सोमवार, 10 अक्तूबर 2011

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड व्याजदर वाढणार




' सर्वसामान्यांची ठेव ' म्हणून ओळखल्या जाणा-या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि पोस्टातील गुंतवणुकीवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे या प्रस्तावावर विचार करत असून, येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.

जर या प्रस्तावाला केंद्रीय अर्थखात्याची मंजुरी मिळाली, तर पीपीएफचा दर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ९ टक्के एवढा होईल. तसेच सध्या दर वर्षी फक्त ७० हजार रूपयेच पीपीएफच्या खात्यात टाकता येतात. ही रक्कम आता एक लाखापर्यंत नेण्याचा मुखर्जी यांचा मानस आहे.

टपाल खात्यातील ठेवीवरील व्याजदरही सुमारे अर्ध्या टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. तसेच किसान विकास पत्र आणि महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना यावर एजंटांना मिळणारे कमिशन कमी करावे असे मुखर्जी यांना वाटते. परंतु याला त्याच्या पक्षातील सदस्यांचा आणि इतर अनेकांचा विरोध आहे.

बँकांच्या विविध योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहक पीपीएफ आणि टपाल खात्यापासून दूर गेला असल्यामुळे मुखर्जी यांनी हा विचार मांडला आहे, असे सांगितले जात आहे.. लोकांना या योजनांकडे आकर्षित केल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात भर पडणार असली, तरी भविष्यात या वाढीव व्याजापोटी सरकारला ५३ हजार कोटी बाजारातून उभे करावे लागणार आहेत.













विविध अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या ( एएमसी ) योजनांचे व्यवहार एकाच ठिकाणाहून करता यावेत म्हणून पुढील आर्थिक वर्षात ' एमएफ युटिलिटी ' हे नवे पोर्टल दाखल करण्याची घोषणा ' असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ' ने ( अॅम्फी ) केली आहे . या पोर्टलमुळे ग्राहक , वितरक व आर्थिक सल्लागार यांना म्युच्युअल फंडांचे व्यवहार करणे सोयीचे होणार आहे .

' अॅम्फी ' चे चीफ एक्झिक्युटिव्ह एच . एन . सिनर यांनी १६ व्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली . ' सेबी ' कडून आवश्यक ती मंजुरी मिळाल्यानंतर ' एमएफ युटिलिटी ' पोर्टलची सुरुवात पुढील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले .
फ्रँकलिन टेम्पलटन एएमसीचे अध्यक्ष हर्षेंदू बिंदाल आणि डॉइश एएमसीचे सीईओ सुरोशी सोनी यांचा समावेश ' अॅम्फी ' च्या संचालक मंडळात झाला आहे . ' अॅम्फी ' च्या अध्यक्षपदी एचडीएफसीचे एमडी मिलिंद बर्वे यांची फेरनिवड झाली आहे , तर रिलायन्स एएमसीचे सीईओ संदीप सिक्का उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly