सोमवार, 15 अप्रैल 2013

Why is Ravindra Jadeja often referred to as Sir Jadeja?

Why is Ravindra Jadeja often referred to as Sir Jadeja?

रजनीकांतनंतर आता सर श्री रवींद्र जडेजा!

Ravinder Jadeja scored three triple hundreds in first class cricket, and hence was given the title of 'Sir' by trollers.
Image result for Ravindra Jadeja
There was a time when MS Dhoni was tweeting and trolling Sir Jadeja (in good spirit) very often until Sir Jadeja 'revoked' permission to troll him.

रवींद्र जडेजा चेन्नई सुपरकिंग्जचा प्लेअर. पण त्याला सर रवींद्र जडेजा म्हणतात. कारण ते कॅच पकडण्यासाठी कधीही धावत नाहीत. उलट हवेत उडालेला बॉलच त्यांना शोधत येतो आणि त्यांच्याच हातात स्थिरावतो. जेव्हा सर रवींद्र सरावासाठी मैदानावर जाण्याचा विचार करतात , तेव्हा खुद्द मैदानच त्यांच्या दिशेने येऊ लागतं. ही वाक्य ऐकायला जरा ' अति ' वाटत असली तरी सध्या सोशल साइट्सवर रवींद्र जडेजाचा असा बोलबाला आहे. रजनीकांतनंतर तरुणाईमध्ये चर्चा आहे ती याच रवींद्रची.

सोशल साइट्सवरची मंडळी रवींद्रवर जाम फिदा आहेत. त्याच्यावर अशा अतिशयोक्ती कमेंट्सचा पाऊस पडतोय. अर्थात यात काही क्रिकेटपटूही सहभागी आहेत. मुख्यतः आपला भारतीय कप्तान महेंद्रसिंह ढोणी. रवींद्रबद्दल खुद्द माहीनेच काही ' रजनीकांत ' स्टाइलचे ट्विट केलेत. काही दिवसांपूर्वी विकीपिडियावर कोणी एकाने रवींद्रचे खोटे पेज सुरु केलं. त्यावर तो परोपकारी , लोकपुरस्कृत हीरो आणि नोबेल पुस्कारास योग्य असा असल्याचं म्हटलं होतं. ही बातमी कळल्यानंतर ' चेन्नई सुपरकिंग्ज ' मधल्या त्याच्या माही ढोणी , सुरेश रैना आणि अश्विन यांनी रवींद्रच्या नावापुढे लॉर्ड , श्री श्री पंडीत , सर अशा उपाधी लावायला सुरुवात केली. त्यामुळे हा खेळाडू पुन्हा चर्चेत आला.

जडेजाच का ?... २००९ मध्ये झालेल्या ' टी २० ' वर्ल्डकपमध्ये जडेजाच्या स्लो खेळामुळे भारताने दोन मोक्याचे सामने गमावले. आपण ' सुपर ८ ' मध्येच बाहेर पडलो. त्यानंतरही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोनवेळा त्रिशतक केल्याने जडेजाला निवड समितीने भारतीय कसोटी संघात जागा दिली. पण , त्याच्या बॉलिंगवर प्रतिस्पर्धी संघाने धुरळा उडवला. तर बॅटिंगमध्येही तो फसला होता. त्यामुळे त्याच्या जागी इतरांना संधी देण्यात यावी अशी मागणी चाहते करत होते. पण , ढोणीच्या सॉफ्ट कॉर्नरमुळे तो संघात असल्याची चर्चा रंगत होती. अखेर फेब्रुवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटीमध्ये जडेजा १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर एका साइटने जडेजाचे त्रिशतक २८४ धावांनी हुकल्याची तिरकस टीका केली. त्यानंतर अशा कमेंट्सचा मारा सुरू झाला.

ढोणीचे ट्विट्स

रजनी सर म्हातारे होत असल्याची देवाला जाणीव झाल्याने त्याने सर जडेजांना या पृथ्वीतलावर पाठवले.
लहानपणी खेळताना सर जडेजा यांना एक मातीचा डोंगर बनवायचा होता. आता आपण त्याला माऊण्ट एव्हरेस्ट नावाने ओळखतो.
जेव्हा तुम्ही सर रवींद्र जडेजांना १ चेंडूत दोन धावा करण्यासाठी सांगता , तेव्हा ते १ बॉल बाकी ठेवून मॅच जिंकून देतात. 

 



आपण भ़ारतीय लोक कॉपी करायच कधी बंद करणार? ज्या गोष्टी रजनीकान्तच्या नावाने लिहिल्या जातात त्या सुरूवातीला नेटवर चक नॉरिस फॅक्ट या नावाने प्रसिध्ध झाल्या होत्या. आता रजनीकांत गेला आणि जडेजा आला. शेवटी कॉपी ती कॉपिच.  




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly