कंपवात रोग ही मेंदूची एक विकृती असून तिचे नांव हा रोग ज्यांनी पहिल्यांदा विशद केला त्या अलॉईस अलझायमर यांच्या नांवे ठेवण्यात आले आहे.
मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. प्रत्येक चेतापेशी इतर अनेक पेशींसोबत संवाद साधून जाळी बनवतात. चेतापेशींच्या या जाळ्यांची विशेष कार्य असतात. त्यापैकी काही विचारात, शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात गुंतलेली असतात. इतर आपल्याला पाहण्यास, ऐकण्यास आणि गंध घेण्यास मदत करतात. आणखी इतर आपल्या स्नायूंना हालचाल करण्यास सांगतात.
हे काम करण्यासाठी, मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात. ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कच-याची विल्हेवाट लावतात. पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळंकाही चालू ठेवण्यासाठी समन्वय लागतो तसंच मोठ्या प्रमाणात इंधन आणि ऑक्सीजन लागतो.
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात. नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात. अंततः त्या मरतात.
थर हा चेतापेशींच्या मधे जमा होतो आणि टँगल्स हे पीळ पडलेले तंतु असतात जे मरणा-या पेशींच्या आत तयार होतात. बहुतांश लोकांना ते वृध्द होतात तसे हे थर आणि टँगल्स तयार होतात तरीही अलझायमर्स असलेल्यांना ते अधिक संख्येने होतात. थर आणि टँगल्स हे शिक्षण आणि स्मृतीसाठी महत्वाच्या भागांमधे तयार व्हायला लागतात आणि नंतर अन्य भागांमधे पसरतात.
प्रारंभिक टप्पा आणि लवकर प्रारंभ
प्रारंभिक टप्पा हा अलझायमर्सच्या सुरुवातीचा भाग असतो जेव्हा स्मृती, विचार आणि एकाग्रता यांची समस्या दिसू लागते. लवकर येणे याचा अर्थ हा रोग एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षाच्या आधी येतो.
लक्षणे
- हा वाढत जाणारा आणि जीवघेणा असा मेंदूचा आजार आहे.
- अलझायमर मेंदूच्या पेशी नष्ट करतो, त्यामुळे स्मृती, विचार आणि वागणूक यांच्यात इतकी तीव्र समस्या येते की काम किंवा सामाजिक जीवन विस्कळीत होते.
- अलझायमर हा काळानुसार वाढतच जातो आणि तो जीवघेणा ठरतो.
- स्मृतीभ्रंशाचं हे सर्वात सामान्य स्वरुप आहे (स्मृती नष्ट होणे) आणि इतर बौध्दीक क्षमता इतकी समस्याग्रस्त होते की दैनंदीन जीवन गडबडून जाते.
|
अलझायमर्स आणि मेंदू
आपणे जसे वृध्द होत जातो, तशी आपली विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता मंदावते. परंतु, स्मृतीचे गंभीर नुकसान, संभ्रम आणि इतर मुख्य बदलांनी आपले मन ज्याप्रकारे काम करते ते बदलते आणि हा काही वृध्दत्वाचा सामान्य भाग नाही. मेंदूच्या पेशी निकामी होत असल्याचे ते एक चिन्ह असते.मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. प्रत्येक चेतापेशी इतर अनेक पेशींसोबत संवाद साधून जाळी बनवतात. चेतापेशींच्या या जाळ्यांची विशेष कार्य असतात. त्यापैकी काही विचारात, शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात गुंतलेली असतात. इतर आपल्याला पाहण्यास, ऐकण्यास आणि गंध घेण्यास मदत करतात. आणखी इतर आपल्या स्नायूंना हालचाल करण्यास सांगतात.
हे काम करण्यासाठी, मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात. ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कच-याची विल्हेवाट लावतात. पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळंकाही चालू ठेवण्यासाठी समन्वय लागतो तसंच मोठ्या प्रमाणात इंधन आणि ऑक्सीजन लागतो.
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात. नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात. अंततः त्या मरतात.
थर आणि टँगलची भूमिका
थर आणि टँगल्स हे दोन असामान्य घटक चेतापेशींना नुकसान पोचवून त्यांना मारुन टाकण्यात मुख्य संशयित आहेत.थर हा चेतापेशींच्या मधे जमा होतो आणि टँगल्स हे पीळ पडलेले तंतु असतात जे मरणा-या पेशींच्या आत तयार होतात. बहुतांश लोकांना ते वृध्द होतात तसे हे थर आणि टँगल्स तयार होतात तरीही अलझायमर्स असलेल्यांना ते अधिक संख्येने होतात. थर आणि टँगल्स हे शिक्षण आणि स्मृतीसाठी महत्वाच्या भागांमधे तयार व्हायला लागतात आणि नंतर अन्य भागांमधे पसरतात.
प्रारंभिक टप्पा आणि लवकर प्रारंभ
प्रारंभिक टप्पा हा अलझायमर्सच्या सुरुवातीचा भाग असतो जेव्हा स्मृती, विचार आणि एकाग्रता यांची समस्या दिसू लागते. लवकर येणे याचा अर्थ हा रोग एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षाच्या आधी येतो.
उपचार
यावर सध्या उपचार उपलब्ध नाही. परंतु लक्षणांसाठी उपचार आणि त्यासोबत, योग्य सेवा आणि आधार मिळाला तर अलझायमर्स असणा-या लोकांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें