सोमवार, 6 दिसंबर 2021

गुरुदक्षिणा

 ★ गुरुदक्षिणा ★



 


गुरुदक्षिणा मराठी

गुरु दक्षिणा की परंपरा पर एक लेख

गुरु दक्षिणा का अर्थ

गुरु दक्षिणा का महत्व

गुरु दक्षिणा पर बौद्धिक

गुरु दक्षिणा में क्या देना चाहिए

गुरुदक्षिणा शब्द के सही समास विग्रह का चयन कीजिए

गुरु दक्षिणा की कथा 

मुग्धा गाडीतून उतरली.शाळेची इमारत बघून ऊर भरून आला. खूप बदल झाला होता.पंचवीस वर्षानंतर ती आज शाळेत येत होती.बाहेर शाळेपाशी नवीन दुकान झाली होती.ओळखू न येण्याइतका बदल.रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून,आज काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार होता,त्यासाठी खास ती सगळी कामं बाजूला सारून मुंबईहून आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नावाचे छोटेसे गाव,जिथे तिचं शालेय शिक्षण झालं होतं.ती शाळेच्या आवारात आली.ती आल्याची माहिती शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकांना दिली.मुख्याध्यापक,शाळेतले शिक्षक,सगळेच तिच्या स्वागताला बाहेर आले.


   "मुग्धाताई, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात यासाठी आपले मनःपूर्वक आभार."मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले.


  "अहो,आभार कसले मानता. ज्यांनी मला घडवलं,जिथे मी घडले त्या वास्तूत परत येण्याचं भाग्य मला मिळालं,अजून काय हवं.खर तर मीच तुमची ऋणी आहे.तुम्ही मला बोलावून माझा सन्मान केला.

मी एक विनंती करू का?" मुग्धाने विचारलं.


  "अहो,आज्ञा करा ताई.तुमच्यासारखी उच्चशिक्षित व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे,हा आमचा अभिमान आहे."


  "मला माझ्या वर्गात थोडा वेळ बसायचं आहे,तुमची हरकत नसेल तर." मुग्धा भावुक होऊन म्हणाली.


    "जरूर ताई,अजून काही निमंत्रित यायचे आहेत.कार्यक्रमाला अवकाश आहे.पांडुरंग तुम्हाला वर्गात घेऊन जाईल.अरे पांडुरंग,ताईंना जरा शाळा बघायची आहे."


  "जी सर,ताई मी वर्गाची चावी घेऊन येतो."पांडुरंग पळतच ऑफिसच्या दिशेने गेला.


    पांडुरंगने वर्गाचं दार उघडलं, "निवांत बसा ताई.कार्यक्रमाची वेळ झाली की तुमास्नी बोलवायला येतो."


   मुग्धाने हळुवार सगळ्या वर्गातून नजर फिरवली.आणि ती बसायची त्या दुसऱ्या बेंचवर येऊन बसली.तिने डेस्क वरून हळूच हात फिरवला.तिचे वाळलेले अश्रू तिथे दिसतात का,उगाच बघू लागली.


-----------------------------------------------


प्रगती पुस्तक क्लासटिचरने दिलं आणि मुग्धाला रडू आलं.ह्या चाचणीतही गणितात ती नापास झाली होती.आता घरी गेल्यावर आईचा कांगावा,बाबांची बोलणी ह्या सगळ्याला तोंड द्यावं लागणार होतं.गणित हा विषय तिचा शत्रू झाला होता. सातव्या वर्गापर्यंत कशीबशी पास व्हायची पण आता आठवीत तिला तो विषय खूप जड जात होता.शाळा सुटल्याची बेल वाजली आणि एकेक करून मुलं बाहेर जायला लागली.मुग्धा जागेवरच बसून होती.प्रीती तिच्याजवळ आली, " मुग्धा,शाळा सुटलीय. चल न घरी."


    "तु पुढे हो,मी येईन नंतर."मुग्धा तिच्याकडे बघायचं टाळत म्हणाली.


     प्रीती गेली आणि मुग्धा डेस्कवर खाली मान घालून रडायला लागली.तिला घरी जावसच वाटेना.शाळा बंद करायची वेळ आली तसा शिपाई वर्गाला कुलूप लावायला आला.त्याला मुग्धा खाली मान घालून बसलेली दिसली. 

  "ताई,काय झालं ग,बरं नाही वाटत का?"त्याने विचारलं.


   "नाही काका,मी ठीक आहे." असं म्हणत मुग्धाने दप्तर उचललं आणि वर्गाच्या बाहेर आली.घरचा रस्ता रोजच्यापेक्षा आज खूप लवकर संपला असं तिला वाटलं.


   घरी आल्यावर प्रगती पुस्तकावर सही घ्यायची म्हणून तिने वडिलांना दाखवलं.ते बघितल्यावर त्यांची नेहमीप्रमाणेच मुग्धावर आगपाखड सुरू झाली.

  "मंदबुद्धीची मुलगी आहेस तू.गणित विषयात नापास?आत्तापर्यंत काठावर का होईना पास तरी होत होतीस.आता खरी महत्वाची वर्षे आणि तू हे दिवे लावलेस.तुझ्याकडून काय अपेक्षा करणार?" त्यांनी रागारागाने ते प्रगती पुस्तक भिरकावून दिलं.


   आईने पण तिच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं.

   "अग, काय हे?अभ्यास करतेस का काय करतेस.तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं.तुझ्याकडे माझं लक्ष नाही,मुलगी आईसारखी निर्बुद्ध आहे,ही वाक्य मला ऐकावी लागतात.जरा तरी लाज बाळग ग.पुढच्या परिक्षेत हे असेच गुण उधळले तर तुझं शिक्षण बंद."


      रडून थकलेली मुग्धा सुजलेल्या डोळ्यांनी आईकडे बघत होती.एका क्षणी तिला वाटलं,खरंच मी परत नापास झाले तर बरंच आहे.मला पुढे शिकायचंच नाही.त्या रात्री न जेवताच ती झोपली.


  दुसऱ्या दिवशी प्रगती पुस्तकावर आईची सही घेतली आणि शाळेत निघाली.वर्गात कोण काय शिकवतय,ह्याकडे आज लक्षच नव्हतं.कालच आठवून सारखे डोळे भरून येत होते.संस्कृतचा पिरेड सुरू झाला.मुग्धाच्या आवडीचा विषय.ती जरा खुलली.संस्कृतचे शिक्षक; देशमाने सर वर्गात आले.

त्यांनी एक पेपर काढला आणि म्हणाले,"मुग्धा साने ह्या विद्यार्थिनीचा हा पेपर आहे.पूर्ण गुण मिळवले आहेत.पेपर कसा सोडवावा ह्याचं उत्तम उदाहरण.तुम्ही सर्वांनी हा पेपर एकदा बघावा."


   सरांचं ते बोलणं ऐकून मुग्धा एकदम संकोचली.तिला अशा कौतुकाची सवयच नव्हती.खरंच की,ह्या गणिताच्या नादात मला संस्कृतमधे पैकीच्या पैकी गुण आहेत हे मी विसरलेच. पण आईबाबांना पण हे दिसलं नाही ह्याचं तिला वाईट वाटलं.


  "मुग्धा,शाळा सुटल्यावर टीचर्स रुममधे ये, जरा तुझ्याशी बोलायचं आहे."देशमाने सर म्हणाले.


   "सर,आत येऊ का?" मुग्धा टीचर्स रुमच्या बाहेर उभी होती.


  "हो ये. तुझं प्रगती पुस्तक दाखव जरा."सरांनी सांगितलं.


    मुग्धाला आता भीती वाटायला लागली.सरांनी गणिताचे मार्क्स बघितले तर त्यांचं माझ्याबद्दल मत वाईट होईल.तिने खोटंच सांगितलं,"सर,मी आज आणलं नाही.घरी विसरले."


    "मुग्धा,मला माहितीय तु गणितात नापास झाली आहेस.माझं तुमच्या क्लास टिचरशी बोलणं झालंय."


   ते ऐकून मुग्धा परत रडायला लागली.


   "मुग्धा,रडणं थांबव.रडणं हा कमकुवतपणा आहे.मला सांग,तुला संस्कृत आवडतं न?"


    "हो सर,खूप आवडतं "मुग्धा मुसमुसतच बोलली.


   "संस्कृत ह्या विषयात तुला खूप शिकायचं असेल,पुढे यायचं असेल तर अजून तीन वर्षे तुला गणितावर लक्ष द्यावं लागेल.दहावीपर्यंत गणित हा विषय कंपलसरी असतो, तुला माहितीय.दहावीनंतर  तु आर्टस् घेऊ शकते.तुला हेच सांगायला मी बोलावलं आहे की तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस.असतो एखादा विषय कच्चा पण म्हणून तु बुद्धिमान नाहीस असं नाही.माझ्या विषयाची तु एक हुशार विद्यार्थिनी आहेस. मला तुला खूप शिकलेली,संस्कृतची अभ्यासक म्हणून बघायचं आहे.तेव्हा गणिताकडे थोडं लक्ष दे.संस्कृतवर लक्ष द्यायला मी आहेच.कळलं?"


   "हो सर,थँक्स,मी जाते."

मुग्धा टीचर्स रूमच्या बाहेर आली आणि तिला एकदम ओझं उतरल्यासारखच वाटलं.इतक्या सुंदर शब्दात सरांनी समजावलं.तिचा न्यूनगंड कमी झाला.हेच आईबाबा का करू शकले नाहीत?तिने ठरवलं,सरांच्या शब्दाला मान द्यायचा.


   मुग्धा नियमित गणिताचा अभ्यास करू लागली.आठवी,नववीत गणितात,खूप नाही तरी निदान पन्नास टक्के गुण तिला मिळाले.संस्कृतचा तर प्रश्नच नव्हता.त्यात पैकीच्या पैकी गुण ठरलेले होते.दहावी आली आणि मुग्धाने गणिताची शिकवणीच लावली.मनापासून अभ्यास करून एकूण नव्वद टक्के गुण मिळवून पास झाली.आणि संस्कृत ह्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून शाळेची शान वाढवली.शाळेने तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले.

आईवडिलांनाही प्रथमच मुलीचे कौतुक वाटले.


    वडिलांची मुंबईला बदली झाली म्हणून मुग्धाला भद्रावती सोडावं लागणार होतं.निघायच्या आधी ती देशमाने सरांच्या घरी गेली.


   "मुग्धा,तु माझी विद्यार्थिनी आहेस ह्याचा मला अभिमान वाटतो."सर म्हणाले.


   मुग्धाला काय वाटलं कुणास ठाऊक,ती एकदम सरांच्या पाया पडून रडायला लागली.सरांनी तिला उठवलं.

  "सर,मी पूर्णपणे खचले होते.तुमच्या शब्दांनी मला बळ दिलं."


   "मुग्धा,मला वचन दे,ह्यापुढे तु स्वतःला कमी लेखून रडणार नाहीस.अशा वेळेस मला आठव आणि डोळ्यातलं पाणी परतून लाव.खूप शीक,मोठी हो.तुझा आदर्श सर्वांपुढे ठेव."सरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं.


   "हो सर,मी नक्की प्रयत्न करेन.तुमचा आशीर्वाद, तुमचे मोलाचे शब्द मला आयुष्यभर प्रेरणा देतील."तिने वाकून सरांच्या पायावर डोकं ठेवलं.


    मुंबईत एका चांगल्या कॉलेजमधे मुग्धाने ऍडमिशन घेऊन आर्टस् घेतलं.शिक्षणाचा एकेक पल्ला गाठत,संस्कृत मधे एम ए,पी एच डी केलं.सगळ्या परीक्षांमधे मुग्धा सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी झाली.विद्यापीठात नोकरी लागून थोड्याच दिवसात ती संस्कृतची हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली.देशमाने सरांशी ती संपर्क ठेऊन होती.कुठलीही अडचण आली की त्यांना फोन करायची.तिच्या बुद्धीची जाणीव त्यांनी तिला करून दिली होती.


   काळ पुढे सरकत होता.मुग्धाची चाळीशी उलटली होती.आयुष्य व्यस्त झालं होतं.आणि अचानक एक दिवस शाळेतून फोन आला,माजी विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी मुग्धाला आमंत्रण आलं.तिने लगेच जायचं ठरवलं.तिला वृद्ध झालेल्या,थकलेल्या सरांना भेटायचं होतं. त्यांचा थरथरता हात डोक्यावर घेण्यासाठी ती आसुसली होती.


-----------------------------------------------


   पांडुरंग बोलवायला आला तशी मुग्धा आठवणीतून जागी झाली.ती बाहेर आली.निमंत्रित सगळे आले होते.तिची नजर देशमाने सरांना शोधू लागली.आणि तिने सरांना ओळखलं.तिला अगदी भरून आलं.ती झपाट्याने त्यांच्या दिशेने येऊ लागली.त्यांच्या जवळ जाणार इतक्यात मुख्याध्यापक म्हणाले, "मुग्धाताई,देशमाने सरांची वृद्धत्वामुळे दृष्टी अधू झालीय.ते तुम्हाला ओळखणार नाहीत."


  "मी बघते प्रयत्न करून."मुग्धा सरांजवळ आली,त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि उभी राहून त्यांचे हात हातात घेतले.


    "मुग्धा" सरांनी हाक मारली आणि मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती काही न बोलता सरांजवळ उभी होती.


   "मुग्धा,डोळे पूस.मला वचन दिलं होतंस न, रडणार नाहीस म्हणून."सर म्हणाले.


   "हो सर, पण हे अश्रू तुमच्यासाठी आहेत. ते तसेच वाहू द्या.माझी गुरुदक्षिणा समजा हवं तर" मुग्धा रडतच म्हणाली.


   "तुझं यश,तुझी कीर्ती ऐकली तेव्हाच मला माझी गुरुदक्षिणा मिळाली बाळा.तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."


   मुग्धाने सरांना हात धरून स्टेजवर आणलं. मुख्याध्यापकांना ती विनंती करणार होती की सत्कार तिचा नाही तर तिच्या श्रद्धास्थानाचा करावा,ज्यांच्यामुळे ती आज इथवर पोहोचली होती........


उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण!!🧵

 उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण!!🧵


खालील थ्रेड हा सत्य घटनांवर आधारित आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी इल्लूस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाच्या संपादकाला पुढील घटनांबद्दल सांगितलेले आहे.


दररोज सकाळी बिस्मिल्लाह खान यांचे मामा अली बक्ष हे शेजारी असलेल्या जडौ श्री बालाजी म्हणजेच महा-विष्णु मंदिरात जात होते. त्यावेळी त्यांना दिवसभर शहनाई वाजवल्यानंतर महिन्याला चार रुपये मिळायचे. बिस्मिल्लाह सुद्धा कधी-कधी सकाळी त्यांच्या मागे जायचे, त्यांचे संगीत ऐकायचे, मोहित व्हायचे आणि गोंधळून जायचे.


मामा आणि भाचे हे दोघे सकाळच्या सत्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जडौ मंदिरातील बालाजी मंदिरात जायचे. तेथे अली बक्ष यांच्यासाठी एक खोली नेमून दिली होती. दिवसभर जवळपास पाच तास ते तिथे सराव करित असे आणि ज्यावेळी अली बक्ष यांचा सराव संपायचा त्यावेळी त्यांना दिसायचं की, बिस्मिल्लाह हे त्यांच्यासमोर बसलेले आहेत आणि एका भुकेल्यासारखे ऐकताहेत.


बिस्मिल्लाहनी कधीही आपल्या मामांना त्रास दिला नाही. परंतु बिस्मिल्लाह नेहमी गोंधळून जायचे की, त्यांचे मामा हे बालाजी मंदिराच्या खोलीत सराव करण्यासाठी का जातात? कारण तोच सराव ते घरी सुद्धा करू शकतात आणि त्यांना कोणीही त्रास सुद्धा देणार नाही. याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना नेहमीच असायची आणि एकेदिवशी न राहवून त्यांनी मामांना याबद्दल विचारले.


मामांनी आपल्या कुलपावर शेवटचा हात मारला आणि उत्तर दिले, 'एकदिवस तुम्हाला ते नक्की कळेल'. बिस्मिल्लाहने पटकन विचारले, 'पण मामू मी शहनाई कधी वाजवणार?' आणि मामू म्हणाले, 'कधी वाजवणार? ही काय विचारायची गोष्ट आहे का? तू आजपासूनच सुरुवात करीत आहेस'.


लगेच मामा अली यांनी त्या संध्याकाळी बिस्मिल्लाह यांना जडौ महाविष्णू मंदिरात घेऊन गेले आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या 'त्या' खोलीत घेऊन गेले ज्या खोलीत त्यांनी रात्रीच्या शहनाई वादनानंतर जवळजवळ 18 वर्षे सराव केला होता. शेवटी मामू अली यांनी बिस्मिल्लाह खान यांना तिथे सराव करण्याची परवानगी दिली. ती परवानगी देत असताना मामू अली यांनी त्यांना एक 'ताकीद' दिली की, या मंदिरात जर तुला काही वेगळा अनुभव आला किंवा काही वेगळे दिसले? तर कोणाला काहीही सांगायचे नाही.


बिस्मिल्लाह खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या खोलीत चार ते सहा तास सराव केला, चार भिंतीच्या बाहेर होणार्‍या बदलांकडे दुर्लक्ष करून त्यांनी संगीताच्या सुर-तालाची नवीन उंची आणि खोली शोधून काढली, आपले संगीत सुधारण्याच्या इच्छेने बिस्मिल्लाह यांना झपाटून टाकले होते.


एकेदिवशी बिस्मिल्लाह खान हे पहाटे चारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात एकटेच होते आणि ते त्यांच्या शहनाईच्या सरावात मग्न होते. त्यावेळी अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली आणि जेव्हा त्यांनी बघितले तर ते दुसरे कोणी नसून 'भगवान बालाजी' होते.


'भगवान बालाजी' आपल्या शेजारी बसलेले असलेले बघून बिस्मिल्लाह हे स्तब्ध झाले आणि अवाक राहिले. त्यांचा अवाकपणा बघून भगवान बालाजीनी हसत हसत म्हटले की, 'वाजवा'. परंतु बिस्मिल्लाह हे अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते आणि त्यामुळे भगवान बालाजी हसले आणि तिथून निघून गेले.


बिस्मिल्लाह खान हे त्यादिवशी लगेच आपले गुरु आणि मामा अली बक्ष यांच्याकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तो प्रसंग ऐकताच मामा अली यांनी बिस्मिल्ला यांच्या गालफडात लावली आणि त्यांना सांगितले की, तुला मी सांगितलं होतं की काहीही वेगळे दिसले किंवा अनुभव आला तर कोणाला काहीही बोलायचे नाही. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची  व भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भेट झालेली होती.


मुस्लीम श्रद्धा असूनही प्रसिद्ध उस्ताद बिस्मिल्ला खान हे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रचंड आदर बाळगतात. ज्यामुळे दयाळू असलेला परमेश्वर श्रीकृष्ण हा त्यांच्यासमोर स्वतः प्रकट झाला असावा.


वरील कथा ही उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. जी 'मल्याळम मनोरमा'मध्ये डॉक्टर मधु वासुदेवन यांनी प्रकाशित केली होती.


बर्‍याच वर्षापूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान एकदा 'जमशेदपूर ते वाराणसी' असा रेल्वेने प्रवास करीत होते. उस्ताद हे कोळशावर चालणार्‍या पॅसेंजर ट्रेन मध्ये थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करीत होते.

एका मध्यम ग्रामीण रेल्वे स्थानकावरून ज्या बोगीत उस्ताद बसले होते त्याच बोगीत एक तरुण गोरक्षक आला. तो दिसायला सावळा आणि हडकुळा असलेला तरुण होता व तो बासुरी वाजवत होता.


उस्ताद असलेले बिस्मिल्ला त्या तरुणाच्या उत्तम दर्जाच्या संगीताने थक्क झाले. कारण तो तरुण कोणता 'राग' वाजवित आहे? याची सुद्धा त्यांना कल्पना येत नव्हती. उस्ताद बिस्मिल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, 'हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात 'भगवान श्रीकृष्ण' होते जे स्वतः 'परमात्मा' आहेत'.


तरुणाच्या (कृष्णाच्या) बासरीतून वाहू लागलेल्या या नाद-ब्रम्हातील (संगीताच्या रूपातील ब्रह्म) अमृततुल्यामुळे उस्तादांचे हृदय आनंदाने भरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 


त्या तरुणाच्या (कृष्णाच्या) या अतुलनीय बासरीवादनानंतर उस्तादांनी त्या तरुणाला (कृष्णाला) जवळ बोलावले आणि त्याला आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेतून एक चतुर्थांश भाग दिला व त्याला पुन्हा तोच 'राग' वाजवण्यास सांगितले. तो तरुण म्हणजे 'भगवान कृष्ण' बासुरीवादन करण्यास खुशीने तयार झाला आणि उस्ताद बिस्मिल्लाह यांच्याकडील सर्व रोख रक्कम संपेपर्यंत असेच चक्र सुरू राहिले आणि जेव्हा हे चक्र थांबले. त्याच्या पुढच्याच रेल्वे स्टेशन तो तरुण (कृष्ण) उतरला आणि गायब झाला.


खरं म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कुंभमेळ्याशी संबंधित एका संगीत मैफलीत भाग घेण्यासाठी जात होते. त्या मैफिलीत उस्ताद यांनी नवीन 'राग' जो त्यादिवशी त्यांनी कृष्णाकडून शिकला होता. तो शहनाईवर वाजवला. श्रोत्यांना त्यांचा हा नवीन सुरेल असा 'राग' इतका आवडला की उस्तादांना तो पुन्हा पुन्हा वादन करण्याची लोकांनी विनंती केली.


तिथे असलेल्या अनेक संगीत अभ्यासकांना त्या 'रागा'ला काय म्हणतात? हे समजू शकले नाही म्हणून त्यांनी बिस्मिल्लाह खान यांना याबद्दल विचारले. उस्ताद यांच्या म्हणण्यानुसार या रागाचे नाव  'कान्हारीरा' होते.


दुसर्‍या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या या नवीन मधुर 'रागा'बद्दलच्या बातम्या छापल्या गेल्या.


ते वाचून प्रसिद्ध संगीतकार (बासरीवादक) हरिप्रसाद चौरसिया यांनी बिस्मिल्ला खाँ यांच्याकडे 'कान्हारीरा'  रागाच्या गुंतागुंतीबद्दल विचारपूस केली.


उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी त्यांच्याकडे 'सत्या'ची कबुली दिली आणि 'कान्हारीरा' राग गाऊन दाखवला. तो ऐकल्यानंतर जगातील सर्वात महान बासरीवादक हरिप्रकाश चौरसिया यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू निघाले. 


'कान्हारीरा' हा  भारतीय संगीतातील एक पवित्र 'राग' आहे. कारण ते 'श्री' कडून आलेले आहे.  देवांचे देव कृष्णाच्या 'कमलरुपी' ओठांतून ते आलेले आहे.


जेव्हा त्यांच्या शिष्याचा सन्मान करण्याचा विचार भगवान   श्रीकृष्णाच्या मनात येतो तेव्हा त्यांच्या सन्मानाच्या पद्धती या खूप रहस्यमय असतात. भगवान श्रीकृष्ण हे जात, पंथ किंवा धर्मावर आधारित भेदभाव करत नाहीत. फक्त आणि फक्त 'भक्ती' इतकीच एक अट त्यांची असते.


सर्वं श्रीकृष्णार्पणम्‌ !


धन्यवाद!


fly