मंगलवार, 11 मई 2010

अन्न पदार्थ आणि त्याचे पोषक मुल्य

केळी – आवडते व परवडणारे फळ
केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळ असून ते भरपूर प्रमाणात मिळते.  केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज.
केळयांमूळे  बरेच रोग बरे होण्यास मदत होते.

    * ऊदासीनता : केळ्यामध्ये एकप्रकारचे प्रोटीन असते त्याचे सेरोटोनीन मध्ये रुपांतर होते, ज्यामूळे खाणारे खुश व शांत होतात.
    * पाळीच्या आधीची लक्षणे (पी.एम.एस.): केळ्यात विटामिन बी ६ असते जे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखते, ज्याने स्वभाव ऊत्साही राहतो.
    * अशक्तपणा : जास्त प्रमाणात लोह असल्याने, केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते व अशक्तपणा घालविण्यास मदत मिळते.
    * रक्तदाब : केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटँशियम असते व कमी साखर, ज्यांमूळे रक्तदाबासाठी ते अत्यंत ऊपयूक्त आहे.
    * मेंदुची क्षमता वाढविण्यासाठी : संशोधनात असे सिद्ध झाले आहे की पोटँशियम असलेल्या फळांनी मेंदुचे बळ वाढविण्यास मदत होते.
    * जुलाब : केळ्यात फायबरचे देखील प्रमाण फार असते, त्यामूळे पचनाची रोजची सवय परत आणायला मदत होते, व जुलाब थांबतात.
    * जळजळ : केळ्याचा नैसगिक पाचक द्रव्यांनी शरीरावर परिणाम होतो, ज्यामूळे जळजळ शमते.
    * अल्सर: केळे हे पाचक अन्न म्हणून वापरले जाते, जे त्याच्या मऊपणामूळे आतड्यातील विकार दुर करते.  जास्त जळजळ शमवून ते आतड्याचा पापूद्रा बनते व आतड्याचे त्रास कमी करते.
    * स्ट्रोक : केळे जेवणात रोज खाणा-यांना, स्ट्रोकने येणा-या मृत्यूचे प्रमाण ४०% ने कमी होते.

तृण धान्य
तृण धान्य ही कमी चरबी व मीठाची असतात; त्यात भरपूर प्रमाणात लोह असते. त्याच्या कँलशियमच्या मोठ्या प्रमाणामूळेच, ते हदयासाठी, हाडांसाठी व नखांसाठी फार चांगले आहे.

    * त्यात मिसळलेले फायबरचे प्रमाण पण जास्त असते. एका खाण्यात( अर्धा कप,शिजविलेले) ४ ग्रँम घट्ट विरघळणारे फायबर (बीटा ग्लुकँन) असते. ह्या फायबर मूळे रक्तातील एल.डी.एल काँलेस्ट्राँलचे प्रमाण ज्याला वाईट काँलेस्ट्राँल म्हणतात ते कमी होते.
    * तृण धान्य जास्तीचे फँट शोषून घेते आणि ते संडास वाटे बाहेर फेकते. त्यात जास्त प्रमाणात फायबर असल्याने ते जुलाबाचा त्रास आणि पचना संबंधीचे त्रास देखील कमी करते.
    * तृण धान्य जास्त प्रमाणात घेतल्यास शरिरातील साखरेचे प्रमाण कमी करता येते व साखरेची पातळी राखता येते.
    * तृण धान्याचा ऊपयोग मेंदूच्या विकारावर देखील करता येतो.
    * तृण धान्याचा ऊपयोग गर्भाचे रोग आणि गर्भपिशवीच्या रोगातही आहे खास जेव्हा पाळी जाते तेव्हा याचा चांगला ऊपयोग होतो.
    * तृण धान्यात काही खास  फॅटीअँसीड आणि रोगप्रतीबंधक गुण आणि विटामिन ई आहेत ज्यामूळे पेशी निकामी होण्याचे प्रमाण कमी होते आणि कँसरचे प्रमाणही कमी होते.

सोमवार, 10 मई 2010

व्यक्तिगत स्वच्छता

आपण खात असलेलं अन्न, आपण ज्याप्रकारे आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित लैंगिक संबंध, हे सर्व शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात. आपल्या खेड्यांमधे अनेक रोग हे शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळं निर्माण होतात. परजीवी जंतू, कृमी, खरुज, फोड, दात किडणे, अतिसार आणि हगवण हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाळल्यानं होतात. स्वच्छतेचं पालन केल्यानं हे सर्व रोग टाळता येऊ शकतात.

डोक्याची स्वच्छता

    आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा शाम्पू किंवा अन्य एखादा घटक वापरुन (शिकाकाई) डोक्यावरुन अंघोळ करणे

    डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे 1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत 2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो. त्यामुळं वेदना होतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत 3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.


डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे

       1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत
       2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो.  त्यामुळं वेदना होतात.  त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत
       3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं.  त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.



त्वचेची निगा

       1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
       2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते.  एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
       3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.



तोंडाची स्वच्छता

        * दात घासण्यासाठी दातांची मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते.  दिवसातून दोनवेळा दात ब्रशने घासा – सकाळी, बिछान्यातून उठल्यानंतर लगेचच आणि रात्री झोपी जाण्यापूर्वी.  कोळशाची पावडर, मीठ, खरखरीत दाताची पावडर, इत्यादी घासण्यासाठी वापरल्यानं दातांच्या बाह्य आवरणावर चरे पडतात.
        * कोणताही खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्यानं चुळा भरुन टाका.  त्यामुळं अन्नकण दातांच्या फटीमधे अडकून बसत नाहीत, अन्यथा तोंडाला दुर्गंधी येते, हिरड्या खराब होतात आणि दात किडायला लागतात.
        * पोषणयुक्त आहार घ्या.  मिठाई, चॉकोलेट्स, आईसक्रीम आणि केक कमी प्रमाणात खावे.
        * आपल्याला दात किडण्याची लक्षणं आढळून आल्यास तत्काळ दंतवैद्यांचा सल्ला घ्या.
        * दांत काढण्यामुळं डोळ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होत नाही.

    त्वचेची निगा

       1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
       2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते.  एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
       3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.



हातांची स्वच्छता

       1. आपण आपल्या हातांनी अन्न खाणे, शौचानंतर धुणे, नाक स्वच्छ करणे, शेण गोळा करणे यांसारखी सर्व कामं करतो.  ती करत असताना, अनेक रोगकारक जंतू नखांच्या फटीत आणि त्वचेवर राहतात.  प्रत्येक काम केल्यानंतर आणि विशषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण घेण्यापूर्वी साबणाने हात धुतल्यानं अनेक रोग टाळण्यात मदत होते.
       2. आपली नखे नियमितपणे कापावीत.
       3. मुलं चिखलामधे खेळतात.  जेवण्यापूर्वी त्यांना हात धुण्याची सवय शिकवा.



शौच आणि मूत्र विसर्जनाची स्वच्छता

    शौच आणि मूत्र विसर्जनानंतर, संबंधित अवयव स्वच्छ पाण्यानं मागून-पुढून धुवावेत आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावेत.  आपले हात साबणाने धुण्यास विसरु नका.

    संडास, नहाणीघर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.  उघड्यावर शौचास बसू नये.



अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी

    अन्न शिजविताना घेतलेली थोडीशी काळजी कुटूंबाला अन्नातून होणा-‍या विषबाधेपासून, आजारांपासून दूर ठेऊ शकते.

        * अन्न ज्या ठिकाणी शिजविले जाते तो भाग व अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीे स्वच्छ असावीत.
        * शीळे किंवा दुषित अन्न खाणे टाळावे.
        * जेवायला बसण्यापूर्वी व जेवण वाढायला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
        * भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात.
        * अन्न योग्य पद्धतीने साठवून ठेवावे.
        * तयार खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्या वेष्टणावरील वापरण्याची मुदत तपासावी व मुदत संपली नसेल तरच तो पदार्थ खरेदी करावा.
        * स्वयंपाकघरातील कचर-‍याची योग्य विल्हेवाट लावावी.



औषधोपचार करताना घ्यावयाची काळजी

        * जखमांवर नियमीत योग्य मलमपट्टी करावी.
        * औषधे खरेदी करताना त्यांची मुदत तपासावी, मुदतबाह्य औषधे खरेदी करू नयेत.
        * नको असलेल्या औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
        * डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

पक्षाघात (स्‍ट्रोक)


बहुतेक वेळा मेंदूला रक्‍तपुरवठा करणार्‍या एखाद्या धमनीमध्‍ये अडथळा निर्माण झाल्‍यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या त्या भागाला हानी पोहोचते व तुमच्‍या शरीरातील मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा भाग निकामी होवू शकतो. उदा, तुमचा एखादा हात किंवा पाय किंवा वाचा निकामी होवू शकते. हे नुकसान तात्‍पुरते किंवा कायम स्‍वरूपाचेही ठरू शकते, आंशिक किंवा पूर्ण देखील असू शकते. लक्षणे आढळताच तुम्‍हांला पूर्णपणे औषधोपचार मिळाल्‍यास मेंदुच्या त्‍या भागाला पुन्हा रक्‍तपुरवठा चालू होवू शकतो असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे, ज्‍यामुळे जास्‍त नुकसान होत नाही.

मला पक्षाघाताचा झटका येत आहे हे मला कसे कळू शकेल?
  • चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्‍न किंवा कमकुवत होणे
  • दृष्टिमध्‍ये आकस्मिक अंधुकपणा येणे किंवा दिसणे बंद होणे, विशेषत: एका डोळ्याने
  • दुसरे काय बोलत आहेत ते न समजणे किंवा बोलायला त्रास होणे
  • कोणते ही कारण नसतांना अचानक डोके भयंकर दुखू लागणे 
  • चक्‍कर येणे, अस्थिर चाल किंवा पडणे, विशेषत: इतर लक्षणांसह
स्‍ट्रोकचे आणखी एक वॉर्निंग लक्षण म्‍हणजे ट्रान्जियंट इस्केमिक अटॅक (TIA). ह्याचा अर्थ म्‍हणजे लहान पक्षाघात ज्‍यामध्‍ये वरील लक्षणे अगदी शेवटच्‍या मिनिटांमध्‍ये दिसू शकतात आणि त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. TIA असलेल्‍या लोकांना कालांतराने पक्षाघाताचा झटका येण्याची शक्‍यता असते. जर TIAची लक्षणे तुमच्‍यात आढळून आली तर ताबडतोब तुमच्‍या डॉक्‍टरशी संपर्क साधा.


पक्षाघातामागील प्रमुख शक्यता
  • ऍथरोसिलेरोसिस (धमन्‍या कठोर होणे)
  • अनियंत्रित मधुमेह
  • उच्‍च रक्‍तदाब
  • उच्‍च कोलेस्‍ट्रॉल पातळी
  • धूम्रपान
  • पूर्वकालीन ट्रान्जियंट इश्मिक अटॅक (TIA)
  • हृदय विकार
  • कॅरोटिड धमनीचा विकार (मेंदूला रक्‍तपुरवठा करणारी धमनी)


मी पक्षाघात कसा काय टाळू शकतो?
शक्यतांबाबत तुमच्‍या फॅमिली डॉक्‍टरशी बोला (वरील शक्यता पहा) आणि तुम्‍ही कशाप्रकारे धोका टाळू शकता हे पहा. तुमचा धोका टाळण्‍यासाठी तुम्‍ही करू शकत असलेले काही उपाय येथे दिले आहेत:
  • तुम्हाला उच्‍च रक्‍तदाब असल्‍यास, डॉक्‍टरच्‍या सल्‍ल्‍यानुसार त्‍याचे नियंत्रण करा
  • फॅट आणि कोलेस्‍ट्रॉलयुक्‍त पदार्थ खाणे टाळा आणि फॅट आणि कोलेस्‍ट्रॉल कमी करण्‍यासाठी मीठ खाण्‍याचे प्रमाण कमी करा
  • तुम्‍हांला मधुमेह असल्‍यास, रक्‍तशर्करा पातळी नियंत्रित ठेवा
  • मद्यपानाचे प्रमाण कमी करा
  • धूम्रपान करणे सोडून द्या, करीत नसाल तर सुरू करू नका
पक्षाघात टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक आहे. ऍस्पिरिनचे लहान डोस तुमचा पक्षाघाताबाबतचा धोका कमी करू शकतात का याबाबत तुमच्‍या डॉक्‍टरला विचारा. ऍस्पिरिन तुमच्‍या रक्‍तामध्‍ये गाठी पडू देत नाही आणि यामुळे तुमच्‍या धमन्‍यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही.

Kindle Wireless Reading Device (6" Display, Global Wireless, Latest Generation) 

कंपवात (अलझायमर्स रोग)


कंपवात रोग ही मेंदूची एक विकृती असून तिचे नांव हा रोग ज्यांनी पहिल्यांदा विशद केला त्या अलॉईस अलझायमर यांच्या नांवे ठेवण्यात आले आहे.
लक्षणे
  • हा वाढत जाणारा आणि जीवघेणा असा मेंदूचा आजार आहे.
  • अलझायमर मेंदूच्या पेशी नष्ट करतो, त्यामुळे स्मृती, विचार आणि वागणूक यांच्यात इतकी तीव्र समस्या येते की काम किंवा सामाजिक जीवन विस्कळीत होते.
  • अलझायमर हा काळानुसार वाढतच जातो आणि तो जीवघेणा ठरतो.
  • स्मृतीभ्रंशाचं हे सर्वात सामान्य स्वरुप आहे (स्मृती नष्ट होणे) आणि इतर बौध्दीक क्षमता इतकी समस्याग्रस्त होते की दैनंदीन जीवन गडबडून जाते.

अल्झायमरची १० धोकादायक चिन्हे
१.. स्मृतीभ्रंश
अलीकडेच वाचलेले लक्षात न राहणे हे डेमेन्शियाचे अगदी सामान्य लक्षण आहे. व्यक्ति विसरायला लागते व मग मागील काहीच आठवणे अवघड होऊ लागते.

२. घरगुती कामे देखील अवघड वाटणे
डेमेन्शिया असणा-यांना काही ठरवणे अवघड वाटते किंवा दिवसभराची कामेदेखील अवघड वाटतात. घरकामातील स्वयंपाक कसा करावा या देखील गोष्टी फार अवघड वाटू लागतात, फोनवर बोलणे अवघड वाटते आणि कुठलाही खेळ खेळणे अवघड वाटू लागते.

. भाषेत चुका
अल्झायमर असलेल्याना अगदी सोपे शब्द किंवा त्याचे पर्यायदेखील आठवत नाहीत, त्यांचे भाषण तयार करता येत नाही व काही लिहायला, समजायला अवघड जाते. त्यांना कधीकधी आपला तोंडधुण्याच्या ब्रशला काय म्हणतात हे आठवत नाही व ते माझे तोंड धुण्याचे ते काय कुठे आहे असे विचारु लागतात.

. जागा व वेळेचे भान न राहणे
अल्झायमर असणा-यांना त्यांच्या स्वतःच्या शेजारच्या घरातदेखील हरवल्यासारखे होते, ते कुठे आहेत हे विसरतात आणि ते इकडे कसे आले आणि आता परत कसे जायचे ते विसरतात.

. तर्कज्ञान बिघडते
अल्झायमर असणा-यांचे कपडे घालणे बिघडते, गरमीत ते कपड्यांवर कपडे घालतील आणि थंडीत फार कमी कपडे घालतील. त्यांचे तर्क ज्ञान चुकते, जसे ते कोणा अनोळख्याला मोठी रक्कम देतात.

. संक्षिप्त विचारांमध्ये गडबड
ज्यांना अल्झायमर आहे ते मेंदुची कामे करताना गडबड करतात, जसे आकडे विसरणे व ते कसे वापरायचे ते न आठवणे.

. वस्तू जागच्या जागी न ठेवणे
अल्झायमर असलेल्या व्यक्ति त्यांच्या वस्तू कुठेतरी ठेवतात व त्या नंतर शोधत राहतात किंवा इस्त्री फ्रीज मध्ये ठेवतात.

. त्यांचा स्वभाव लहरी बनतो
काही अल्झायमर असलेल्या व्यक्ति अचानक स्वभाव बदलतात – जसे रागावतील मग हसतील मग रडतील – काही कारण नसतांना.
. वागण्या बोलण्यात फरक डेमेन्शिया असलेल्यांच्या वागण्यात नाटकीय बदल आढळतो. ते एकदम संशयी, तर कधी चुकलेले, तर कधी घाबरट कधी घरातील इतरांवर अवलंबुन असे दिसतात.

१०. पुढाकार घेत नाहीत
अल्झायमर झालेली व्यक्ति एकलकोंडी बनते, ते टीव्ही समोर तासनतास बसुन राहतात, झोप काढत राहतात किंवा रोजची कामेदेखील व्यवस्थित करत नाहीत.
जर तुम्हाला यातील कोणतीही धोक्याची चिन्हे तुमच्यात किंवा तुमच्या प्रियजनांत दिसली तर, वैद्यकिय सल्ला घ्या व शोधा की तो अल्झायमर किंवा डिमेंशिया होण्याची चिन्ह तर नाहीत व योग्य उपचार घ्या, काळजी घ्या आणि सल्ला घ्या.
 

अलझायमर्स आणि मेंदू
आपणे जसे वृध्द होत जातो, तशी आपली विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता मंदावते.  परंतु, स्मृतीचे गंभीर नुकसान, संभ्रम आणि इतर मुख्य बदलांनी आपले मन ज्याप्रकारे काम करते ते बदलते आणि हा काही वृध्दत्वाचा सामान्य भाग नाही.  मेंदूच्या पेशी निकामी होत असल्याचे ते एक चिन्ह असते.
मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात.  प्रत्येक चेतापेशी इतर अनेक पेशींसोबत संवाद साधून जाळी बनवतात. चेतापेशींच्या या जाळ्यांची विशेष कार्य असतात.  त्यापैकी काही विचारात, शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात गुंतलेली असतात.  इतर आपल्याला पाहण्यास, ऐकण्यास आणि गंध घेण्यास मदत करतात.  आणखी इतर आपल्या स्नायूंना हालचाल करण्यास सांगतात.
हे काम करण्यासाठी, मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात.  ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कच-याची विल्हेवाट लावतात.  पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळंकाही चालू ठेवण्यासाठी समन्वय लागतो तसंच मोठ्या प्रमाणात इंधन आणि ऑक्सीजन लागतो.
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात.  नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात.  अंततः त्या मरतात.
थर आणि टँगलची भूमिका
थर आणि टँगल्स हे दोन असामान्य घटक चेतापेशींना नुकसान पोचवून त्यांना मारुन टाकण्यात मुख्य संशयित आहेत.
थर हा चेतापेशींच्या मधे जमा होतो आणि टँगल्स हे पीळ पडलेले तंतु असतात जे मरणा-या पेशींच्या आत तयार होतात.  बहुतांश लोकांना ते वृध्द होतात तसे हे थर आणि टँगल्स तयार होतात तरीही अलझायमर्स असलेल्यांना ते अधिक संख्येने होतात.  थर आणि टँगल्स हे शिक्षण आणि स्मृतीसाठी महत्वाच्या भागांमधे तयार व्हायला लागतात आणि नंतर अन्य भागांमधे पसरतात.
प्रारंभिक टप्पा आणि लवकर प्रारंभ
प्रारंभिक टप्पा हा अलझायमर्सच्या सुरुवातीचा भाग असतो जेव्हा स्मृती, विचार आणि एकाग्रता यांची समस्या दिसू लागते.  लवकर येणे याचा अर्थ हा रोग एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षाच्या आधी येतो.
उपचार
यावर सध्या उपचार उपलब्ध नाही.  परंतु लक्षणांसाठी उपचार आणि त्यासोबत, योग्य सेवा आणि आधार मिळाला तर अलझायमर्स असणा-या लोकांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं.

मधुमेह

सध्याचे जीवघेणे स्पर्धेत मानवी जीवन गतीमान झाले आहे. मानव जगाशी व स्वता:शी स्पर्धा करतांना एखाद्या सतत चालणाऱ्या मशिन सारखा काम करु लागला आहे. परिणामी त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही व आरोग्याकडे दुर्लक्ष व त्यामूळे अनेक व्याधी व विकारांनी जखडला जातो मानवाच्या शरीर व मनाची क्षमता भरपुर असते. प्रतिरोध शक्ति भरपुर असते, ८०% आजार वाढलेला असतो तो पर्यंत माहित पडत नाही. जो पर्यंत आजारासाठी डॉक्टराकडे जावे लागत नाही तो पर्यंत त्याला आजाराची जाणीव होत नाही, तेव्हा त्याला आरोग्याची जाणीव होते तोपर्यंत आजार वाढलेला असतो. कित्येक रुग्ण असे आहेत की, ज्यांनी दवाखान्यात पाउल टाकले नाही. साधी इंजेक्शन, गोळी ही घेतली नाही. अचानक आजारी पडले, हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले ते वाचले आणी ३०,०००/- रु. बिल झाले. जीवनावर बंधने लादली गेली नियमीत डॉक्टरांकडे तपासणी सुरु झाली. २ लाख, ३ लाख त्या पेक्षाही जास्त पण हॉस्पिटलचे बिल इतके झालेले आहेत. बील झाल्यानंतर ही व्यक्ति वाचतोच असे नाही. टेंशन आणी ताणतणाव मुळे शरीराची ब्लड शुगर व ब्लड प्रेशर मध्ये वाढ होते. तर इतर गोष्टिंचा तर प्रश्नच नाही. सध्या वायु प्रदुषण, पाणी प्रदुषण, अन्न प्रदुषण व भेसळ, बैठी जीवन पध्दती, अनियमित जेवण, अनियमित दिनचर्या, वाढते ताणतणाव इत्यादी अनेक कारणामुळे शरीरावर व मनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परीणाम होत असतो जो पर्यंत रोग जास्त प्रमाणात वाढत नाही तोपर्यंत त्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे नियमित संपुर्ण शरीर तपासणी अतिशय महत्वावी असते. मुंबई, पुणे मध्ये व्यक्ती दर वर्षी टोटल बॉडी चेक-अप करतात. विदेशांमध्ये नोकरी लागण्या आधी टोटल बॉडी चेक-अप करावी लागते व फ़िजीकल फ़िटनेस पाहीला जातो. शरीरामध्ये प्रत्येक अवयवांचे प्रत्येक अवयवांशी संबंध असतो. जसा नाकाचा संबंध कानाशी असतो डोळ्यांचा मेंदुशी असतो (ऑप्टीक नर्वद्वारे) त्याचे प्रमाण हाडाचे, मसल्याचे आर्टडीचे, वेन्सचे, नर्वचे जाळे पसरलेले असते. एकमेकांनमध्ये गुसटलेले असतात. एका अवयवाचा बिघाड झाल्यास सर्व अवयव खराब होऊ शकतात उदा. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर वाढलेली असली कि डोळे, हार्ट, किडनी, मन संस्था व इतर अवयवांनवर परिणाम होतो. म्हणून कोणत्याही प्रकारची शस्त्र क्रिया ऑपरेशन करण्याआधी डॉक्टर रक्त दाब, रक्तातील शुगर / साखरचे प्रमाण नॉर्मल लेव्हलवर आणतात. मग ऑपरेशन करतात. शुगर असो की, बीपी किंवा कोणतीही लेव्हल नॉर्मल ठेवावी लागते. बरेचसे डायबेटीस व रक्त दाब व इतर आजाराचे रुग्ण इतके तरबेज होऊन जातात कि डॉक्टर व नर्सच्या सानिध्यात राहून ते त्यांचे शुगर नॉर्मल ठेवतात. ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक अधिक दुर्लक्ष करतात. आणि शुगर कमी झाली काय व वाढली काय काही फ़रक पडत नाही. अशा लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. वाढलेली शुगर डोळे, हार्ट, किडनी, मज्ज संस्था इतर अवयवांनवर परिणाम करते. मधुमेह सगळ्यात वाईट आजार मानला जातो. म्हणून मधुमेहाला किंग ऑफ़ द डिसीज म्हणतात. काही लोकांचे डोळे जातात, तर काहींना हार्ट अटॅक आल्यावर ही कळत नाही.




टोटल बॉडी चेक-अप म्हणजे काय ?

अनेकांना प्रश्न पडतो, टोटल बॉडी चेक-अप सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर कडून तपासणी, जनरल कोणत्याही व्यक्तीला साधारणपणे पाच-सात त्रास असतात. डोळे दुखतात, डोळे आग मारतात, डोळ्यांना पाणी येते, कान ठनकतात, छाती मध्ये दुखते, जेवण जात नाही, अपचन होते, कमी कामात थकवा येतो, वजन कमी किंवा जास्त होते, पायाच्या टाचा दुखतात, वेळो वेळी लघवी लागते, वेळो वेळी तहान लागते, व त्वचेचा पण आजार हात पाय पण दुखतात, छाती मध्ये कळ येते, इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. कोणताही त्रास असेल तर मनात निरनिराळ्या शंका येतत. मधुमेह असेल काय? रक्त दाब असेल काय? रक्त कमी असेल काय? डोळे नाक कान ह्यात दोष असेल काय? ह्रदयात दोष असेल काय? पोटात गडबड आहे? किडनी लिव्हर बरोबर काम करत असेल का? चरबी (कोलेस्टेरॉल व ईतर लिपीड) वाढलेले असतील का? इ. अनेक प्रकारच्या शंका-कुशंका उत्पन्न होतात. कोणत्याही डॉक्टर्कडे गेल्यावर ते त्यांच्या विभागाचे बघतात. उदा. डोळ्यांचे डॉक्टर डोळे बघतात, कानाचे डॉक्टर कान बघतात, दातांचे डॉक्टर दात तपासतात, हाडांचे डॉक्टर हाडांची तपासणी करतात, आणि ते व्यक्ती आपल्या विभागाच्या तपासण्या करतात व दुसरा त्रास असल्यास संबंधीत स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवतात व ते बरोबरही असते. टोटल बॉडी चेक-अप मध्ये कित्येक पटीचे फ़ायदे आहेत. कारण सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर्स पेशंटला असलेल्या आजारावर आपले लक्ष केंद्रित करतात जेणेकरुन निदान व्हायला सोपे जाते व प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यावी हे पण मार्गदर्शन करतात. व्यक्ती वरुन पाहिल्यावर तंदुरुस्त वाटतो पण आतुन त्याच्यात काय दोष आहे याचा पत्ता लागत नाही. टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते. साधारण तपासणी मध्ये जे आढळत नाही ते टोटल बॉडी चेक-अप मध्ये आढळून येते. कारण टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते अनुभवी तज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर व मशिनरीच्या साह्याने बारकाईने तपासणी केली जाते. इतकेच नव्हे तर पुर्ण दिवसाच्या दिनचर्येचा आढावा घेतला जातो. टोटल बॉडी चेक-अप मध्ये डोळे, नाक, कान, घसा, कानाचा ऑडियोग्राम घेतला जातो. रेडिओलॉजीस्ट कडून छातीचा एक्सरे चेस्ट घेतला जातो. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इ.सी.जी.) लीपीड प्रोफ़ाईल (कोलेस्टेरॉल व इतर लीपीड्स) चे प्रमाण तपासणी केली जाते.

रेडिओलॉजीस्ट (तज्ञ सोनोग्राफ़ी) द्वारे किड्नी लिव्हर मॅजीक बॉक्स (पोटात) विविध अवयवांची तपासणी केली जाते. हाडंचे डॉक्टर व्यायमाबाबत मार्गदर्शन करतात. त्वचा व गुप्त रोग तज्ञ तपासणी करतात व रक्तामध्ये व्हि.डि.आर.एल. टेस्ट, एडस इ. महत्वाच्या तपासण्या केल्या जातात शेवटी ताणतणाव नियंत्रण व क्वॉलिटी ऑफ़ लाईफ़ साठी मनाचे तज्ञ तपासणी करतात व जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला जातो. मारोती कार असो फ़्रिज, टी. व्ही., कॅमेरा किंवा कोणतेही मशिन असो त्या वस्तुंचा बेस्ट वापर करता येईल किंव चांगल्या रितीने कसे मेंटेन करता येईल याठी युझर्स मॅन्युअल पुस्तक दिले जाते. पण या शरीर रुपी मशीन बरोबर कोणतेही पुस्तक दिले जात नाही. म्हणून माणसाला परिस्थिती फ़िरवत जाते तसे तॊ फ़िरत जातो. सकाळी ५ वाजे पासुन मानव रुपी गाडी सुरु होते व दिवसभर ओढाताण करुन रात्री उशीरा पर्यंत शरीर रुपी गाडी धावतच जाते. स्वत:चे नोकरी, व्यवसाय, नातेवाईक सर्वांसाठी वेळ असतो पण स्वत:च्या आरोग्यासाठी कोणालाच वेळ नसतो. हे किती दुर्दैव आहे. याचाच परिणाम एक दिवस आपल्याला व्याजासकट मोजावा लागतो. टोटल बॉडी चेक-अप अतिशय फ़ायदयाचे आहे ज्या प्रमाणे आपली स्कुटर, मोटार सायकल, मारोती कार, ई. ची दर सहा महीन्यांनी ओव्हर आइलींग (सर्व्हीसींग) करतो तसेच व आपल्या शरीरुपी गाडीचे पण वर्षातून एक वेळा तपासणी करुनच घ्यायला पाहीजे.

मधुमेह (डायबेटीस) हा एक महाघातक आजार आहे. शरीरात इन्शुलीन हे हार्मोन कमी प्रमाणात तयार होणे अथवा योग्य प्रमाणात असूनसुद्धा शरीराने त्याला दाद न देणे अशा दोन कारणांमुळे हा आजार होतो. इन्फेक्‍शन, अपघात, फ्रॅक्‍चर, जखमा, मानसिक तणाव, औषधांचे चुकलेले डोस यांनी सुद्धा आजार वाढत जातो. कालांतराने या आजारात शरीरातील हृदय, मेंदू, किडनी, डोळे, लिव्हर काम, रक्तवाहिन्या आदी महत्त्वाच्या अवयवांमध्ये बिघाड उत्पन्न होतात. पूर्णोपचारांमध्ये रुग्णाच्या संपूर्ण शरीराचा एनर्जी बायोफिल्ड स्कॅन सर्वप्रथम करून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेतला जातो व त्याला अनुसरून ऍलोपॅथीच्या सोबत ऍक्‍युपंक्‍चर (वेदनारहित युरोपियन सुयांची आधुनिक टेक्‍नॉलॉजी), पंचकर्म, योग्य आहार व जीवनशैली योग आणि व्यायाम असा एकत्रित उपचार केला जातो.

या उपचारांमुळे सहा महिन्यात डायबेटीस मुळापासून जातो. असा अशास्त्रीय दावा मी मूळचा ऍलोपॅथीतज्ज्ञ असल्याने करणार नाही. पण पुरेशा उपचारांमुळे बऱ्याच रुग्णांचा मधुमेह कायमचा बरा होऊन हळूहळू त्यांची सर्व औषधे बंद होतात. गॅंग्रीन, न्युरोपॅथी, डायबेटीक रेटीनोपॅथी, किडनी व मेंदूविकार आदी कॉम्प्लीकेशन्ससुद्धा पूर्णोपचारांमुळे आटोक्‍यात लवकर येतात.
Won Park is the master of Origami. He is also called the "money folder", a practitioner of origami whose canvas is the United States One Dollar Bill.




ATT00022.jpg














 


ATT00040.jpg





 .








 











 








A


A











 

A


शुक्रवार, 7 मई 2010

ही वेब यादी आपल्याला नक्की आवडेल याची आम्हांला खात्री आहे.

http://www.sadha-sopa.com
तुमच्या माझ्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या साध्या सोप्या कवितांची ही एक ऑनलाईन मैफील... इथे जेंव्हा यावंसं वाटेल तेंव्हा या... जे वाचावंसं वाटेल ते वाचा... आणि घटकाभर मन रमवून आपल्या कामाला लागा!

मराठी गझल - एक अखंड मैफल
http://www.marathigazal.com
मराठी गझल लिहिण्या, वाचण्या, शिकण्यासाठीचं एक हक्काचं स्थान... मराठी गझलेचं एक मानाचं पान!

अमृतानुभव
http://www.amrutanubhav.com/
संत ज्ञानेश्वर लिखित अमृतानुभव या ग्रंथाला समर्पित संकेतस्थळ

मिळून सार्‍याजणी
http://www.miloonsaryajani.com
मिळून सार्‍याजणी : स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक...

स्वीकृती सायकोथेरपी सेंटर
http://www.sweekruti.org
प्रत्येकाला मन आहे... काही ना काही समस्या आहेत... सर्व समस्यांचे मूळ प्रत्येकाच्या मनातच आहे... या समस्यांचा गुंता सोडवायचा असेल तर थोडं धाडस करावं, संकोच बाजूला ठेवावा आणि आत्मशोधाच्या यात्रेला सुरुवात करावी... सोबतीला आम्ही आहोतच...

महर्षी विनोद - जीवन व कार्य
http://maharshivinod.org
वाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्याचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व

डॉ विनोद योग क्लिनिक
http://patanjalyoga.org
Yoga for Health and Health for Spiritual wealth.

विश्वचैतन्य मिशन - कल्पवृक्ष
http://www.vishwachaitanyamission.com/
Kalpavruksha is a science of Prayer that has power to transform an ordinary individual into an extra ordinary one. It is developed by Shri Vishwachaitnya swami after research of over two decades.

दिलीपराज प्रकाशन
http://www.diliprajprakashan.com
ज्ञान, मनोरंजन आणि खूप काही...

प्रतिमा प्रकाशन
http://www.pratimaprakashan.com
१९८३ साली अरुण पारगावकर यांनी प्रतिमा प्रकाशन या संस्थेची स्थापना केली. २००८ मध्ये या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. प्रतिमा प्रकाशनाने १७ मार्च २००८ रोजी रौप्यमहोत्सव समारंभपूर्वक साजरा केला.

महाबळेश्वर साहित्य संमेलन
http://www.mahabaleshwarsahityasammelan.com
महाबळेश्वर येथे झालेल्या ८२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकेतस्थळ

लोकसंवाद
http://www.loksanwad.com
लोकांनी लोकांशी लोकांकरिता साधलेला सुसंवाद....संवाद... साधला जातो शब्दांमधून.... सुरांतून.... कधी शब्दसुरांच्या मैफलीतून...तर कधी नि:शब्द शांततेतून..

विवेक काजरेकर
http://www.kajarekar.com
विवेक काजरेकर... नव्या पिढीचे, ताज्या दमाचे मराठी संगीतकार

मानवंदना
http://www.maanvandana.com
पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्राची मानवंदना

आझमभाई पानसरे
http://www.azampansare.org
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस(I) व RPI आघाडीच्या मावळ मतदार संघातील २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार यांच्या निवडणून प्रसाराची वेबसाईट

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
http://www.masapaonline.org
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे संकेतस्थळ

अनुसंधान
http://www.anusandhan.org
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज

श्री साई अध्यात्मिक समिती
http://srisaiadhyatmiksamitipune.org
श्री.साई अध्यात्मिक समिती” ने मानवी जीवनाचा सखोल अभ्यास करून, प्राप्त झालेले “ज्ञान” सिध्दसिध्दांत पध्दतीतून सिध्द केले आहे.ते जसजसे सिध्द होत गेले तसतसे ते ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावे या हेतूने समितीने प्रसंगोपात प्रकट केले आहे.

८३ वे मराठी साहित्य संमेलन
http://www.sahityasammelan2010.org
पुणे येथे झालेल्या ८3 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकेतस्थळ

महापॊलिटिक्स
http://www.maha.marathiwebsites.com
यात मीडिया, राजकारण आणि प्रशासन या क्षेत्रांतल्या खडानखडा घडामोडी तुमच्यासाठी अतिशय वेगाने उपलब्ध आहे तसेच अन्य महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषणही आहेच. याशिवाय आणखी एका सेग्मेंटमध्ये त्याचे फोटो विडियोही उपलब्ध आहेत.

राजहंस प्रकाशन
http://www.rajhansprakashan.com
विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी....

मराठी मनोरंजन
http://www.marathimanoranjan.com
मराठी मनोरंजन क्षेत्रातील तारे तारका व त्यांचे चाहते यांना एकत्र आणणारं एक ऑनलाईन व्यासपीठ म्हणजे मराठी मनोरंजन डॉट कॉम! या व्यासपीठावर नव्या पिढीतल्या अनेक तारे तारकांचे ऑफिशियल फॅनक्लब्ज आहेतच या शिवाय अनेक तारे लिहित आहेत त्यांचे ब्लॉग्ज! या दोन्ही सोबत आपल्यासाठी येथे आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रामधील ताज्या घडामोडी, नव्या उपक्रमांची माहिती आणि परिक्षणे!

मराठी दर्पण
http://www.marathidarpan.com
सर्व मराठीजनाना मराठीतून ऍकमेकासी संवाद साधता यावा, मराठीतून अभिव्यक्त होण्यासाठी एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हाव हाच हेतु मनात ठेवून हे संकेत स्थळ तयार केल आहे.

म्युच्यल फ़ंड मराठी
http://www.mutualfundmarathi.com
म्युचुअल फंडाबाबत सर्व काही माहिती मराठी भाषेत प्रथमच या वेबसाईटवर.

म्युच्यल फ़ंड मार्ग
http://www.mutualfundmarg.com
या वेबसाईट वर म्युच्युअल फंडा बाबत माहिति आहे

बोला पुणे
http://www.bolapune.com
’बोला पुणे’ काय आहे? - तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चासत्रांची मालिका! प्रत्येक विषयामधील तज्ञांकडून मार्गदर्शन, सखोल चर्चा व त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तरे वजा संवाद

अंतरंग पुणे
http://www.antarangapune.com
या संकल्पनेच्या माध्यमातून रंगभूमीवरून झेप घेऊन चित्रपट दूरदर्शन क्षेत्रात नावारूपाला आलेल्या दिग्गजांना पुन्हा एकवार आपल्या घरटयाकडे यायला लावणार .. नऊ दिग्गज दिग्दर्शक अनेक दिग्गज लेखक आणि अभिनेत्यांना घेऊन नऊ एकांकिका सादर करणार एकाच ठिकाणी …. मराठी रसिक प्रेक्षकांना पुन:श्च एकवार नाटकाच्या सुवर्णकाळात घेऊन जाणारा एक अभिनव उपक्रम ….

गाज
http://www.gaaz.in
by Smita Phadnis - Katha, kavita

मराठी वेबसाईट्स
http://www.marathiwebsites.com/
उत्कृष्ट, दर्जेदार, अत्याधुनिक मराठी आणि बहुभाषिक वेबसाईटस

मिसळपाव
http://www.misalpav.com/
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
मराठी समुदाय
मनोगत
http://www.manogat.com/
ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.
मराठी समुदाय
मायबोली
http://www.maayboli.com/
मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा... Marathi footsteps around the world.
मराठी समुदाय
उपक्रम
http://mr.upakram.org/
मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities
मराठी समुदाय
मराठीमाती
http://www.marathimati.com/
मराठीमाती :महाराष्ट्र राज्य पर्यटण(सैर सपाटा), संस्कृती, साहित्य, महाराष्ट्रातील कला, क्रीडा विषयक अस्सल मराठमोळे मराठी संकेतस्थळ
मराठी समुदाय
मी मराठी
http://www.mimarathi.net/
मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी नेटवर्क !
मराठी समुदाय
नेटभेट
http://www.netbhet.com/
Netbhet is a blog about technology tips, daily inspiration,news, how to tips
संगणक
लोकायत
http://www.lokayat.com/
साध्या सोप्या मराठीतून संगणक आणि इन्टरनेटची ओळख करून देणे. रोजच्या वापरातील तांत्रिक बाबींतील अडचणी सोडवण्यासाठी हे संकेतस्थळ आहे.
संगणक
सहजच
http://sahajach.com
मराठी माणसाला सुपर एक्सपर्ट बनवणारी साईट
संगणक
कुसुमावली
http://www.kusumaavali.org/
जवळपास गेली सत्तर वर्षे मराठी मनाला भारावून टाकणार्‍या कवि कुसुमाग्रजांना त्यांच्या कवितांची कुसुमांजली भावपुर्ण अर्पण
व्यक्तीविषयक, कविता
पु.ल.देशपांडे
http://puladeshpande.net/
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल.देशपांडे यांना वाहिलेले संकेतस्थळ
व्यक्तीविषयक
महाकवी ग.दी.माडगुळकर
http://www.gadima.com
मराठी साहित्य व चित्रपट सृष्टीतील एका अलौकिक प्रतीभेला आदरांजली
व्यक्तीविषयक, कविता
कविवर्य सुरेश भट
http://www.sureshbhat.in/
कविवर्य सुरेश भट ह्यांच्या गजलांचा अविष्कार
व्यक्तीविषयक, कविता
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
http://www.savarkar.org/
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: ॐ नमोजी आद्या - "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा"
व्यक्तीविषयक
संत तुकाराम
http://www.tukaram.com
महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष तुकाराम (१६०९-१६५०) यांचे काव्य मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे आणि तो ज्ञानदेव-नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी काव्याचा उत्कर्ष आहे.
व्यक्तीविषयक
अवकाशवेध
http://www.avakashvedh.com/
सर्वांनाच नसेली तरी अवकाशाबद्दलची जिज्ञासा बहुतेकांना असते. विविध क्षेत्रांमध्ये मराठी भाषा प्रगती करीत असताना खगोलशास्त्र आणि अवकाश-विज्ञान या विषयामध्ये देखिल इंटरनेटच्या माध्यमातून मराठी माणसाचे ज्ञान वाढावे या उद्देशाने अवकाशवेध.कॉमची निर्मिती केली गेली आहे
ईतर
महाराष्ट्र टाईम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/

बातम्या
लोकसत्ता
http://www.loksatta.com/

बातम्या
लोकमत
http://www.lokmat.com/

बातम्या
IBN लोकमत
http://www.ibnlokmat.tv/

बातम्या
केसरी
http://www.dailykesari.com/

बातम्या
देशदूत
http://www.deshdoot.com/

बातम्या
प्रहार
http://www.prahaar.in/

बातम्या
वेबदुनिया
http://marathi.webduniya.com/

बातम्या
सकाळ
http://www.esakal.com

बातम्या
सामना
http://www.saamana.com/

बातम्या
स्टार माझा
http://www.starmajha.com/

बातम्या
महान्युज
http://mahanews.gov.in/

बातम्या
पुढारी
http://epaper.pudhari.com

बातम्या
देशोन्नती
http://newsportal.deshonnati.com

बातम्या
तरुण भारत
http://www.tarunbharat.com/

बातम्या
मराठी पुस्तके
http://marathipustake.org
मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
मराठी पुस्तके
मराठी विकिपेडिया
http://mr.wikipedia.org
मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या २७,९८२ आहे.

आठवणीतील गाणी
http://www.aathavanitli-gani.com
स्मरणातील मराठी गीतांचा संग्रह
गाणी
लालबागचा राजा
http://www.lalbaugcharaja.com
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ
धार्मिक
लोकप्रभा
http://www.loksatta.com/lokprabha

मासिक
मराठी बाणा
http://www.marathibaana.com


रानवाटा
http://www.raanvata.com


दवबिंदू
http://www.davbindu.com


एकमेव
http://www.ekmev.com


मराठी नोव्हेल्स
http://www.marathinovels.net


मराठी सूची
http://www.marathisuchi.com
इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये.

मराठी वर्ल्ड
http://www.marathiworld.com


माझी कविता
http://www.mazikavita.com


नाटक
http://www.natak.com


वन स्मार्ट क्लिक (मराठी)
http://www.onesmartclick.com/marathi/marathi.html


सहजच
http://www.sahajach.com


गुढीपाडवा.
http://www.gudhipadwa.com


चाफा
http://www.chapha.com
“चाफ़ा” म्हणजे मराठी नाटकांनी बहरलेला आणि रंगभूमीच्या परंपरेतील सर्वच नाटकांची आकर्षकरित्या सांगड बांधणारा पुष्पगुच्छ. “चाफ़ा” मध्ये आम्ही नाटकांची इत्यंभूत माहिती आपणाला देऊ. म्हणजेच प्रत्येक नाटकाचे कथानक, त्याची रुपरेषा, त्यातील कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, मान्यवरांचे मनोगत, नाटकांसंबंधी मासिकात तसेच वृत्तपत्रात प्रकाशित झालेले लेख, समिक्षणे आणि महत्त्वाचे म्हणजे नाटकांच्या प्रयोगाचे वेळापत्रकसुद्धा.

प्राजित
http://prajit.org
प्राजित म्हणजे प्र+अजित. प्र म्हणजे मोठा. अजित म्हणजे जिंकला न गेलेला. कधीच हरायचे नाही, सतत प्रयत्‍न करतच राहायचे या संदेशाचे लघुरूप नाम म्हणजे प्राजित.

मराठी यलो पेजेस
http://www.marathiyp.com
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे सध्या मराठी भाषकांचा कलही मराठी व्यावसायिक शोधण्याकडे आहे; परंतु मराठी व्यावसायिकांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. परिणामी इच्छा नसतानाही अमराठी व्यावसायिकांकडून काम करून घ्यावे लागते. अनेकांची ही गरज लक्षात घेऊन डोंबिवलीतील तरुणांनी एकत्र येऊन "www.marathiyp.com' या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

बालसंस्कार
http://www.balsanskar.com
`मुलांना केवळ माहिती देणे', असा या संकेतस्थळाचा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी संकेतस्थळावर विविध सदरे देण्यात आली आहेत. व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक अशा स्तरांवर मर्यादित न, त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरही होणे गरजेचे आहे. आपल्याला सर्वोच्च आणि सातत्याने मिळणारे सुख म्हणजेच आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच मिळवून देऊ शकते. यासाठी त्यातील अंगांची येथे मांडणी केली आहे.

वेबमाझा
http://www.webmajha.com
’जगावेगळं’ काही करुन दाखविण्याच्या वल्गनाही आम्हाला करायच्या नाहीत. पाय पुर्णपणे जमिनीवर ठेऊन सर्वांनी मिळुन कोणकोणत्या दिशेने झेप घेता येईल त्याचा अदमास घ्यायचाय. नुसता अंदाज घेता थांबायचं नाहीये. सर्वांनी मिळुन महाजाळाच्या वेगाचं भान राखून त्यात पावलं गुरफटत नाहीत ना ह्याचा वेध घ्यायचाय. वेग कायम रखायचाय...!

मानबिंदु
http://www.maanbindu.com
आपल्याला 'जगवणा-या' आणि परंपरेनं चालत आलेल्या या कलांचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेट/ SMS अशा लेटेस्ट टेक्नोलॉजीची मेळ घालून एक आगळ वेगळं संकेतस्थळ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे! तरुण कलाकार आणि ते करत असलेले गायन, वादन, अभिनय, चित्रकला यांसारख्या विविध कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम आणि पर्यायाने नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात होणारी नवनिर्मीती इंटरनेट/SMS द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मानबिंदूच्या सह्हायाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे!

मराठी अस्मिता
http://www.marathiasmita.com
हे आहे व्यासपीठ, प्रत्येक मराठी माणसाचे. प्रगतीशील महाराष्ट्राचा अभिमान बाळगणा-यांचे आणि आपल्या मराठीपणाच्या खुणा अभिमानाने दाखविणा-यांचे. www.marathiasmita.com ला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान तर आहेच, पण मराठी माणसाविषयी बाळगल्या जाणा-या सा-या पूर्वग्रहांविषयी घृणाही आहे

फन ऑर्कुट स्क्रॅप्स
http://www.funorkutscraps.com


अभयारण्य
http://www.abhayaranya.com
आपले अभयारण्य भर श्रावणात हिरवागर्द झालेला निसर्ग तुम्हाला सुद्धा ताजतवानं करत असेल. जंगलात फिरताना कोकिळेने घातलेली साद तुम्हाला मोहवित असेल तसेच बेसुमार जंगलतोड आणि शहरातलं वाढत प्रदूषण तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर तुम्ही या संकेतस्थळाचे घटक होऊ शकता. आपली कला व विचार यांना योग्य ती प्रसिध्दी देण्यास आमचे व्यासपीठ सज्ज आहे

मराठी स्क्रॅप्स
http://www.marathiscraps.net


मराठी गाईड
http://marathiguide.com


मराठी टॉकिज
http://marathitalkies.com


आम्ही मराठी
http://www.aamhimarathi.in
Aamhi Marathi is a collection and sharing blog about Marathi Kavita [Poems], Marathi Vinod [Jokes], Marathi Charolya, Marathi Ukhane, Marathi Articles and Marathi Movies Marathi Songs and other Marathi stuff!!

मराठी माझा बाणा
http://www.marathimazabana.com


महाराष्ट्र मंडळ
http://www.maharashtramandal.com
अनिवासी मराठी मंडळीं च्या भेटी गाठीं साठी संकेतस्थळ

पुणेकर
www.punekar.net


हसवणुक
http://hasavnuk.madhavavhad.info


जय महाराष्ट्र
http://www.jaymaharashtra.com


मराठी वेबदुनिया
http://marathi.webdunia.com


मराठी कला
http://marathikala.com


मराठी ऑनलाईन
http://www.marathionline.com


मसाला अ‍ॅड्स
http://www.masalaads.com


महाराष्ट्र एक्स्प्रेस
http://maharashtraexpress.com/emain/
नमस्कार, महाराष्ट्र एक्सप्रेस डॉट कॉम नव्या रुपात तुमच्यासमोर येत आहे. या नव्या रुपाचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील बातमीदारही तुम्हीच असणार आहात
बातम्या
मराठी माया
http://www.marathimaya.com


दैनिक ऐक्य
http://www.dainikaikya.com


मराठी संस्कृती संग्रह
http://www.marathiss.com
माझ्या तमाम मराठी नेटकर मित्रांनो , नेटाने नेटवर मराठीचा झेंडा उभारुया , नेटाने MarathiSSवर मराठीविश्वाला समृद्ध करुया , मी मराठी , माझे नेट मराठी !

आम्ही मराठी
http://www.amhimarathi.com


स्वामी व्हेंचर्स
http://www.swamiventurers.com
आधुनिक विज्ञानाची कास धरून वैज्ञानिक दृष्टीकोन सर्वसामान्य शेतकर्‍यास सोप्या पध्दतीने कसा समजेल , त्याचे सार्वत्रिकरण कसे होईल हाच आमचा सतत प्रयत्न असतो.

गोमंतक मराठी अ‍ॅकॅडमी
http://www.gomantakmarathiacademy.org


मराठी ब्लॉग विश्व
http://marathiblogs.net
समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे तसेच त्यांच्या अनुदिनीकारांना एकत्र आणणे हे “मराठी ब्लॉग विश्व” ह्या संकेतस्थळाचे मूळ प्रयोजन आहे. ह्या संकेतस्थळांवरील स्वयंचलित (crawler) कार्यक्रम वेगवेगळ्या मराठी ब्लॉगांवरील नवनवीन लेखांचे आकलन करून ह्या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर प्रकाशित करतात. त्याबरोबर नवीन मराठी ब्लॉगांना शोधणे आणि त्यांची कडी यथील मराठी ब्लॉग शृंखलेमध्ये जोडणे हे कार्यसुद्धा नियमितपणे ह्या संकेतस्थळावर होते. तुम्हाला नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाण्याची गरज नको कारण नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाणे हेच ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे

गीत सरगम
http://www.geetsargam.net


मुंबई गणित मंडळ
http://www.mumbaiganitmandal.com


विद्यार्थी उत्कर्ष मंडळ
http://www.vummumbai.org


मुंबई मित्र
http://www.mumbaimitra.com

बातम्या
माय मराठी
http://www.mymarathi.com


मराठी शब्दबंध
http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश

मराठी मन
http://www.marathimann.in
मराठी माणसांचे आपले हक्कांचे मराठी मन

मराठी मंडळी
http://www.marathimandali.com
आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी.

देशदूत
http://www.deshdoot.com/

बातम्या
ट्रेकक्षितीज
http://www.trekshitiz.com


गीतमंजुषा
http://www.geetmanjusha.com


नितिन पोतदार
http://www.nitinpotdar.com
माझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत आहे. ब्लॉग वरून मी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच लिखाणं करतो. त्या शिवाय समाजात खुप काही चांगल घडतं असतं, त्याची दखल आपणं घेणं गरजेच आहे. आणखी बरचं काही आता "माझं tweet...." वरून मांडणार आहे. तुमच्या संवाद करता येईल. तुमच्या कॉमेंन्टचं अर्थातच स्वागत आहे!

महाराष्ट्र माझा
http://www.maharashtramajha.com
माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्रा बद्द्ल सर्व काहि. माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान वाटतो हे न लाजता बोलणार्यां साठी, मराठी अस्मिते साठी झटणार्या प्रत्येका साठि, प्रत्येक मराठी माणसाची वेबसाईट… महाराष्ट्र माझा. ना जात ना धर्म, ना हिंदू ना मुसलमान.. मी केवळ मराठी.. असे म्हणुन महाराष्ट्राच्या भगव्या खाली एकवटणार्या प्रत्येक मराठी माणसाची वेबसाईट..महाराष्ट्र माझा

ffive
http://ffive.in


2know
http://www.2know.in

fly