत तोंड येत असल्यास तीळाच्या तेलात सेंधव मीठ मिसळून लावल्यास आराम पडू  शकतो.


म्हणूनच पूर्वीपासून तीळ आणि तिळाचे तेल चिरतारुण्यासाठी वापरत असावेत.

रविवार, 17 सितंबर 2023

🕉️संपूर्ण गणपती स्थापना प्राण प्रतिष्ठा विधी अभिषेक सह🕉️

 🕉️संपूर्ण गणपती स्थापना प्राण प्रतिष्ठा विधी अभिषेक सह🕉️


पार्थिव गणेशाचे पूजन प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय करू नये. परंतु ब-याच वेळा गुरुजींची उपलब्धता होत नाही व इच्छा असूनही विधीवत पूजन करता येत नाही.


यासाठीच दत्तकृपा ज्योतिष व धार्मिक सेवा 8421684404 यांनी गुरुजी सांगतात तशी पूजा सर्व कृतींसह टायपिंग करून पाठवली आहे.


आपणही विधीवत पूजन करा व सर्व संबंधितांना फॉरवर्ड करुन विधीवत पूजन केल्याचे समाधान मिळवा


पार्थिव गणेश प्राणप्रतिष्ठा व पूजन...



पूजेची पूर्वतयारी


गणपतीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशी आरास करावी. क्वचित उत्तरेला चालेल परंतु त्यावेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल असे बसावे.


गणपतीसमोर २ पानांचे ५ विडे मांडावेत. देठ देवाकडे करावेत. त्यावर खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे व सुट्टे पैसे ठेवावेत. आपल्या समोर डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. डाव्या हाताशी पळी- भांडे ताम्हण व उजव्या हाताला पूजा साहित्याचे ताट ठेवावे. गणपतीच्या मूर्ती खाली पाटावर वस्त्र घालावे व थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. ही सर्व तयारी पुरेशी आधी करावी म्हणजे पूजेच्या वेळी धावपळ / चिडचिड होणार नाही.


पूजेस सुरवात


सर्वप्रथम आपल्या कपाळी गंध लावून घ्यावा


त्यानंतर उजव्या हातामध्ये थोडे पाणी घेऊन म्हणावे

।।करिष्यमान कर्मांगत्वेन कुलदेवी कुलदेवता कृपाशीर्वाद प्रापत्यर्थ फुगीफल तांबुलादी प्रदान करिष्ये।। 


 असे म्हणून एक विडा व नारळ देवापुढे ठेवून देवांना व मोठ्या माणसांना नमस्कार करावा व पूजेला सुरुवात करावी.



नंतर पूजेस सुरवात करावी प्रथम आचमन करावे :


डाव्या हातात पळी (चमचा) घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे. पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे.


१) केशवाय नमः

२) नारायणाय नमः     

३) माधवाय नमः    


चवथ्या नावाला पाणी हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.


४) गोविंदाय नमः।


पुन्हा पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे चवथ्या नावाला हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.


१) केशवाय नमः

२) नारायणाय नम:    

३) माधवाय नमः    

४) गोविंदाय नमः।


नंतर पुढील २० नावे म्हणावीत.


०५. विष्णवे नमः।


०६. मधूसूदनाय नमः। 


०७. त्रिविक्रमाय नमः।


०८. वामनाय नमः। 


०९. श्रीधराय नमः।


१०. हृषीकेषाय नमः।


११. पद्मनाभाय नमः।


१२. दामोदराय नमः।


१३. संकर्षणाय नमः । 


१४.वासुदेवाय नमः।


१५. प्रद्युम्नाय नमः।


१६.अनिरुद्धाय नमः।


१७.पुरुषोत्तमाय नमः।


१८. अधोक्षजाय नमः।


१९. नारसिंहाय नमः।


२०. अच्युताय नमः।


२१.जनार्दनाय नमः।  


२२.उपेंद्राय नमः।


२३. हरये नमः।


२४. श्रीकृष्णाय नमः।


यानंतर मनामध्ये गणपती, कुलदेवता, आई वडिल गुरुंचे स्मरण करुन नमस्कार करावा.


श्रीमन्महागणपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। 

कुलदेवताभ्यो नमः।

ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। 

वास्तुदेवताभ्यो नमः।

सर्व मातृ पितृ देवताभ्यो नमः।

आदित्यादी नवग्रह देवताभ्यो नमः।

एतद् कर्मप्रधानदेवता 

श्रीपार्थिव सिद्धीविनायकाय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नमस्तु।


आता संकल्प करावा : 


 उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता व पाणी घेऊन पुढील संकल्प करावा.


श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णा वेण्ण्याः उत्तरे तीरे शालिवाहन शके१९४५ अस्मिन् वर्तमाने शोभन नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ भौम वासरे स्वाती दिवस नक्षत्रे वैधृतीयोगे विष्टि करणे तुला राशि स्थिते चंद्रे कन्या राशिस्थिते सूर्ये मेष राशि स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथा राशिस्थानानि स्थितेषु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं (आपल्या गोत्राचा उच्चार करावा; गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र घ्यावे किंवा आडनावाचा उच्चार करावा) ............. गोत्रे उत्पन्नः (आपल्या नावाचा उच्चार करावा ) ............ अहं अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं श्री सिद्धिविनायक कृपाप्रसाद प्राप्त्यर्थं प्रति वार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक व्रत अंगत्वेन श्री पार्थिव सिद्धीविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ति यथाज्ञानेन यथामिलित सामग्र्यां प्राणप्रतिष्ठापना पूर्वकं ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये

 

हातातील पाणी व अक्षता ताम्हणात सोडाव्यात.


 आदौ निर्विघ्नता सिद्यर्थं महागणपति पूजनं/स्मरणं करिष्ये


 । पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.


(आमच्या घरातील सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख-शांति, समाधान, ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून मी हे व्रत करत आहे, तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी भावना मनात ठेवावी.)


उजव्या हाताला तांदळावर एक सुपारी ठेवून त्याची गणपती समजून पुजा करावी. किंवा शक्य नसल्यास फक्त गणपतीचे स्मरण करुन नमस्कार करावा.


श्री महागणपतये नमः । ध्यायामि ।  असे म्हणून सुपारीला अक्षता वहाव्यात.


श्री महागणपतये नमः । आवाहयामि। असे म्हणून पुन्हा अक्षता वहाव्यात.


श्री महागणपतये नमः । गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । असे म्हणून एक फूल गंध अक्षतात बुडवून वहावे


श्री महागणपतये नमः । हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि ।असे म्हणून हळदी कुंकु वहावे.


श्री महागणपतये नमः । दुर्वांकुरं विल्वदलं पुष्पाणि च समर्पयामि   असे म्हणून दुर्वा, बेल व फुले वहावीत.


श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि ।असे म्हणून उदबत्ती नीरांजन ओवाळावे / दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे.


श्री महागणपतये नमः । गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि । असे म्हणून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.


श्री महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि ।  असे म्हणून समोरच्या एका विड्यावर व फळावर थेंबभर पाणी सोडावे.


श्री महागणपतये नमः । मंत्राक्षतां समर्पयामि । असे म्हणून अक्षदा वहाव्यात.


श्री महागणपतये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि । असे म्हणून नमस्कार करावा.


अनेन कृत पूजनेन श्री महागणपती प्रीयताम् । असे म्हणून हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.


*कलशपूजन :–(पूजेसाठी पाणी भरून घेतलेल्या तांब्याची पूजा करावी तांब्यावर पालथा हाथ ठेवून खालील मंत्र म्हणावा)


कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥


  कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा   । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण: । अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।


  अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देव  पूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥


  गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥


  श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥


तांब्यावरील हाथ काढून त्या  कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी.


शंखपुजा -

शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥


  त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य  नमोऽस्तुते ॥


  शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥ असे म्हणून  गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करून शंखाची पूजा करावी (शंख उपलब्ध नसेल तर फक्त वरील मंत्र म्हणून नमस्कार करावा


घंटापूजा -

*आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुर्वे घंटा रवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥


  घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥


असे म्हणून घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी.


दीपपूजा -


*भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥


दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥


असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहावे. नमस्कार करावा.


ह्यानंतर कलश, शंख, घंटा व दिव्याची गंध अक्षता फूल वाहून पूजा करावी व नमस्कार करावा.


वरील पूजा केलेल्या कलशातील पाणी फुलाने किंवा तुळशीच्या पानाने स्वतःच्या अंगावर, मूर्तीवर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे.


 नंतर गणपतीच्या मूर्तीवर झाकलेला रुमाल/वस्त्र काढावे व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.


मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना :


सर्व प्रथम ह्या निर्जीव असणाऱ्या मातीच्या मूर्तीत देवाचे हात,पाय, डोळे इ. एकेक अवयव साकार होत आहेत आणि मूर्तीमध्ये प्राण येऊन ती सजीव होत आहे अशी मनामध्ये भावना करावी. मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवावा व पुढील मंत्र म्हणावा.


औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं  सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः ॥


औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ॥


औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ सर्वे इंद्रियाणि सुखं चिरं तिष्ठंतु नमः ॥ 


गर्भादानादि पंधरा संस्कार पूर्ण व्हावेत म्हणून पंधरा वेळा ‘-ओम ’ चा जप करावा 


नंतर देवाच्या दोन्ही डोळ्यांना दूर्वाच्या काडीने तूप लावावे. 


’श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः ’ असे म्हणत गंध अक्षता फूल हळदी-कुंकु वहावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः धूप समर्पयामि । दीपं दर्शयामि । असे म्हणत दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे


गूळखोबरे अथवा खडीसाखर किंवा साध्या साखरेचा नैवेद्य दाखवावा.

पुढच्या विड्यावर पाणी सोडून देवाला नमस्कार करावा.


अनेन कृत पूजनेन श्री पार्थिव सिद्धिविनायकः प्रीयताम् । असे म्हणून ताम्हणात एकदा पाणी सोडावे.


षोडशोपचार पूजा


हातामध्ये अक्षता घेऊन मनामध्ये गणपतीचे ध्यान करावे


एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामि ।। असे म्हणून अक्षता गणपतीच्या मूर्तीवर वहाव्यात.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । असे म्हणून अक्षता वहाव्यात


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि । असे म्हणून अक्षता वहाव्यात.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पाद्यं समर्पयामि । असे म्हणून मूर्तीवर दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अर्घ्यं समर्पयामि । असे म्हणून एक पळीभर पाण्यात गंध अक्षता मिसळून ते पाणी पाणी समोर ताम्हणात सोडावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आचमनीयं समर्पयामि ।  दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामि ।  दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि । दुर्वाच्या काडीने पंचामृत शिंपडावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि । दुर्वाच्या काडीने गंधमिश्रित पाणी शिंपडावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि।। दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूजार्थे गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । देवाला गंध, अक्षता, फूल वहावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। हळदी कुंकु वहावे.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती निरंजन ओवाळावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यार्थे पंचामृत शेषनैवेद्यं समर्पयामि। पंचामृताचा नैवेद्य दाखवावा


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूगीफल तांबूल सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि। पुढच्या विड्यावर पाणी घालावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्राक्षतां समर्पयामि। अक्षता वहाव्यात.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। देवाला नमस्कार करावा


अनेन पंचामृत पूजनेन श्री पार्थिव सिद्धिविनायकः प्रीयताम् । असे म्हणून ताम्हणात एक पळीभर पाणी सोडावे.


उत्तरे निर्माल्य अभिषेकमं कुर्यात।। असे म्हणून देवाला वाहिलेले फूल उचलून त्याचा वास घेऊन उत्तर दिशेला टाकावे व अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र ( प्रणम्य शिरसा देवं ..) म्हणत मूर्तीस दुर्वाच्या काडीने पाणी शिंपडून अभिषेक करावा २१ वेळा ’ गं गणपतये नमः’ असे म्हणत अभिषेक करावा.


अभिषेक :


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।


भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥


 प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।


तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥


 लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।


सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥


 नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।


एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥


 द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।


न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥


 विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।


पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥


 जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।


संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥


 अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।


तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ 


गणपती अथर्वशीर्ष 


ॐ नमस्ते गणपतये।


त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।।


त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।


त्वमेव केवलं धर्तासि।।


त्वमेव केवलं हर्ताऽसि।


त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।।


त्वं साक्षादत्मासि नित्यम्।


ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।।


अव त्वं मां।। अव वक्तारं।।


अव श्रोतारं। अवदातारं।।


अव धातारम अवानूचानमवशिष्यं।।


अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।।


अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।।


अव चोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात।।


सर्वतो मां पाहिपाहि समंतात्।।3।।


त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।


त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।


त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि।


त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।


त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।4।


सर्व जगदि‍दं त्वत्तो जायते।


सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।


सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।।


सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति।।


त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ:।।


त्वं चत्वारिवाक्पदानी।।5।।


त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।


त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।


त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।


त्वं शक्ति त्रयात्मक:।।


त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।


त्वं शक्तित्रयात्मक:।।


त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।


त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।


वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्।।6।।


गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।।


अनुस्वार: परतर:।। अर्धेन्दुलसितं।।


तारेण ऋद्धं।। एतत्तव मनुस्वरूपं।।


गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं।


अनुस्वारश्चान्त्य रूपं।। बिन्दुरूत्तर रूपं।।


नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।


गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। ग‍णपति देवता।।


ॐ गं गणपतये नम:।।7।।


एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।


एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।


रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्।।


रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।


रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्।।8।।


 भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्।।


आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम।।


एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:।। 9।।


नमो व्रातपतये नमो गणपतये।। नम: प्रथमपत्तये।।


नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।


श्री वरदमूर्तये नमोनम:।।10।।

पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमः अभिषेकमं समर्पयामि


नंतर देवाला फुलाने वासाचे तेल किंवा अत्तर लावून किंचित गरम पाणी शिंपडावे व पुन्हा चांगले पाणी शिंपडावे.


मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ पुसुन घ्यावी व पुढील पूजा करण्यापूर्वी मूर्ती नीट योग्य ठिकाणी बसली आहे ह्याची खात्री करावी.


कोणत्याही कारणास्तव पुन्हा मूर्ती हलवू नये.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुप्रतिष्टितमस्तु । ( अक्षता वहाव्यात )


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि । असे म्हणून प्रत्यक्ष गेजवस्त्र किंवा अक्षता वहाव्यात


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि । असे म्हणून देवाच्या डाव्या खांद्यावरुन उजवीकडे जानवे घालावे. नसल्यास अक्षता वहाव्यात


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।असे म्हणून गंध लावावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि । हळदी कुंकु वहावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि । शेंदूर, गुलाल, बुक्का इ. वहावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि ।  उपलब्ध फुले वहावीत व हार घालावा


अंगपूजन


खालील नावांचा उच्चार करून गणपतीला पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवावर अक्षता वहाव्यात


*१.   गणेश्वराय नमः ।


पादौ पूजयामि


२.   विघ्नराजाय नमः ।


जानुनी पूजयामि  


३.  आखुवाहनाय नमः।   


ऊरु पूजयामि  


४.   हेरंबाय नमः।


कटिं पूजयामि   


५.   लंबोदराय नमः। 


उदरं पूजयामि


६.   गौरीसुताय नमः ।


स्तनौ पूजयामि     


७.   गणनायकाय नमः ।


हृदयं पूजयामि


८.   स्थूलकंठाय नमः ।


कंठं पूजयामि  


९.   स्कंधाग्रजाय नमः ।


स्कंधौ पूजयामि  


१०. पाशहस्ताय नमः ।


हस्तौ पूजयामि


११. गजवक्त्राय नमः ।


वक्त्रं पूजयामि     


१२. विघ्नहर्त्रे नमः ।


ललाटं पूजयामि


१३. सर्वेश्वराय नमः।


शिरः पूजयामि


१४. गणाधिपाय नमः।


सर्वांगं पूजयामि


पत्री पूजन

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पत्राणि समर्पयामि असे म्हणून पत्री वहाव्यात


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि । दीपं दर्शयामि । उदबत्ती व निरंजन ओवाळावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यं समर्पयामि ।  मोदक किंवा पेढे  यांचा नैवेद्य दाखवावा


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। उत्तरापोशनं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। तीन वेळा ताम्हणात पाणी सोडावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । फुलाने गंध वहावे

 

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि।   विड्यावर पाणी सोडावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुवर्ण पुष्पं दक्षिणां समर्पयामि ।  देवापुढे दक्षिणा ठेवून त्यावर पाणी सोडावे


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। फलं समर्पयामि ।  नारळावर व फळांवर  पाणी सोडवर


पुढील प्रत्येक नावाला दोन-दोन दूर्वा गंधात बुडवून वहाव्यात.


१   गणाधिपाय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि । 


२  उमापुत्राय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।


३  अघनाशनाय नमः। 


दूर्वा युग्मं समर्पयामि । 


४   विनायकाय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।


५  ईशपुत्राय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।


६   सर्वसिद्धिप्रदायकाय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।   


७  एकदंताय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि । 


८   इभवक्त्राय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।


९  आखुवाहनाय नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।


१० कुमार गुरवे नमः।


दूर्वा युग्मं समर्पयामि ।


पुढील दोन मंत्रांनी एक दूर्वा वहावी


गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्र अघनाशन। एकदंत इभवक्त्रेति तथा च मूषक वाहन ॥

विनायक ईशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमार गुरवे नित्यं पूजनीय प्रयत्नतः ॥ दुर्वामेकां समर्पयामि । 



यानंतर १०८ नाममंत्राने  गणपती ला दुर्वा वहाव्यात:---


गणपतीची १०८ नामावली


  ॐ गजाननाय नमः। 

 ॐ गणाध्यक्षाय नमः। 

 ॐ विघ्नराजाय नमः। 

 ॐ विनायकाय नमः। 

 ॐ द्वैमातुराय नमः। 

 ॐ द्विमुखाय नमः। 

 ॐ प्रमुखाय नमः। 

 ॐ सुमुखाय नमः। 

 ॐ कृतिने नमः। 

 ॐ सुप्रदीपाय नमः। 

 ॐ सुखनिधये नमः। 

 ॐ सुराध्यक्षाय नमः। 

 ॐ सुरारिघ्नाय नमः। 

 ॐ महागणपतये नमः। 

 ॐ मान्याय नमः। 

 ॐ महाकालाय नमः। 

 ॐ महाबलाय नमः। 

 ॐ हेरम्बाय नमः। 

 ॐ लम्बजठरायै नमः। 

 ॐ ह्रस्व ग्रीवाय नमः। 

 ॐ महोदराय नमः। 

 ॐ मदोत्कटाय नमः। 

 ॐ महावीराय नमः। 

 ॐ मन्त्रिणे नमः। 

 ॐ मङ्गल स्वराय नमः। 

 ॐ प्रमधाय नमः। 

 ॐ प्रथमाय नमः। 

 ॐ प्राज्ञाय नमः। 

 ॐ विघ्नकर्त्रे नमः। 

 ॐ विघ्नहर्त्रे नमः। 

 ॐ विश्वनेत्रे नमः। 

 ॐ विराट्पतये नमः। 

 ॐ श्रीपतये नमः। 

 ॐ वाक्पतये नमः। 

 ॐ शृङ्गारिणे नमः। 

 ॐ अश्रितवत्सलाय नमः। 

 ॐ शिवप्रियाय नमः। 

 ॐ शीघ्रकारिणे नमः। 

 ॐ शाश्वताय नमः। 

 ॐ बल नमः। 

 ॐ बलोत्थिताय नमः। 

 ॐ भवात्मजाय नमः। 

 ॐ पुराण पुरुषाय नमः। 

 ॐ पूष्णे नमः। 

  ॐ पुष्करोत्षिप्त वारिणे नमः। 

 ॐ अग्रगण्याय नमः। 

 ॐ अग्रपूज्याय नमः। 

 ॐ अग्रगामिने नमः। 

 ॐ मन्त्रकृते नमः। 

 ॐ चामीकरप्रभाय नमः। 

 ॐ सर्वाय नमः। 

 ॐ सर्वोपास्याय नमः। 

 ॐ सर्व कर्त्रे नमः। 

 ॐ सर्वनेत्रे नमः। 

 ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः। 

 ॐ सिद्धये नमः। 

 ॐ पञ्चहस्ताय नमः। 

 ॐ पार्वतीनन्दनाय नमः। 

 ॐ प्रभवे नमः। 

 ॐ कुमारगुरवे नमः। 

 ॐ अक्षोभ्याय नमः। 

 ॐ भञ्जनाय नमः 

ॐ कुञ्जरासुर नमः 

 ॐ प्रमोदाय नमः। 

 ॐ मोदकप्रियाय नमः। 

 ॐ कान्तिमते नमः। 

 ॐ धृतिमते नमः। 

 ॐ कामिने नमः। 

 ॐ कपित्थपनसप्रियाय नमः। 

 ॐ ब्रह्मचारिणे नमः। 

 ॐ ब्रह्मरूपिणे नमः। 

 ॐ ब्रह्मविद्यादि दानभुवे नमः। 

 ॐ जिष्णवे नमः। 

 ॐ विष्णुप्रियाय नमः। 

 ॐ भक्त जीविताय नमः। 

 ॐ जितमन्मधाय नमः। 

 ॐ ऐश्वर्यकारणाय नमः। 

 ॐ ज्यायसे नमः। 

 ॐ यक्षकिन्नेर सेविताय नमः। 

 ॐ गङ्गा सुताय नमः। 

 ॐ गणाधीशाय नमः। 

 ॐ गम्भीर निनदाय नमः। 

 ॐ वटवे नमः। 

 ॐ अभीष्टवरदाय नमः। 

 ॐ ज्योतिषे नमः। 

 ॐ भक्तनिधये नमः। 

 ॐ भावगम्याय नमः। 

 ॐ मङ्गलप्रदाय नमः। 

 ॐ अव्यक्ताय नमः। 

 ॐ अप्राकृत पराक्रमाय नमः। 

 ॐ सत्यधर्मिणे नमः। 

 ॐ सखये नमः। 

 ॐ सरसाम्बुनिधये नमः। 

 ॐ महेशाय नमः। 

 ॐ दिव्याङ्गाय नमः। 

  ॐ मणिकिङ्किणी 

  ॐमेखालाय नमः। 

 ॐ समस्त देवता मूर्तये नमः। 

 ॐ सहिष्णवे नमः। 

 ॐ सततोत्थिताय नमः। 

 ॐ विघातकारिणे नमः। 

 ॐ विश्वग्दृशे नमः। 

 ॐ विश्वरक्षाकृते नमः। 

 ॐ कल्याणगुरवे नमः। 

 ॐ उन्मत्तवेषाय नमः। 

 ॐ अपराजिते नमः। 

 ॐ समस्त जगदाधाराय नमः। 

 ॐ सर्वैश्वर्यप्रदाय नमः। 

 ॐ आक्रान्त चिद चित्प्रभवे नमः। 

 ॐ श्री विघ्नेश्वराय नमः।


यानंतर निरांजन / कापूर लावून आरती करावी.


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि । स्वतः भोवती प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार करावा


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि । हातात फुले व अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणून ती फुले वहावीत. मंत्रपुष्पांजली येत नसल्यास ’वक्रतुंड महाकाय  श्लोक म्हणावा


यानंतर पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा.


आवाहनं न जानामि न जानामि तव अर्चनं । पूजां चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥


(पूजा कशी करायची मला माहित नाही. जसे  मला ज्ञान आहे तशी मी केली. काही चुकले असेल राहिले असेल तर माफ करा आणि सर्वांच्या घरात कायम सुख शांती समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी.)


श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि । 



सर्वांनी श्रद्धापूर्वक तीर्थ प्रसाद घ्यावा. 


fly