बुधवार, 19 अक्तूबर 2011

मराठी उखाणे 18

संसारामध्यें मुख्य असतात कनक आणि कांता,
------रावांना जन्म देणारी धन्य ती माता.
चमकली शुक्राची चांदणी, चंद्र बुडाला ढगांत,
------राव पडले पदरांत तर सौभाग्यवती झालें जगांत.
मानससरोवरांत रहातात राजहंस पक्षी,
------रावांचं नांव घेतें चंद्र सूर्य साक्षी.
दोनशेचा शालू, त्याला तीनशेंचा पदर,
------रावांच्या नांवानं लेतें हळदी कुंकवाचा गजर.
चांदीच्या ताटांत सोन्याची सरी,
------रावांचं नांव घेतें तुमच्या घरीं.
शालूचा पदर अडकला तोडयांत,
------रावांचं घेतें तुमच्या वाडयांत.
महादेवाच्या पिंडीला चौकोनी आरसे,
------राव बसले जेवायला, मी वाढतें अनारसे.
जटाधारी शंकराची गौरवर्ण कांति,
------राव सुखी असोत हीच देवाजवळ विनंति.
संगीत नाटक सुभद्राहरण,
------रावांच्या नांवाचं आज काय कारण ?
दाट मणीमंगळसूत्र मोतीं लावा आणिक, आत्याबाईंच्या पोटीं
------राव जन्मले माणिक.
आयाबाया म्हणतात, नांव घे नांव घे, लाजूं कशी नांव घ्याया ? मी तर
------रावांची जाया.
हातामध्यें गोठ पाटल्या, सरी आहे करायची,
------रावांचं नांव घ्यायला मागें नाहीं सरायची.
कृष्णाबाई नदी मध्यभागीं कमान,
------रावांची मूर्ती कृष्णदेवासमान.
चांदीच्या भांडयाला नांवाची खूण,
------रावांचं नांव घेतें मोहित्यांची सून.
चांदीच्या ताटांत दहिभाताचा काला,
------रावांचं नांव घ्यायला आजपासून आरंभ केला.
चांदीच्या तबकांत मोत्यांचे गरे,
------राव दिसतात बरे, पण वागतील तेव्हां खरे.
चांदीच्या वाटींत डाळिंबाचे दाणे,
------मोहित्यांच्या घराण्यांत शहाणे.
तिपेडी वेणींत मोती गुंफले एक लाख,
------रावांचं नांव घेतें आशीर्वाद द्या लाख लाख.
सोन्याची पाटली हाताला दाटली,
------रावांचं नांव घेतांना खुशाली वाटली.
मोत्याचा करंडा, चांदी सोन्याचं झांकण,
------रावांचं नांव घेतें न् सोडतें कंकण.
मागें घालते पाटल्या, मधें घालतें बिल्वर, पुढें घालते छंद,
------रावांचं नांव घेतें कल्ला करा बंद.
शिणगारलेला हत्ती मांडवापुढें झुले,
------रावांच्या हातांत सुवासिक फुलें.
भरल्या पंगतींत रांगोळी काढतें ठिपक्यांची,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly