बुधवार, 19 अक्तूबर 2011

नवरी साठी नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride


नवरी साठी नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride

 


दारीं होता कोंबडा त्यांत होता पैका
------रावांचं नांव घेतें सर्वजण ऐका.
आदघर मधघर मदघरांत घालीत होतें वेणी तिकडून आले
------राव त्यांनीं फेकली गुलाबदाणी.
कांचेची फुलदाणी धक्क्यानें फुटली उठा उठा
------राव तुमची माझी शपथ सुटली.
आमच्या मागच्या दारीं आहे द्राक्षांचा वेल
------राव बसले पुजेला मी देतें बेल.
आदघर मदघर, मदघरांत होती चूल चुलीवर होता तवा, त्यावर भाजला रवा
मी जातें माहेराला सासूबाई तुमी
------रावांना जीव लावा.
पुणेरी तांगा, मद्रासी घोडें,
------रावांचे नांव घेतें सत्यनारायणाच्या पुढें.
हुंडयावर गुंडा, गुंडयावर परात
------राव बसले पुजेला तिकडून जा घरांत.
रामासारखे पुत्र जन्मले कौसल्येच्या कुशीं
------रावांचे नांव घेतें आनंदाच्या दिवशीं.
तुळशीला घालतें प्रदक्षिणा, विष्णूला करतें नवस
------रावांचें नांव घेतें आज आनंदाचा दिवस.
जाई जुईच्या फुलांची माळी गुंफितो जाळी
------रावांचें नांव घेतें संध्याकाळच्या वेळीं.
दारापुढें ओटा, ऒटयावर लावली तुळस
------रावांच्या घरीं होईल संसार सुखाचा कळस.
करंज्या, पुर्यांेनीं भरला रुखवत
------रावांनी माझा हात धरला सर्वांच्या देखत.
उभी होतें माडीला ऊन लागलें साडीला चांदीचीं घुंगरं
------रावांच्या गाडीला.
वाण घेतां घेतां माथ्यावर आलं ऊन
------रावांना सांगतें राहावं जपून.
इकडून डोंगर, तिकडून डोंगर, मध्यें भालू कुत्रं भुंकतं
------रावांना पाहून माझं डोकं उठतं.
बैठकीच्या खोलींत चांदीचा गल्लास
------रावांच्या जीवासाठी मी आपला जीव केला खल्लास.
कांचेचं घंगाळ, गुलाबाचं पाणी,
------रावांचं नांव घेतें मोहनराणी.
कांचेच्या ग्लासांत गुलाबी सरबत
------रावांच्या वाचून मला नाहीं करमत.
मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटींत
------रावांना ठेवीन म्हणतें मी माझ्याच मुठींत.
शुक्राची चांदणी उगवली ढगांत, जाऊ द्या मला घरीं
------राव आहेत रागांत भारी.
उगवला सूर्यंदेव, जगाचा राजा
------रावांचं नांव घेतें पहिला नंबर माझा.
सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे
------रावांची वाट पहात सारें गांव राहिलें उभें.

3 टिप्‍पणियां:

fly