उशाखालचा शेला पायाखाली गेला उठा उठा
------राव कासराभर दिवस आला.
लावीत होतें कुंकू त्यांत पडलें मोती
------रावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी चिंती.
आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी
------रावांचं नांव घ्यायला नहेमींच माझी खुशी.
एक पाय घरांत , एक पाय दारांत जडावाचं पदक
xx x रावांच्या हारांत.
सागवानी पेटीला पोलादी चूक
------रावांच्या हातांत कायद्याचं बूक .
शिसवी लाकडांचा देव्हारा त्यांत चांदीची मूर्ति,
------रावांची देशभक्त म्हणून जगभर कीर्ति .
काळी चंद्र्कळा तिला मोतीचूर पदर
------रावांच्या जिवावर हळद कुंकवाचा गजर.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा
------रावांच्या जिवावर मारतें मौजा.
देवापुढं लावला ऊद, वास सुट्ला छान,
------रावांचं नांव घेते ऐका देऊन कान.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें