सोमवार, 4 सितंबर 2023

डाळिंब...आयुर्वेदिक उपयोग

  डाळिंब...आयुर्वेदिक उपयोग


डाळिंबाला संस्कृतमध्ये "दाडिम' म्हणतात.डाळिंबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते. खाण्याकरिता कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.


1.चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे शमन करते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते व जाठराग्नीला प्रदीप्त करते.

2.गोड डाळिंबाचा रस उत्तम पित्तशामक असतो, विशेषतः घशा-पोटात जळजळ होत असताना, लघवीस आग होत असताना, मळमळत असताना खडीसाखर मिसळलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो.

3.डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण रहाते. पचनशक्ती, कर्करोगावर उत्तम उपाय. शरीरातील उष्णता कमी करण्यास पण मदत होते.

4.डाळिंबाच्या सालीचे चूर्ण मधात मिसळून चाटल्यास घशातला कफदोष कमी होतो.

5.अनेक दिवसांचा कोरडा खोकला व दम लागत असेल, तर डाळिंबाचा रस व मधाचे चाटण दिवसभर वारंवार द्यावे.

6.कधी घट्ट व कधी पातळ मलप्रवृत्ती होत असता दाडिमाष्टक उपयुक्‍त असते.

7.गर्भारपणात सुरुवातीचे तीन-चार महिने पित्ताचा त्रास होतो, अशा वेळी गोड डाळिंबाचा रस थोडा थोडा घ्यावा. याने पित्त तर शमतेच पण ताकदही नीट राहते.

8.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.

9.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.

10.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

11.हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी गोड डाळिंबाचा रस उत्तम असतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly