भूतानचे "हसरा राजपुत्र' म्हणून ओळखले जाणारे राजे जिग्मे वांगचुक
यांनी आज आपली लहानपणापासूनची प्रेयसी जेत्सुन पेमा हिच्याशी पारंपरिक
बौद्ध पद्धतीने विवाह केला. मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असलेल्या 31 वर्षीय
वांगचुक यांनी इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. एकवीस
वर्षीय पेमा यांनी भारतातील हिमाचल प्रदेश येथे शिक्षण घेतले असून, त्या
कुठल्याही राजघराण्यातील नाहीत.
पेमा यांनी सोनेरी जॅकेट व पारंपरिक झगा परिधान केला होता. लग्नानंतर त्यांना भूतानच्या राणीपदाचाही मान मिळाला आहे. भारताचे भूतानमधील राजदूत पवन वर्मा, पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायण, कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया व माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन या समारंभाला उपस्थित होत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें