टपाल लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
टपाल लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

सोमवार, 10 अक्तूबर 2011

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड व्याजदर वाढणार




' सर्वसामान्यांची ठेव ' म्हणून ओळखल्या जाणा-या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि पोस्टातील गुंतवणुकीवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे या प्रस्तावावर विचार करत असून, येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.

जर या प्रस्तावाला केंद्रीय अर्थखात्याची मंजुरी मिळाली, तर पीपीएफचा दर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ९ टक्के एवढा होईल. तसेच सध्या दर वर्षी फक्त ७० हजार रूपयेच पीपीएफच्या खात्यात टाकता येतात. ही रक्कम आता एक लाखापर्यंत नेण्याचा मुखर्जी यांचा मानस आहे.

टपाल खात्यातील ठेवीवरील व्याजदरही सुमारे अर्ध्या टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. तसेच किसान विकास पत्र आणि महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना यावर एजंटांना मिळणारे कमिशन कमी करावे असे मुखर्जी यांना वाटते. परंतु याला त्याच्या पक्षातील सदस्यांचा आणि इतर अनेकांचा विरोध आहे.

बँकांच्या विविध योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहक पीपीएफ आणि टपाल खात्यापासून दूर गेला असल्यामुळे मुखर्जी यांनी हा विचार मांडला आहे, असे सांगितले जात आहे.. लोकांना या योजनांकडे आकर्षित केल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात भर पडणार असली, तरी भविष्यात या वाढीव व्याजापोटी सरकारला ५३ हजार कोटी बाजारातून उभे करावे लागणार आहेत.



fly