रविवार, 30 अक्टूबर 2011

लहान मुलांचा आहार तक्ता | मुलांचा आहार मराठी | लहान मुलांसाठी रेसिपी मराठी | 4 वर्षाच्या मुलांचा आहार | 3 वर्षाच्या मुलांचा आहार | 1 वर्ष वरील मुलांचा आहार | 2 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता | सहा महिने बाळाचा आहार

मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार

 Image result for लहान मुलांचा आहार


(डॉ. श्री बालाजी तांबे)
मुलांच्या रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू, शरीर घडण्यासाठी आणि स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू, उंची वाढण्यासाठी, कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातू यांचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना, या साऱ्याचाच विचार करायला हवा. ......
"कौमारभृत्य' हा आयुर्वेदाने लहान मुलांसाठी आखलेला खास विभाग! यात मुलांचे आरोग्य कसे राखावे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. लहान मुलांचा आहार कसा असावा, येथपासून त्यांची खेळणी कशी असावी, कपडे कसे असावे, त्यांच्यावर कोणकोणते संस्कार करावेत, अशा अनेक विषयांची चर्चा या विभागात आहे.

लहान मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असते ते आहाराचे. लहान मुलांच्या बाबतीत आहाराची योजना अतिशय कुशलतेने करावी लागते कारण तो एका बाजूने पौष्टिक तर असायला हवाच पण दुसऱ्या बाजूने मुलांना आवडायलाही हवा.

Image result for लहान मुलांचा आहार
सहा महिने बाळाचा आहार

सर्वसाधारणपणे चार-पाच वर्षांपर्यंत मुलांचे खाणे घरीच असते. मग मात्र शाळेला सुरुवात झाली की "डबा' सुरू होतो. डबा आवडीचा नसला तर तसाच्या तसा परत येतो, असाही अनेक आयांचा अनुभव असतो. अर्थात आवडनिवड तयार होण्यामागे बऱ्याचशा प्रमाणात पालकच जबाबदार असतात. आतापर्यंतचा अनुभव आहे की "गर्भसंस्कार' झालेल्या मुलांमध्ये खाण्या-पिण्याच्या तक्रारी वा अवाजवी आवडी-निवडी दिसत नाहीत. विशेषतः गर्भवती स्त्रीने गर्भारपणात जो काही आरोग्यदायी आहार घेतला असेल, ज्या पौष्टिक गोष्टी नियमितपणे खाल्ल्या असतील त्यांची आवड उपजतच मुलांमध्ये तयार झालेली असते. नंतरही मुलाला सहा महिन्यानंतर स्तन्याव्यतिरिक्‍त इतर अन्न देण्याची सुरुवात होते, त्यावेळेला मुलाची "चव' तयार होत असते. तेव्हापासून मुलाला सकस, आरोग्यदायी अन्नाची सवय लावणे आपल्याच हातात असते. लहान मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो, विकासाच्या या वेगाला पोषक व परिपूर्ण आहाराची जोड असावीच लागते.

आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर मुलांमध्ये रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला, सर्व शरीरावयवांना प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू महत्त्वाचा असतो. शरीर घडण्यासाठी, मूळ शरीरबांधा तयार होण्यासाठी व स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू आवश्‍यक असतो. उंची वाढण्यासाठी व कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू नीट तयार व्हावा लागतो आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातूचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना तसेच डबा तयार करताना या साऱ्याचा विचार करायला हवा.


लहान मुलांसाठी रेसिपी मराठी

रक्‍तधातुपोषक - केशर, मनुका, सुके अंजीर, डाळिंब, काळे खजूर, काळे ऑलिव्ह, सफरचंद, पालक, गूळ

मांसधातुपोषक - दूध, लोणी, सुके अंजीर, खारीक; मूग, तूर डाळ; मूग, मूग, मटकी, मसूर, चणे वगैरे कडधान्ये

अस्थिधातुपोषक - दूध, गहू, खारीक, डिंक, खसखस, नाचणी सत्त्व

मज्जाधातुपोषक - पंचामृत, लोणी, तूप, बदाम, अक्रोड, जर्दाळू

याशिवाय, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे तृणधान्ये; मूग, तूर, मसूर, चणा वगैरे कडधान्ये; द्राक्षे, शहाळी, ओला नारळ, गोड मोसंबी, पपई, आंबा वगैरे ऋतुनुसार उललब्ध असणारी ताजी व गोड फळे; ताज्या भाज्या; काकडी, गाजर वगैरे कोशिंबिरी; दूध, लोणी, तूप वगैरे स्निग्ध पदार्थ; मध वगैरे गोष्टी मुलांच्या आहारात असायला हव्यात.


लहान मुलांचा आहार तक्ता

मुले शारीरिक दृष्ट्या चपळ असतात. त्यांची सातत्याने काही तरी मस्ती, पळापळ चालू असते. म्हणूनच मुलांना दोन जेवणांव्यतिरिक्‍त काहीतरी खावेसे वाटणे साहजिक आहे. अर्थात एकसारखे "चरत' राहण्याची सवय चांगली नसली, तरी भूक लागेल तेव्हा मुलांना काहीतरी चविष्ट सकस पदार्थ द्यायला हवेत. त्यादृष्टीने दाण्याची चिक्की, डाळीची चिक्की, गव्हाच्या पिठापासून बनविलेली सुकडी, खांडवी, राजगिऱ्याची वडी, तांदळाच्या पिठाची धिरडी, लाल भोपळ्याचे घारगे, थालिपीठ, फोडणीचा ताजा भात, वाफवलेल्या कडधान्यांची कोशिंबीर वगैरे पदार्थ देता येतात.

मुलांच्या आहारावर त्यांचा नुसता शारीरिकच नाही तर मानसिक व बौद्धिक विकासही अवलंबून असतो, त्यांच्यातील कल्पकता, सृजनता, चौकस वृत्तीला खतपाणी द्यायचे असेल तर संतुलित व परिपूर्ण आहाराचे योगदान महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे.


मुलांचा आहार मराठी

आजकाल बरीच मुले घरातल्या इतर व्यक्‍तींचे पाहून लहान वयातच चहा-कॉफी पिऊ लागतात. कोकोपासून बनविलेले चॉकलेट तर मुलांना फारच प्रिय असते. पण, हे तिन्ही पदार्थ मेंदूला उत्तेजना देणारे आहेत. चहा-कॉफी-चॉकलेट खाऊन उत्तेजित झालेल्या मेंदूमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे, शाळेतील मुलांना चॉकलेट अति प्रमाणात देऊ नये. त्याऐवजी सुका मेवा खाण्याची सवय लावावी. चहा-कॉफी ऐवजी शतावरी कल्प, "संतुलन चैतन्य कल्प' टाकून कपभर दूध घेण्याची सवय असू द्यावी. दूध मेंदूसाठी, ज्ञानेंद्रियांसाठी उत्तम असते हे आयुर्वेदशास्त्राने सांगितले आहेच. आधुनिक संशोधनानुसारही मेंदूची व डोळ्यातील नेत्रपटलाची रचना योग्य होण्यासाठी टोरीन हे द्रव्य आवश्‍यक असते आणि ते दुधातून भरपूर प्रमाणात मिळू शकते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लहान मुलांनी, शाळेत जाणाऱ्या मुलांनी नियमितपणे दूध अवश्‍य प्यायला हवे.

आजकाल हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मुले थंडगार आईस्क्रीमच वा सॉफ्ट ड्रिंकच मागतात, मग ऋतू कोणताही का असेना. किंवा चटक- मटक काहीतरी खाण्यासाठी डोसा, उत्तप्पा, वडा असे काहीतरी मागतात. एखाद वेळी या सर्व गोष्टी खाणे ठीक आहे. पण, मुलांच्या आरोग्याची काळजी न घेता प्रत्येक वेळी मुले मागतील ते सर्व देता येणार नाही. या वयात शरीराचे सातही धातू तयार होत असतात. त्यामुळे शरीरात वीर्यापर्यंत सर्व धातू व्यवस्थित तयार व्हावेत, ज्यांचा त्यांना पुढच्या सर्व आयुष्याला उपयोग होईल, असा पोषक आहार देणे आवश्‍यक आहे. लहानपणी कफदोष वाढणार नाही असा आहार मुलांना देणे आवश्‍यक असते.


4 वर्षाच्या मुलांचा आहार

शाळेत जाण्यापूर्वी मुलांना निदान पंचामृत, भिजवून सोलून बारीक केलेले तीन-चार बदाम, "संतुलन मॅरोसॅन'सारखे एखादे आयुर्वेदिक रसायन, तूप घालून खजूर दिला तर मुलांना काहीतरी पौष्टिक दिल्यासारखे होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शाळेत मुलांना न्यहारी किंवा जेवण व्यवस्थित मिळणार नसले तर मुलांना केशर, बदाम, "संतुलन चैतन्य कल्प', शतावरी कल्प वगैरे टाकून दोन वेळा दूध घेण्याची सवय लावावी. याने जेवणाचा होणारा दुराचार काही अंशी भरून निघेल. मुलांना शाळेतून आल्यावर मुगाचा लाडू, खोबऱ्याची वडी वगैरे दिल्यास रात्रीचे जेवण हलके ठेवता येईल.

मुलांना रात्रीचे जेवण लवकरच द्यावे म्हणजे लवकर झोपून मुले सकाळी लवकर उठू शकतील. त्यामुळे मुले वर्गात शिक्षकांनी शिकवलेला अभ्यासक्रम हिरिरीने शिकू शकतील.


3 वर्षाच्या मुलांचा आहार

डब्यामध्ये रोज रोज भाजी-पोळी न्यायला मुलांना आवडत नाही म्हणून मुलांना आवडेल व त्यांच्यासाठी पोषकही असेल असा डबा असायला हवा. बऱ्याच शाळांमध्ये पूर्ण दिवसामध्ये दोन सुट्ट्या असतात, एक छोटी तर दुसरी मोठी, दोन्ही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या तर मुलांनाही तेच तेच खाण्याचा कंटाळाही येत नाही. छोट्या डब्यामध्ये करंजी, खोबऱ्याची वडी, मुगाचा लाडू, मोदक, शिरा, साळीच्या लाह्यांचा चिवडा. फोडणीची पोळी अशा गोष्टी देता येतील.

वाढत्या वयाला पोषक ठरतील व डब्यातही नेता येतील अशा काही पाककृती येथे दिलेल्या आहेत. यापुढील अंकांतून अशा आणखी काही पाककृती आम्ही देऊ.


2 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता

--------------------------------------------------------------
मिश्र भाज्यांचा ठेपला
किसलेला दुधी/गाजर//पालक - २०० ग्रॅम, गव्हाचे पीठ - २५० ग्रॅम, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तिखट - चवीनुसार, किसलेले आले - तीन ग्रॅम, दही- दोन ते तीन चमचे, तूप किंवा तेल - आवश्‍यकतेनुसार

वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत त्यात हळद, हिंग, मीठ, साखर व कोथिंबीर टाकून, आवश्‍यकतेनुसार पाणी घालून, तेलाचा हात लावून मळून घ्यावे. थोड्याशा पिठावर ठेपले लाटून तूप टाकून सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.

हे ठेपले गरम गरम स्वादिष्ट लागतातच पण गार झाल्यावरही चांगले लागतात. हे ठेपले मुलांना घरच्या ताज्या लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर खायला देता येतात.

1 वर्ष वरील मुलांचा आहार

--------------------------------------------------------------
मिश्र धान्यांचा लाडू
तांदूळ - २०० ग्रॅम, मुगाची डाळ - २०० ग्रॅम, गहू - २०० ग्रॅम, पिठी साखर - ७५० ग्रॅम, तूप - ५०० ग्रॅम, वेलची चूर्ण - सहा ग्रॅम, सर्व धान्ये स्वच्छ करून, धुवून, वाळवून घ्यावीत.

लोखंडाच्या कढईत सर्व धान्ये सोनेरी रंगावर भाजून घ्यावीत व गार झाल्यावर दळून (कणकेपेक्षा थोडे जाड) घ्यावी. सर्व पिठे एकत्र करावी.

जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून, त्यात पीठ घालावे व मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजावे.

मिश्रण गार झाल्यावर त्यात पिठी साखर व वेलची चूर्ण मिसळून लाडू बांधावेत.
--------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे












 लहान मुलांचा आहार,लहान मुल,आहार,
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

3 टिप्‍पणियां:

  1. मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार - आरोग्य.कॉम ...
    marathi.aarogya.com/.../मुलांचा-पौष्टिक-आणि-मजेदार-आह...‎
    ई-सकाळ डॉ. श्री बालाजी तांबे मुलांचा आहार.
    BookGanga: मुलांसाठी पौष्टिक आहार-Mulansathi Poushtik ...
    www.bookganga.com/eBooks/Book/5274411299691774385.htm‎
    आपले मूल सुंदर,गुटगुटीत व्हावे असे प्रत्येक आईला वाटत असते.त्यासाठी मुलांच्या उत्तम वाढीकरिता मातांना सहज सोप्या घरघुती पद्धतीने मुलांना आहार देता यावा यासाठी उत्तम असे पुस्तक.
    Global Marathi - वाढत्या मुलांसाठी
    www.globalmarathi.com/GlobalMarathi/Charoli.aspx?BlogId...OId...‎
    २५ मे २०१० – कच्चे अंडे किंवा कच्चे दुध हे लहान मुलांसाठी योग्य नाही. या अन्नातुन संसर्गदोष होऊ शकतो. ... आहार चांगला रहाण्यास मदत होते. पालकांनी आपल्या मुलांना आरोग्यदायी व पौष्टिक आहार योग्य वेळी व योग्य प्रमाणात दिला पाहिजे.
    ज्वारी, बाजरी, नाचणी - Saptahik Sakal - Online weekly from ...
    www.saptahiksakal.com/saptahiksakal/.../4976087480344121460.htm‎
    १९ मे २०१२ – नाचणीची पेज लहान मुलांसाठी उत्तम पौष्टिक घन आहार आहे. नाचणीला मोड आणल्यानंतर वाळवून नंतर त्याचे पीठ करून घेतल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते. नाचणीला मोड आणल्यानंतर त्यातील लोहाला बाधक ठरणारा घटक (टॅनिन) कमी होतो व ...
    orkut - मुलांचा आहार कसा निवडाल?
    www.orkut.com › ... › चर्चामंच‎
    २२ जुलै २००७ – शिवाय, "पौष्टिक' या नावाखाली जाहिरात केली जाणाऱ्या पदार्थांच्या भडिमारामुळे गोंदळूनही जायला होते. अशावेळी मुलांच्या आहाराचा विचार कोणत्या प्रकारे करायला हवा, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळत त्यांना पोषक आहार ...
    मुलांसाठी पौष्टिक आहार - मराठीबुक्स (Marathibooks ...
    www.marathibooks.com/?book=1670‎
    मुलांसाठी पौष्टिक आहार. लेखक: श्रेया माटे प्रकाशक: अनुश्री प्रकाशन किंमत: रु ५० पृष्ठसंख्या:६८ पाने वजन:९१ ग्रॅम बांधणी:Paperback वर्गवारी: आरोग्यविषयक. या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा ...
    पौष्टिक पदार्थ | मराठीवर्ल्ड डॉट कॉम : महाराष्ट्र ...
    www.marathiworld.com/newmw/?q=paushtikpadarth‎
    आपले आरोग्य चांगले टिकवायचे असेल तर या ऋतूमानानुसार आपला आहार ठेवला पाहिजे आणि आशा तऱ्हेने आहारात सतत बदल करणे फार महत्वाचे आहे. उन्हाळयाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. वसंत ऋतूमध्ये उन्हाळयाची तीव्रता कमी असते. ग्रीष्म ...
    मुलांसाठी पौष्टिक आहार mulAMsAThI pAWShTika AhAra
    www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b17038&lang...‎
    बाळ गुटगुटीत, निरोगी आणि हसरे असावे यासाठी योग्य वयात बाळाला योग्य आहार देण्याची गरज असते. असा आहार कोणता, तो कशा प्रकारे आणि किती द्यावा, याची माहिती देणारे "मुलांसाठी पौष्टिक आहार'हे छोटे पुस्तक श्रेया माटे यांनी लिहिले ...
    धुंद गंध...: लहान मुलांचा आहार
    michkashala.blogspot.in/2011/10/blog-post_1210.html‎
    ३० ऑक्ट २०११ – मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार ... "कौमारभृत्य' हा आयुर्वेदाने लहान मुलांसाठी आखलेला खास विभाग! ... विशेषतः गर्भवती स्त्रीने गर्भारपणात जो काही आरोग्यदायी आहार घेतला असेल, ज्या पौष्टिक गोष्टी नियमितपणे खाल्ल्या ...
    नोकरीवाल्या महिला आणि त्यांची मुले
    machindra-ainapure.blogspot.com/2011/11/blog-post_30.html‎
    ३० नोव्हें २०११ – नोकरीपेशा असलेल्या मातांची धावपळ मुलांसाठी अडचणीची ठरत असल्याचे हा सर्व्हे म्हणतो. नोकरदार मातांची मुले ... नोकरदार महिला दिवसभर घराबाहेर राहत असल्याने मुलांना योग्य मात्रेत पौष्टिक आहार मिळू शकत नाही. ते खूपच कमी ...

    जवाब देंहटाएं
  2. BookGanga: मुलांसाठी पौष्टिक आहार-Mulansathi Poushtik ...
    www.bookganga.com/eBooks/Book/5274411299691774385.htm‎
    आपले मूल सुंदर,गुटगुटीत व्हावे असे प्रत्येक आईला वाटत असते.त्यासाठी मुलांच्या उत्तम वाढीकरिता मातांना सहज सोप्या घरघुती पद्धतीने मुलांना आहार देता यावा यासाठी उत्तम असे पुस्तक.
    मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार - आरोग्य.कॉम ...
    marathi.aarogya.com/.../मुलांचा-पौष्टिक-आणि-मजेदार-आह...‎
    ई-सकाळ डॉ. श्री बालाजी तांबे मुलांचा आहार.
    मुलांसाठी पौष्टिक आहार - मराठीबुक्स (Marathibooks ...
    www.marathibooks.com/?book=1670‎
    मुलांसाठी पौष्टिक आहार. लेखक: श्रेया माटे प्रकाशक: अनुश्री प्रकाशन किंमत: रु ५० पृष्ठसंख्या:६८ पाने वजन:९१ ग्रॅम बांधणी:Paperback वर्गवारी: आरोग्यविषयक. या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा ...
    ज्वारी, बाजरी, नाचणी - Saptahik Sakal - Online weekly from ...
    www.saptahiksakal.com/saptahiksakal/.../4976087480344121460.htm‎
    १९ मे २०१२ – नाचणीची पेज लहान मुलांसाठी उत्तम पौष्टिक घन आहार आहे. नाचणीला मोड आणल्यानंतर वाळवून नंतर त्याचे पीठ करून घेतल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते. नाचणीला मोड आणल्यानंतर त्यातील लोहाला बाधक ठरणारा घटक (टॅनिन) कमी होतो व ...
    Global Marathi - वाढत्या मुलांसाठी
    www.globalmarathi.com/GlobalMarathi/Charoli.aspx?BlogId...OId...‎
    २५ मे २०१० – कच्चे अंडे किंवा कच्चे दुध हे लहान मुलांसाठी योग्य नाही. या अन्नातुन संसर्गदोष होऊ शकतो. ... पालकांनी आपल्या मुलांना आरोग्यदायी व पौष्टिक आहार योग्य वेळी व योग्य प्रमाणात दिला पाहिजे. आरोग्यदायी जगणे आत्मसात ...
    मुलांसाठी पौष्टिक आहार mulAMsAThI pAWShTika AhAra
    www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b17038&lang...‎
    असा आहार कोणता, तो कशा प्रकारे आणि किती द्यावा, याची माहिती देणारे "मुलांसाठी पौष्टिक आहार'हे छोटे पुस्तक श्रेया माटे यांनी लिहिले आहे. पारंपरिक, सोप्या आणि सहज बनवता येणार्‍या पाककृती त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.
    पौष्टिक पदार्थ | मराठीवर्ल्ड डॉट कॉम : महाराष्ट्र ...
    www.marathiworld.com/newmw/?q=paushtikpadarth‎
    पौष्टिक पदार्थ. डिंकाचे लाडू · अळीवाचे लाडू · दही मेथीची चटणी. प्रत्येक ऋतू बदलतांना हवामानात बदल होत असतो. आणि बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून हवामानाच्या बदलाबरोबर आपल्याला आपल्या आहारातही बदल करावा ...
    orkut - मुलांचा आहार कसा निवडाल?
    www.orkut.com › ... › चर्चामंच‎
    २२ जुलै २००७ – शिवाय, "पौष्टिक' या नावाखाली जाहिरात केली जाणाऱ्या पदार्थांच्या भडिमारामुळे गोंदळूनही जायला होते. ... या वयातल्या मुलांसाठी आहारयोजना करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे आरोग्याला हितकर अशा सर्व ...
    मुलांसाठी पौष्टिक आहार - Granthalaya.org
    granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=78131‎
    Normal View MARC View ISBD View. मुलांसाठी पौष्टिक आहार. by माटे श्रेया. Authors: माटे श्रेया Published by : अनुश्री प्रकाशन Physical details: 68 Subject(s): माटे श्रेया | मुलांसाठी पौष्टिक आहार Year: 2006. Holdings ( 1 ) · Title Notes. Item type, Location, Call Number, Status ...
    शिशु आणि शाळेला जाण्या आधीच्या वयातील लहान ...
    www.indg.in/health/nutrition/low-cost-nutritious.../view?...‎
    २५ एप्रि २०१२ – शिशु आणि शाळेला जाण्या आधीच्या वयातील लहान मुलांसाठी पोषक नाश्ता. अनेक परिवारांमध्ये हे एक सर्व ... अशा प्रकारे, जास्त खर्च न करता गावातल्या लहान मुलांना पौष्टिक‍ नाश्ता पुरवू शकता. पौष्टिक‍ बिस्किट तयार करण्याची ...

    जवाब देंहटाएं
  3. एपिलेप्सी · स्किझोफ्रेनिया · पार्किन्सन्स · व्यसनमुक्ती · स्थुलता · कर्करोग · नैराश्य · अपंगत्व · मुत्रपिंड स्व-मदतगट · सेतू · कोड - पांढरे डाग · सहचरी मदत गट · मुखपृष्ठ कुटुंबाचे आरोग्य मुलांचे आरोग्य सुदृढ जीवनशैली : लहान मुलांसाठी ...
    माझ्या मुलांसाठी | Facebook
    माझ्या मुलांसाठी. 1415 likes · 1 talking about this.
    मुलांसाठी आर्थिक नियोजन-अर्थ-Maharashtra Times
    १६ जून २०१२ – मुलांना वाढवण्यात आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा व इच्छांना आर्थिक बळ देण्यात आर्थिक नियोजन मोठी भूमिका पार पाडते. भविष्यासाठी पद्धतशीर नियोजन करण्यासाठी आर्थिक नियोजन पालकांना मदत करते.
    धोंडोपंत उवाच: मुलांसाठी अनुभवसिद्ध तोडगे......
    ५ डिसें २००९ – मुलांसाठी अनुभवसिद्ध तोडगे...... || श्री स्वामी समर्थ ||. लोकहो,. मुलांच्या परीक्षा जवळ येत आहेत. त्यामुळे सहाजिकच पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. गेला महिनाभर लहान मुलांच्या पत्रिका घेऊन अनेक पालक आले. तसे ते दरवर्षी ...
    मुलांसाठी दुवे: चित्रकथा, मराठी बालगीते, ई ...
    २२ ऑग २००९ – मुलांसाठी दुवे: चित्रकथा, मराठी बालगीते...
    मुलांसाठी ग्रीन टिप्‍स — India Development Gateway
    १८ नोव्हें २०१० – 1) कागद वाया घालवू नका: कागद बनवण्यासाठी झाडे कापावी लागतात. कागद वाचवल्याने झाडे देखील वाचतात. 2) शाळेत चालत, सायकलने किंवा बसने जा: त्यामुळे इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते. 3) आंघोळ करताना आणि दात घासतांना ...
    शाळेला जाण्या आघीच्या वयातील लहान मुलांसाठी ...
    २५ एप्रि २०१२ – शाळेला जाण्या आघीच्या वयातील लहान मुलांसाठी योग्य पाककृती. आपण आत्ता पर्यंत पाहिले आहे की शाळेला जाण्या आधीच्या वयातीललहान मुलांचे (१-५ वर्ष) पोषण किती आवश्यक आहे. या वयोगटातल्या मुलांना रोज २० ग्राम प्रथिन ...
    लहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे ...
    २९ ऑग २०११ – कार्यक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी इथे टिचकी मारा. सांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्‍या वस्तू ...
    कुमारवयीन मुलांसाठी सेटिंग्ज आणि सुरक्षा ...
    आपल्याला वास्तव जीवनामध्ये जसे निवडकपणे शेअर करण्याची क्षमता असते त्या भोवती मूलतः, Google+ हे उत्पादन बांधलेले आहे. आमची वैशिष्ट्ये गोपनीयता लक्षात ठेवून बांधली गेली आहेत. ज्या पध्दतीने आम्ही आमचे उत्पादन कुमारवयीन ...
    उशिरा पिता बनणे मुलांसाठी चांगले!
    १४ जून २०१२ – उशिरा पिता बनणे हे मुलांना दीर्घायुष्यी बनवते, असे अमेरिकन संशोधकांनी म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीच्या शुक्राणूंची जनुकीय.

    जवाब देंहटाएं

fly