मंगलवार, 13 सितंबर 2011

lakhache bara hajar

लाखाचे बारा हजार करायचेत ?
प्रश्न ऐकुन चमकलात का ? चमकु नका खरच आमच्या कडे लखाचे बारा हजार करुन देणारी उत्तम स्किम आहे.
त्वरा करा .त्वरा करा .त्वरा करा 

अक्षरशहा डोईजड होइल एवढ्या रकमेच्या कर्जासाठी आपल्या नजिकच्या ब्यांकेत अर्ज करा. आणि एक ग्रुहकर्ज घेउन  पुण्यात घर शोधायला लागा.

जिथे एका सामान्य मध्यमवर्गिय माणसाला २० ते ३० हजाराच्या दरम्यान पगार मिळतो त्याने पन्नास लाखाचे कर्ज कसे कढावे?

अनेक ब्यांकांच्या सुलभ (इथे पण हाच शब्द?) कर्ज योजना उपलब्ध आहेत. अनेक लोकांना ब्यांकेचे फोनही येत असतील आमच्या या या  कर्ज योजनेचा लाभ घ्या.

पण आजकाल लोकं मिळेल त्या दराने कर्ज घेतात आणि उभा जन्म ते कर्ज फ़ेडण्यात घालवतात.   ही सगळि कर्ज आता थकायला लागली आहेत.


म्हणजे आता त्यांचे लिलाव होणार. आणि बाजारात मागणी कमी (आहो पैसे नको का लोकांकडे एवढि  महागाची घरं घेण्यासाठी) आणि पुरवठा जास्त होणार. म्हणजे घरांचे भाव आपोआपच कोसळणार. त्यात भरीस भर म्हणुन आता जागतिक अर्थव्यवस्तेची चाललेली अधोगती (मंदी).  रोजगाराचे रोजच घटत चाललेले आकडे म्हणजे दुघ्द्शर्करा योगच.


मग मी म्हणालो होतो ना आमची लाख़ाचे बारा हजार करण्याची स्किम आहे. तिचा अवश्य फ़ायदा घ्या.
 त्वरा करा .त्वरा करा .त्वरा करा  




आपल्या प्रतिक्रीया अपेक्षीत आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly