- बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर, …टिंब टिंब रावांच्या संसारात पडली नवी भर.
|
- दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस, आज टिंब टिंब च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.
|
- मावळला सूर्य उगवला शशी, टिंब टिंब चं
नाव घेते बारश्याच्या दिवशी.
|
- शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी, टिंब टिंब चं
नाव घेते बारश्याच्या दिवशी.
|
- हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, . टिंब टिंब... चं नाव घेते .. टिंब टिंब..च्या बारशाच्या दिवशी.
|
- हिरवं लिंबू गारसं, . टिंब टिंब... रावांच्या बाळाचं आज बारसं.
|
- बनारसी शालूला आहेत जरतारी काठ, . टिंब टिंब... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
|
- नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण, . टिंब टिंब... चं नाव घेते बारशाचं कारण.
|
- कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी, .. टिंब टिंब.. चं नाव घेते .... च्या बारशाच्या दिवशी.
|
- दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती, दोघांची नावे घ्यायची, आमच्या जीवनात आला तिसरा साथी.
-
|