बुधवार, 19 अक्टूबर 2011

मराठी उखाणे 13

------रावांचं नांव घेतें बाबरांची लेक.
राधाकृष्णाची मूर्ति पहातें मी आरशांत
------रावांचं नांव घेतें घरच्या बारशांत.
हिंदमातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी
------रावांचं नांव घेतें डोहाळजेवणाचे वेळीं.
दया, क्षमा, शांति, हेंच सुखाचं माहेर
------रावांनी केला सौभाग्याचा आहेर.
बिल्वर केले, पाटल्या केल्या, सरी आतां करावयाची
------रावांचं नांव घ्यायला मागं नाहीं सरायची.
गोमंतकीय आंबा चवीला लागतो गोड
------रावांची मिळूं दे जन्मोजन्मीं जोड.
चमकली रोहिणी हंसला रजनीनाथ
------रावांच्या जीवनांत माझी आहे साथ.
सुशील सासू सासरे, सद्‌गुणी मातापिता
------रावांचं नांव घेतें सर्वांच्याकरितां.
काव्यामध्यें श्रेष्ठ अलंकार आहेत उपमा उत्प्रेक्षा
------राव सुखी असोत हीच माझी अपेक्षा.
चांगल्या कुळीं जन्मलें, चांगल्या कुळीं आलें
------रावांच्या मुळं भाग्यशाली झालें.
सृष्टीच्या बागेंत सूर्यनारायण झाले माळी
------रावांचं नांव घेतें सर्वांच्या पंक्तीच्या वेळीं.
घर भरावं लक्ष्मीनं, जग भरावं कीर्तीनं
------रावांच जीवन उजळीत मी रहावं प्रीतीच्या ज्योतीनं.
काश्मीरशोभा पाहून थक्क झाले कवी
------रावांचं नांव घेतांना थबकला रवी.
राम झाले विजयी सीतेला स्मरुन
------रावांचं नांव घेतें शांता-दुर्गेला स्मरुन.
सोन्याच्या कामाला सोनार लागतो कुशल
------रावांचं नांव घेतें चांगलं अस्सल.
चंदन कापूर कस्तुरी अत्तराचा वास
------रावांचं नांव घेतें तुमच्याचकरतां खास.
संसाररुपी बागेंत प्रेमरुपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करतें
------रावांच्या बरोबर.
क्षत्रीय कुळीं जन्मलें भाग्य या कन्येचें
------रावांचं नांव झालें सार्थक या जन्माचें.
सौभाग्याच्या साक्षीनं काळ्या मण्याची पोत आली जीवनांत
------रावांच्या असूं दे मी नित्य स्मरणांत.
कण्वमुनीचा आश्रम शकुंतलेचं माहेर
------रावांनीं दिला मला सौभाग्याचा आहेर.
केळीच्या पानावर गाईचं तूप
------रावांचं कृष्णासारखं रुप.
सासू नी सासरे, जसा वाडयाचा कळस, नणंद अक्काबाई जशी दारींची तुळस,
------रावांचं नांव घ्यायला मला नाहीं आळस.
निळें पाणी, निळे डोंगर, हिरवें हिरवें रान
------रावांचं नांव घेऊन, राखतें सर्वांचा मान.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly