मंगलवार, 6 जून 2023

शिंक : होय न सांगता येणारी , न थांबवता येणारी, शिंक.

 शिंक:

होय न सांगता येणारी

न थांबवता येणारी शिंक. 

ही शिंक आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे


१)शिंके मुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबा मुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन ठकलला जातो याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहीन्या चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.


२)पुर्वी लोक शिंक येण्यासाठी नाकात तपकीर ओढुन कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.


३)आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.


४)दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरूषांन पेक्षा स्रियानमध्ये कमी आहे कारण स्रिया स्वपांक करते वेळी किंवा घराची साफ सफाई करते वेळी शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थुल होते. शिंके मुळे पोटावर प्रचंट दाब येतो व पोटाचे स्नायु अकुंचीत केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पुर्ण होतो.


५)नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येणे साठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते. 


६)कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात या साठी तपकीर वापरणेची गरज नाही. 


७)शिंके मुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये या वर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धती मध्ये ही क्रिया दिलेली आहे. 


८)अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते. 


९)शिंका मुळे चेहरा थोडासालालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्य वर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात. 


१०)शिंके मुळे डोक्यातील विचार चक्र खंडीत होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांनी मेंदुला नवचैतन्य निर्माण होते. 


११)सतत सर्दी होत असेल तर ती शिंका मुळे काही काळाने सततची सर्दीथांबते. 


अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे...... 


अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वरी देणगीच आहे.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly