कमर तथा पेट लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
कमर तथा पेट लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 18 सितंबर 2011

पोट कमी करण्यासाठी काही उपाय, (कमर तथा पेट के चर्बी कैसे कम करे)

 पोट कमी करण्यासाठी काही उपाय,  पोटाचे व्यायाम.




 खूप जेवून अन्न पचणार नाही.' आपली ढेरी वाढेल.  श्रीखंड वगैरे असेल तर कमीत कमी दोन तिन वाट्या लागतंच, आणि हेच ते कारण असावं वजन वाढण्याचं.

भारतामध्ये पोटामध्ये चरबी साठण्याची विशेष प्रवृत्ती असते. यामुळे पोट सुटलेल्या व्यक्तींमध्ये पोटामध्ये जास्त चरबी, चरबीच्या जास्त पेशी, जास्त रक्तप्रवाह त्यामुळे मधुमेहाचा जास्त धोका असतो. सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये 96से.मी. आणि स्त्रियांमध्ये 100 सेमी. पेक्षा जास्त पोट असेल तर निश्चित धोका असतो असे समजावे.

 शरीरात बरीच चरबी त्वचेखाली साठते. थंड प्रदेशांमध्ये शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हा चरबीचा थर उपयोगी असतो. ही जाडी मोजण्यासाठी निरनिराळी मापनयंत्रे उपलब्ध आहेत. यापैकी एक मापक वापरून शरीरावर चार ठिकाणी जाडी मोजली जाते. - दंडाच्या मागची त्वचा, दंडाच्या पुढची त्वचा खांद्याच्या फ-याच्या खालची त्वचा आणि जांघेच्या वरची पोटाची त्वचा या सर्वांची बेरीज पुरुषांमध्ये 40 मि.मी. पेक्षा आणि स्त्रियांमध्ये 50 मि.मी.पेक्षा जास्त असू नये.


जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे विकार होतात. त्यातला एक महत्त्वाचा विकार म्हणजे पोटाचा. आपलं व्यक्तिमत्त्व कितीही सुंदर असलं तरी पोटामुळे ते झाकलं जातं. पोट कमी करण्यासाठी अनेक प्रकार चे व्यायाम असतात. परंतु ते कशाप्रकारे करावेत ते माहीत नसतं. पोट कमी करण्यासाठी लोक व्यायाम शाळेची हजारो रुपये खर्च करतात. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी योगा किती महत्त्वपूर्ण आहे. हेच पोटाचे व्यायाम या कार्यक्रमातुन  योग व आहार तज्ज्ञ डॉ  आनिलभौ यांनी सांगितलं.
Image result for पोट कमी करण्यासाठी

fly