मला नाहीं कळत मी आहें साधी
------रावांचें नांव घेतें सर्व मैत्रिणींच्या आधी. माझा नमस्कार फुकाचा मिळालेला आशिर्वाद लक्ष मोलाचा ------रावांचा संसार होवो सुखाचा. काळी चंद्रकळा खसखशी कांठ ------रावांच्या नावांसाठीं केला समारंभाचा थाट. चौकोनी टेबलावर रुमाल टाकतें विणून ------रावांच्या नांवासाठी आग्रह केला म्हणून. देव मंदिरांत रत्नांच्या राशी ------रावांचं नांव घेते समारंभाच्या दिवशी. पंगतींतल्या पानापुढें उदबत्तीचा वास ------रावांचं नांव घेत मी देतें जिलेबीचा घास. सोन्याची वाटी, चांदीचा गडू ------रावांना घांस देतें बुंदीचा लाडू. देवाची करणी नारळांत पाणी माझें मन ------रावांच्या चरणीं. आंबाच्या झाडाला कोवळीं कोवळीं पत्रीं |
|
दशक नको, सुट्टे नको , अंक मोजा साठ ------रावांचं नांव घेऊन बांधते आठवणीची गांठ . सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली ------रावांची राणी कामाला गुंतली. निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास ------रावांच्या जोडीनं करीन आयुष्याचा प्रवास. लता डोले, फूल डोले, डोले वनश्री ------रावांचं नांव घेतें ------भाग्यश्री. लक्ष्मी शोभते दानानं, विद्या शोभते विनयानं ------च्या जीवावर मी राहतें मानानं. यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो पावा, बाळानं उजळला ------रावांच्या वंशाचा दिवा. जीवनाच्या प्रवासांत कधीं दुःखाचं ऊन्ह तर कधी सुखाचा पाऊस ------रावांचं नांव घेतें सासूबाईनीं केली मंगळागौरीची हौस. कमळांत उभी लक्ष्मी, मोरावरची सरस्वति ------रावांचं नांव घेतें ------भाग्यवती. भारतमातेच्या पूजेला स्वदेशप्रेमाची पत्री ------रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या रात्रीं. |
गंगा यमुना सरस्वति येऊन मिळाल्या थेट, संसाराच्या सारीपाटावर ------न् ------ची झाली भेट. संसाररुपी सागरांत उसळल्या लाटा ------रावांच्या सुखदुःखांतमाझा अर्धा वाटा. पाण्याचे हंडयावर फुलांचे झांकण ------रावाचे हातांत सोन्याचें कांकण. इकडून वारा तिकडून वारा मध्यें पावसाच्या धारा ------राव बसले कचेरीला वरुन पडती गारा. |
बुधवार, 19 अक्टूबर 2011
मराठी उखाणे 9
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें