पोट कमी करण्यासाठी काही उपाय, पोटाचे व्यायाम.
खूप जेवून अन्न पचणार नाही.' आपली ढेरी वाढेल. श्रीखंड वगैरे असेल तर कमीत कमी दोन तिन वाट्या लागतंच, आणि हेच ते कारण असावं वजन वाढण्याचं.
भारतामध्ये पोटामध्ये चरबी साठण्याची विशेष प्रवृत्ती असते. यामुळे पोट सुटलेल्या व्यक्तींमध्ये पोटामध्ये जास्त चरबी, चरबीच्या जास्त पेशी, जास्त रक्तप्रवाह त्यामुळे मधुमेहाचा जास्त धोका असतो. सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये 96से.मी. आणि स्त्रियांमध्ये 100 सेमी. पेक्षा जास्त पोट असेल तर निश्चित धोका असतो असे समजावे.
शरीरात बरीच चरबी त्वचेखाली साठते. थंड प्रदेशांमध्ये शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हा चरबीचा थर उपयोगी असतो. ही जाडी मोजण्यासाठी निरनिराळी मापनयंत्रे उपलब्ध आहेत. यापैकी एक मापक वापरून शरीरावर चार ठिकाणी जाडी मोजली जाते. - दंडाच्या मागची त्वचा, दंडाच्या पुढची त्वचा खांद्याच्या फ-याच्या खालची त्वचा आणि जांघेच्या वरची पोटाची त्वचा या सर्वांची बेरीज पुरुषांमध्ये 40 मि.मी. पेक्षा आणि स्त्रियांमध्ये 50 मि.मी.पेक्षा जास्त असू नये.
जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे विकार होतात. त्यातला एक महत्त्वाचा विकार म्हणजे पोटाचा. आपलं व्यक्तिमत्त्व कितीही सुंदर असलं तरी पोटामुळे ते झाकलं जातं. पोट कमी करण्यासाठी अनेक प्रकार चे व्यायाम असतात. परंतु ते कशाप्रकारे करावेत ते माहीत नसतं. पोट कमी करण्यासाठी लोक व्यायाम शाळेची हजारो रुपये खर्च करतात. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी योगा किती महत्त्वपूर्ण आहे. हेच पोटाचे व्यायाम या कार्यक्रमातुन योग व आहार तज्ज्ञ डॉ आनिलभौ यांनी सांगितलं.
पोट कमी करण्यासाठी काही उपाय
पोट कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा काही उपाय करावा , आहारात काय घ्यावं, आहार कशाप्रकारे घ्यावा याबाबत आनिलभौ यांनी सांगितलं. सकाळी भरपेट नाश्ता करावा. त्यानंतर ४ तासांनंतर जेवण. मग पुन्हा चार तासांनी चहा आणि त्यानंतर रात्रीचं जेवण घ्यावं. तेही अगदी हलकं असावं. सूर्यासतानंतर अगदी कमी आहार घ्यावा. रात्रीच्या जेवणामुळेच पोटाचे विकार आणि पोटाची ढेरी वाढणं हे प्रकार घडतात. कारण शरिराची हालचाल त्या वेळेत नसल्यामुळे अन्न पचन होत नाही, सारखी माहिती त्यांनी दिली. एसिडीटी अणि गॅस यांवर ताबा ठेवण्यासाठी रात्रीच्या हलक्या जेवणानंतर किमान १० मिनिटं तरी वज्रासनाच्या स्थितीत बसावं. पोटाला गरम पाण्याचा शेक दिल्यास उत्तम. यामुळे पोटाच्या दिशेने रक्ताभिसरण नीट होतं. त्यामुळे अन्नपचन व्हायलाही मदत होते.आपलं डायजेशन तळ पायाला हात लावूनही ओळखता येतं. जर तळपाय थंड असेल तर डायजेशन व्यवस्थीत नाही, असं समजावं. त्यासाठी तळपाय उबदार ठेवणं गरजेचं आहे. पवन मुक्तासन, यस्तीकासन या आसनांमुळे पोट कमी करता येतं. पण ज्यांना पाठीचे, हृदयाचे आजार आहेत आणि रक्त दाब असलेल्यानी ही आसनं करू नयेत. दूध, दही, दुधाचे प्रकार, भाज्या, फळं हे पदार्थ घ्यावेत. बाहेरचे पदार्थ, तेलकट, तूपकट खाणं कमी करावं आणि सात्वीक आहार घ्यावा. नेहमी ८० टक्केच पोट भरावं आणि २० टक्के रिकामं ठेवावं, असाही सल्ला आनिलभौ यांनी दिला.
स्थूलता
स्थूलता म्हणजे लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणे. साधारणपणे यात शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते. जगभर ही एक वाढती समस्या आहे. भारतातही शहरी विभागात याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी हा आजार प्रौढांमध्ये जास्त होता. आता मात्र लहान मुले, तरुण आणि वृध्द या सगळयांमध्येच त्याचे प्रमाण वाढत आहे. स्थूलता हा एक आजार आणि अपंगत्व आहे हे अद्याप सुशिक्षित लोकांनाही समजलेले नाही. राहणीमानामुळे ग्रामीण भागात स्थूलतेचे प्रमाण कमी आहे. साधारणपणे 20 ते 40% प्रौढ आणि 10 ते 20% मुले लठ्ठ आहेत.
लठ्ठपणामध्ये शरीरात चरबी जास्त असते आणि ती विशिष्ट भागात जास्त साठते. भारतामध्ये पोट आणि कंबर याभोवती चरबी साठण्याची प्रवृत्ती आहे. स्त्री-पुरुषांमध्ये चरबी साठण्याच्या जागा थोडया वेगळया असतात. यावरुन पुरुषी किंवा बायकी लठ्ठपणा ओळखता येतो.
लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. या व्यक्तींना मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, सांध्याचे आजार, मेंदू-आघात, वंध्यत्व, स्तनांचा कर्करोग, स्त्री संप्रेरकांचे असमतोल, पाठदुखी आणि झोपेत घोरणे हे सर्व आजार जास्त प्रमाणात आणि लवकर होतात. याच कारणाने लठ्ठ व्यक्तींना लवकर मृत्यू येण्याची शक्यता असते.
वय, लिंग (स्त्री असणे), आनुवंशिकता, बैठे जीवन, श्रीमंती, खाण्याच्या अयोग्य सवयी, कौटुंबिक संस्कृती आणि काही मानसिक घटक लठ्ठपणाला कारणीभूत आहेत. तरीही सगळयात जास्त महत्त्वाचा घटक जीवनपध्दती हाच आहे.
काही मार्गदर्शक तत्वे
- - पिष्टमय पदार्थ आणि तेल-तूप आणि साखर यांचे प्रमाण कमी करावे.
- - आहारातील भाजीपाला वाढवावा. कमी अन्नप्रक्रिया केलेले पदार्थ उदा. मैद्यापेक्षा गव्हाचे साधे पीठ चांगले.
- - आहारात प्रथिनांचा पुरेसा पुरवठा असावा. यामुळे चरबीवर नियंत्रण राहते. यासाठी सोपी युक्ती म्हणजे भाकरी चपाती पिठात काही प्रमाणात सोया पीठ मिसळणे.
- - पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.
- - आठवडयातून एखादे जेवण टाळावे.
- - मधून मधून खाण्याची सवय सोडावी.
- - दर महिन्याला वजन पाहून आहार नियंत्रित करावा.
या सर्व गोष्टींचं नीट व्यवस्थित पालन केलं तर आपल्यालाही कमी पोटाचे आजार होतात.
व्यायाम न करता कशी कमी कराल पोटावरची चरबी
आपण स्वत:ला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आपलं वाढलेलं पोट त्यावर एक ठप्पाचं आहे. आपण दररोजच्या कामामुळे व्यस्त असतो. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. खाण्यावरही फार नियंत्रण ठेवता येत नाही. मग पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स-
1) बसण्याच्या पद्धती
आपली बसण्याची अयोग्य पद्धत आपल्या पोटाची चरबी वाढण्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं. खासकरून ज्या व्यक्ती जास्त वेळ कंम्प्युटरच्या समोर बसतात, त्यांच्या पद्धतीमुळे पोटातील स्नायू बाहेर येण्यास सुरुवात होते आणि त्याने पोट बाहेर यायला सुरुवात होते. जास्तीत जास्त वेळ सरळ बसण्याचा प्रयत्न करा, पण त्याने जर तुमच्या पाठीला त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठीमागे उशी ठेवून बसा.
2) खाण्याची वेळ
नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधील वेळ महत्त्वाचा आहे. उठल्यानंतर 2 तासानंतर नाश्ता करा. नाश्ता अगदी पोट भरून करा. त्यानंतर 4 किंवा 5 तासानंतर जेवण करा. जेवणमात्र जरा हलके करा पण पोषक आणि फायबरयुक्त पदार्थ खावेत.
3) सफेद मीठ आणि साखर खाणे टाळा
जेवणात जाड्या मीठाचा वापर वाढवा, शक्यतो सफेद मीठ खाणे बंद करा. जाड्या मीठामुळे आपली चरबी कमी होण्यास मदत होते. साखरेचा वापर कमी करा, साखरेऐवजी गूळ, मध किंवा खजूर याचा वापर खाण्यात करू शकता.
4) डाएटमध्ये फायबर पदार्थ खा
आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याने खाल्लेलं पचायला मदत होते. पोटाचे आजार टाळतात आणि वाढत्या चरबीवर नियंत्रण राहते. विटॅमिन सी असलेली फळं आणि भाज्या खा, ज्याने शरीरातील लोहयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत होते.
डॉ आनिलभौ चे मी आभार मानतो. खूप चांगली माहिती दिलीत.
जवाब देंहटाएंइस टिप्पणी को एक ब्लॉग व्यवस्थापक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएं
जवाब देंहटाएंstumack, kambar, exercise | पोट आणि कंबरेसाठीचे खास ...
marathi.webdunia.com › विविध › योग › लेख
४ सेप्टें २०१२ – आपण नियमित व्यायाम करून पोटावर असलेली अनावश्यक चरबी कमी केल्यास त्याचा परिणाम लगेच कंबरदुखीवरही जाणवू शकतो. पोटाचे आणि कंबरेचे ... पोटाच्यासोबत कमरेचा घेर नियंत्रित करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. यासाठी दोन्ही ...
पोटाचा घेरा वाढला आहे मग हे करा....
marathi.webdunia.com › विविध › आरोग्य › आरोग्य सल्ला
७ फेब्रु २०१२ – याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय. लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक घातक आजार होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी ...
वजन कसे कमी केले - एक स्वानुभव ! | Maayboli - मायबोली
www.maayboli.com › ग्रूप › आरोग्यम् धनसंपदा
३ ऑक्ट २००९ – व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. ..... पण बर्याच जणांनी वजन कमी करण्यासाठी हे करुन पाहीले आहे आणि १०-२० किलो कमी खाले आहे) ... गरम पाणी प्याल तर सकाळी प्रेशरची वाट बघणं बंद होईलच आणि पोटाची भट्टी रेग्युलर झाली तर वजन उतरायसाठी चांगलंच.
धुंद गंध...: पोट कमी करण्यासाठी काही उपाय, (कमर तथा ...
michkashala.blogspot.in/2011/09/blog-post_1398.html
१८ सेप्टें २०११ – यामुळे पोट सुटलेल्या व्यक्तींमध्ये पोटामध्ये जास्त चरबी, चरबीच्या जास्त पेशी, जास्त रक्तप्रवाह त्यामुळे ... पोट कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, आहारात काय घ्यावं, आहार कशाप्रकारे घ्यावा याबाबत ...
वजन कमी करण्यासाठी मोलाच्या टिप्स - Google Groups
https://groups.google.com/d/msg/swarajya/.../-R7jpANfV3gJ
१६ जून २०१२ – वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी ...
राजु किसन मिसाळ: लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय
rajukisanmisal.blogspot.com/2012/01/blog-post.html
३१ जाने २०१२ – हात आणि मांड्यांच्या ठिकाणीही चरबी साठून राहते. ... वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ ... वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे.
सुडौल बांधा व सुंदरता - आरोग्य.कॉम - मराठी
marathi.aarogya.com/index2.php?option=com_content...id...
याखेरीज ऍरोबिक्स्, योगसाधना, शल्यक्रिया करून शरीरातील चरबी कमी करणे, पळणे, जॉगिंग इ. व्यायाम प्रकार वापरून वजन .... स्त्रीला आपली कंबर बारीक करून त्यावर व सभोवताली असणारी अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. स्टमक क्रंच ...
Best Ways To Stomach - PHOTOS : पोटाचा घेर कमी ...
divyamarathi.bhaskar.com › Jeevan Mantra
२१ फेब्रु २०१३ – यांचे नियमित स्वरूपात सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करावयाची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. ... तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा. लॉग ऑन ...
orkut - वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक ...
www.orkut.com › Home › Communities › Other › TANISHKA › Forum
१७ फेब्रु २०१२ – पाय पुढे सरकवून खाली बसावे. दोन्ही हात समान वर उचला व खाली आणा. सुरवातीला ही कसरत 50 वेळा करावी. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी- पाय पसरवून उभे रहा. गुडघ्यात न वाकता पायाची बोटे हाताच्या बोटांनी पकडण्याचा प्रयत्न करावा.
बहुगुणी 'मध' - Yahoo! मराठी बातम्या - Marathi News - Yahoo!
marathi.yahoo.com/बहुगुणी-मध-025115498.html
२३ फेब्रु २०१२ – पंचामृत करण्यासाठी किंवा घरात लहान मुलांना खोकला झाल्यावर चाखण्यासाठी स्वयंपाकघरात एखाद्या छोट्याशा बाटलीत का होईना ... शरीरात आवश्यक चरबी साठून लठ्ठपणा येतो, अशा वेळी मध घ्यावं. ... मेदाचे पचन होऊन चरबी कमी होते.