सोमवार, 4 सितंबर 2023

डाळिंब...आयुर्वेदिक उपयोग

  डाळिंब...आयुर्वेदिक उपयोग


डाळिंबाला संस्कृतमध्ये "दाडिम' म्हणतात.डाळिंबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते. खाण्याकरिता कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.


1.चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे शमन करते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते व जाठराग्नीला प्रदीप्त करते.

2.गोड डाळिंबाचा रस उत्तम पित्तशामक असतो, विशेषतः घशा-पोटात जळजळ होत असताना, लघवीस आग होत असताना, मळमळत असताना खडीसाखर मिसळलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो.

3.डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण रहाते. पचनशक्ती, कर्करोगावर उत्तम उपाय. शरीरातील उष्णता कमी करण्यास पण मदत होते.

4.डाळिंबाच्या सालीचे चूर्ण मधात मिसळून चाटल्यास घशातला कफदोष कमी होतो.

5.अनेक दिवसांचा कोरडा खोकला व दम लागत असेल, तर डाळिंबाचा रस व मधाचे चाटण दिवसभर वारंवार द्यावे.

6.कधी घट्ट व कधी पातळ मलप्रवृत्ती होत असता दाडिमाष्टक उपयुक्‍त असते.

7.गर्भारपणात सुरुवातीचे तीन-चार महिने पित्ताचा त्रास होतो, अशा वेळी गोड डाळिंबाचा रस थोडा थोडा घ्यावा. याने पित्त तर शमतेच पण ताकदही नीट राहते.

8.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.

9.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.

10.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

11.हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी गोड डाळिंबाचा रस उत्तम असतो.

Acidity व उपाय

 Acidity व उपाय          



जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी (acidity)असे म्हणतात. सामान्यत: आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो, जो अन्न पचवण्याचे व ते तोडण्याचे कार्य करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ (burning sensation) होणे अशी लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि खराब जीवनशैली (bad lifestyle) यामुळे ॲसिडिटी होते. त्याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या किंवा अति तेलकट व तिखट पदार्थ खाणाऱ्यानाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काही औषधांनी ॲसिडिटीचा कमी होऊ शकतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.




ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांना अन्ननलिकेत वेदना होणे तसेच जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे अशी लक्षणे जाणवतात. तर काही वेळा त्यांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास देखील होतो. जीवनशैलीत बदल करणे व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे या उपायांनी ॲसिडिटीवर उपचार करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांनीही ॲसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो.




अॅसिडीटीमुळे त्रस्त आहात? मग, ‘हा’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!



– पोटात जळजळ होणे


– घशात जळजळणे


– अस्वस्थ वाटणे


– आंबट ढेकर येत राहणे


– तोंडाची चव जाणे


– बद्धोष्ठतेचा त्रास होणे.


कशामुळे होतो ॲसिडिटी ?


1) सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे


2) धूम्रपान व मद्यपान करणे


3) ताणतणाव


4) पोटाचे आजार


कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ?


– मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.


– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.


– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.


– अन्न चावून चावून सावकाश खावे.


– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.


– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.


– गरज नसताना औषधं घेणे टाळावे.


fly