बुधवार, 19 अक्टूबर 2011

मराठी उखाणे 8


 



------रावांच्या भेटीसाठी जनलोकांचा पूर.
आईन वाढवल , वडिलांनी पढवलं ,
------रावांची होतांच सोन्यानं मढवलं.
दारापुढं वृंदावन त्यांत तुळशीचं झाड,
------रावांच्या गुणापुढं दागिन्यांचा काय पाड.
करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी
------रावांची स्वारी पहिलवानासारखी तगडी.
वैशाखाच्या महिन्यांत उन्हाळ्याचा जोर
x xx घराण्यात राव पुरुष थोर.
श्रावणाच्या महिन्यांत जिकडे तिकडे पाणी
------रावांच्या भेटीसाठी मी झाले आतुर चातकपक्षावाणी.
नांवामध्ये आहे काय, नका हट्ट धरुं
------रावांच्या नांवाचा उखाणा चांगलासा जूळत नाही त्याला मी काय करुं ?
घरोघरी त्याचपरी, कोणाला सांगायच काय
------रावांच्या आज्ञेशिवाय पुढे टाकत नाही पाय.
सोन्याच्या घागरी गुलालांनी घासल्या
------रावांच नांव घेतां सख्या सगळ्या हंसल्या
नको गोट पाटल्या , नको पिळाची सरी
------रावांच्या जीवावर काळी गळसुरी बरी.
कौलारु घर त्याला मुरुमाची भर, अंबीरशाही फेटा ,नारळी पदर
------रावांच्या चेहर्यााकडे पाहतांना थांबत नाही नजर.
कल्चर मोत्याला सुईसारखे वेज
------रावांच्या चेहर्याेवर सूर्यासारखं तेज.
साजूक तुपांत नाजूक चमचा
------रावांचं नांव घेते आशीर्वाद तुमचा
कांचेची तसबीर धक्क्यानें फुटली
------रावांच्या करतां मोटार बोदवडची सुटली.
साखरेची करंजी लाल झाली सपीटा सारणानें
------रावांचे नांव घेतें संक्राती कारणानें.
राजवरकी बांगडी मोल करी किंमतीनें
------रावांच्या राज्यांत दिवस जातो गंमतीनें.
वर्तमानपत्रांत लिहून आली वार्ता
------रावांचें नांव घेतें तुमच्या म्हणण्याकरितां.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र होता ढगांत
------रावांची कीर्ती पसरली जगांत.
चतुर्थीच्या दिवशीं मी निवडतें दुर्वा
------रावांच्या जिवावर शालू नेसतें हिरवा.
पूजेच्या साहित्यांत उदबत्यांचा पुडा
------रावांच्या जिवावर भरतें हातभर चुडा.
काळ्या चंद्रकळेवर तार्याासारख्या टिकल्या
------रावांच्या मळयांत खूप तुरी पिकल्या
काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके
------रावांच्या हातांत गुलाबाचे झुबके.
गाईच्या शिंगाना लावला सोनेरी रंग,
------राव बसले कामाला कीं, होतात त्यांतच दंग.
गाण्याच्या मैफलींत पेटीचा सूर,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly