शनिवार, 18 मई 2013

चित्रपट

चित्रपट
चित्रपट
मदर इंडिया (1957) मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया चित्रपटाने इतिहास रचला. धरणीला माता मानणाऱ्या आपल्या देशात नर्गीस यांनी वठविलेली एका आईची भूमिका दाद मिळवून गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्षं झाली होती. देशात स्वातंत्र्यानंतर जी परिस्थिती होती, ती परिस्थिती या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोचली. नर्गीस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, राजकुमार अशा दिग्गज कलावंतांनी केलेल्या सुरेख अभिनयाने हा चित्रपट गाजला. काळाने घाला घातल्यामुळे असहाय्य झालेली आई आपल्या दोन्ही मुलांना वाढावते मात्र त्याच वेळी निसर्गाचा प्रकोप होतो आणि परिस्थिती आणखीनच चिघळते. यातूनही मार्ग काढून आपले शेत फुलविणारी ती आई धन्यच मानावी लागते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी या चित्रपटाला संगीत दिले, तर शकील बदायुनी यांनी चित्रपटाची गाणी लिहिली. ऍकॅडमी अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अरब राष्ट्रे, युरोप व इतर देशांमध्ये या चित्रपटाला बरेच यश मिळाले. भारतात आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
Read More »

चित्रगोष्टी
छोट्या पडद्यावर शाहरुख! वी सेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा का ही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' (1992) या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्‍या आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. याशिवाय, चित्रपटांचे प्रमोशन, आयपीएल सामने, मुलाखती वगैरेंच्या निमित्तानेही त्याचे दर्शन टीव्हीवर होते. मात्र, मालिकांमध्ये त्याने अजिबातच दर्शन दिले नाही. आता एका मालिकेच्या निमित्ताने तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे. "ससुराल सिमरका' या मालिकेत एका रिऍलिटी शोच्या जजच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
Read More »

चित्रगोष्टी
रमेश सिप्पींचे पुनरागमन "अ रे ओ सांबा...' म्हणून सुरू होणारा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे हे आजही कोणाला सांगावे लागत नाही, इतका "शोले' यशस्वी झाला आहे. वास्तविक, यश, लोकप्रियता या गोष्टी हिंदी चित्रपटांना नवीन नाहीत पण "शोले'ने यशाची सगळी रेकॉर्डस तोडली. त्याचे डायलॉग्ज तोंडपाठ झाले. चित्ररसिकांना संपूर्ण तोंडपाठ असणारा हा एकमेव चित्रपट असावा. या चित्रपटाचे सर्वेसर्वा दिग्दर्शक रमेश सिप्पी आता अनेक वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शन करण्याच्या विचारात आहेत. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला. "शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला.
Read More »

चित्रगोष्टी
आमिर- सैफचा "फेस ऑफ'? आ मिर खान आणि सैफ अली खान, हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीचे अभिनेते. ते एकत्र आले तर? तसे झाले तर तो एक "कास्टिंग कू' ठरेल- एक सनसनाटी बातमी. निर्मात्याचे पैसे रिलीजआधीच वसूल. हे दोघे प्रत्यक्षात पडद्यावर एकत्र येण्याआधी पुलाखालून किती पाणी वाहून जाते कल्पना नाही पण सध्या नुसत्या या कल्पनेनीच चित्रसृष्टी जणू मोहरून गेली आहे. "तनू वेड्‌स मनू' या चित्रपटाचा वितरक सुनील बोहराच्या मते, जॉन ट्रॅव्होल्टा- निकोलस केजच्या "फेस ऑफ' या गाजलेल्या चित्रपटावर आधारित चित्रपट करण्यास आमिर आणि सैफने मान्यता दिली आहे. मात्र या दोघांना त्याची कल्पनाच नाही. कहर म्हणजे, बोहराकडे "फेस ऑफ'चे हक्कही नाहीत पण या चित्रपटावर आधारित चित्रपट करण्यासाठी तो दिग्दर्शक संजय गुप्ताकडे गेला होता. अशा रुपांतरासाठी संजय गुप्ता प्रसिद्धच आहे. "हा चित्रपट करण्यास आमिर तयार आहे. दुसऱ्या भूमिकेसाठी तो सैफला तयार करेल,' असे बोहराने संजय गुप्ताला सांगितल्याचे समजते. ही बातमी बाहेर आली, तेव्हा कळले, की हीच ऑफर घेऊन बोहरा "वेक अप सिद'वाल्या अयान मुखर्जीकडेही गेला होता.
Read More »

चित्रगोष्टी
"क्रिश 2'मधला खलनायक कोण? आ पल्या चित्रसृष्टीत कधी काय होईल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, राकेश रोशनच्या "क्रिश 2'मध्ये शाहरुख खान खलनायकाची भूमिका करणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यावर विश्‍वास न ठेवण्याचेही काही कारण नव्हते. एकतर शाहरुखसाठी नकारात्मक भूमिका नवीन नाही आणि दुसरे म्हणजे "किंग अंकल', "करण अर्जुन', "कोयला' अशा चित्रपटांत त्याने राकेश रोशनच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे. पण ताज्या अनाउन्समेंटला सध्या तरी चर्चाच म्हणावे लागणार आहे कारण आता दुसरी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे या चित्रपटातील "ग्रे शेड' असलेली ही भूमिका अजय देवगण करणार! यापूर्वी अजय आणि राकेश रोशनने एकत्र काम केलेले नाही. "करण अर्जुन'मध्ये सलमानने केलेली भूमिका आधी अजय करणार होता पण पटकथेवरून ते बिनसले. आता "क्रिश 2'साठी अजयला जी भूमिका देऊ केली आहे, ती बॅटमन सिरीजमधील "जोकर' या पात्रावर आधारित आहे, अशी माहिती आहे. अजय देवगणने ही भूमिका स्वीकारावी, अशी राकेश रोशन आणि हृतिक रोशन दोघांचीही इच्छा आहे. अजय काय निर्णय घेतो, हे बघायचे. ही चर्चा अशी रंगात येत असतानाच, दुसरी एक बातमी कानावर येऊन धडकली..
Read More »

चित्रगोष्टी
हू इज फेअरेस्ट...? ए क छोटंसं राज्य असतं. तिथला राजा खूप चांगला असतो. पहिल्या राणीच्या निधनानंतर राजा दुसरं लग्न करतो. ही राणी खूप दुष्ट असते. चेटकीणच! राजाला एक छोटी, गोंडस मुलगी असते तिचं नाव स्नो व्हाइट अर्थात हिमगौरी! ही स्नो व्हाईट राणीला अजिबात आवडत नसते. पुढं काय होतं, हे आपल्यापैकी प्रत्येकालाच ठाऊक आहे. सगळ्यांना ठाऊक असलेल्या या गोष्टीवर एक इंग्रजी चित्रपट येतो आहे. अर्थात या कथानकावरचा तो काही पहिला चित्रपट नव्हे. मग त्याची चर्चा कशाला?.. तर यासाठी, की या चित्रपटात ज्युलिया रॉबर्टस काम करते आहे. नाही हो! स्नो व्हाइटचं नव्हे, शिंग मोडून वासरू व्हायला ती काय आपल्याकडची नट-नटी नव्हे. आपल्या वयाचं तिला भान आहे. ती चक्क स्नो व्हाइटच्या आईचं, म्हणजे चेटकिणीचं काम करणार आहे. कथानकही सरधोपट जुनं नाही. आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या सावत्र आईचा सूड घेणारी स्नो व्हाइट यात दिसणार आहे.
Read More »

चित्रपट - चित्रगोष्टी
"वन्स अपॉन'मध्ये अक्षय? स ध्या सिक्वलचे दिवस आहेत, असे दिसते. साजिद खानचा "हाउसफुल 2' येतोय, अरबाज खान "दबंग 2' काढण्याच्या विचारात आहे. एकता कपूरचे "बालाजी प्रॉडक्‍शन'ही "वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'च्या यशानंतर त्याचा सिक्वल करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या चित्रपटात इम्रान हाश्‍मीने केलेली शोएबची भूमिका सिक्वलमध्ये अक्षयकुमार करणार आहे. त्या संदर्भात त्याचे आणि निर्मात्याचे बोलणेही झाले आहे. पहिला चित्रपट सुलतान (अजय देवगन) आणि शोएबच्या (इम्रान हाश्‍मी) संघर्षावर आधारित होता. सुलतानचा मृत्यू होतो आणि चित्रपट संपतो तिथून हा नवीन चित्रपट सुरू होणार आहे. शोएबने आपल्या ताकदीने साम्राज्य कसे उभे केले, हे या चित्रपटात प्रामुख्याने दाखविले जाणार आहे. पहिल्या चित्रपटाचा "ड्रामा' हा केंद्रबिंदू होता तर या चित्रपटात "ऍक्‍शन' खच्चून भरलेली असेल. असे असले तरी नवीन चित्रपटाचे कथानक एकदम वेगळेच असण्याची शक्‍यताही आहे. पहिल्या चित्रपटातील अजय देवगन आणि इम्रान हाश्‍मी दोघेही नसल्याने आधीच्या कथानकाचा अडसरही येणार नाही. नवीन चित्रपटात अक्षयबरोबर आणखी एक कलाकार असेल, त्याचे नाव निश्‍चित व्हायचे आहे.
Read More »

सरोगसी'चा वेगळा आयाम - आई व्हायचंय मला
सरोगसी'चा वेगळा आयाम आई व्हायचंय मला "सरोगसी' या विषयावर आधारित "मला आई व्हायचंय' हा पहिला मराठी चित्रपट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन ऍड. समृद्धी पोरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात "सरोगेट बेबी' चा अभिनय करणारा एडन बर्डले हा चार वर्षांचा मुलगा प्रत्यक्षातही "सरोगेट बेबी' आहे. वेगळ्या विषयावरील या चित्रपटाविषयी ऍड. समृद्धी पोरे यांच्याशी झालेला संवाद "समृद्धी सिनेवर्ल्ड'च्या बॅनरखाली तुम्ही स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या विषयावर संपूर्ण लांबीचा चित्रपट करावा असे का वाटले? ऍड. पोरे ः मी गेली अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करते आहे. आजवर विविध प्रकारच्या केस मी हाताळल्या आहेत. मला भेटलेल्या एका सरोगसी केसवर आधारित हा चित्रपट आहे. आपण कथा-कादंबऱ्यात काल्पनिक विश्‍व अनेकदा पाहतो-वाचतो पण कधी कधी त्या कल्पितापेक्षाही वास्तव अधिक लख्ख आणि दाहक असू शकते, याचा अनुभव मी एका केसच्या निमित्ताने घेतला आणि मी अस्वस्थ झाले.
Read More »

chitragoshti
कॅटरिनाकी कविता... हमने देखी है उन आँखोकी महकती खुशबू हाथ से छू के इसे रिश्‍तों का इल्जाम न दो सिर्फ एहसास है ये रूहसे महसूस करो प्यार को प्यारही रहने दो कोई नाम न दो... इतकं नाजूक हे "प्रेम'प्रकरण असतं आणि कॅटरिना कैफला ते खूप आवडतं. तिचा अजूनही "प्रेम' या गोष्टीवर विश्‍वास आहे. "प्रेम' या शब्दाबरोबर दुःख, निराशा, भ्रमनिरास या गोष्टी जोडलेल्या असल्या तरीही त्याबद्दल ती अजिबात निराशेने बोलत नाही. ""माझा प्रेमावर विश्‍वास आहे. आयुष्यात सुखांत (हॅपी एंडिंग्ज) असतात, असे मी मानते. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे,'' असे कॅटरिना कैफचे मत आहे. प्रीतीश नंदी यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यामुळं निर्माण झालेल्या माहौलमध्ये कॅटरिनाही रोमॅंटिक झाली, पोएटिक झाली आणि तिने आपले मन मोकळे केले. मात्र एवढेच बोलून ती थांबली नाही. ती म्हाणाली, ""आतापर्यंत कोणीही माझ्यावर प्रेमकविता लिहिली नाही. त्यामुळे मी नाराज आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही.
Read More »

चित्रगोष्टी
सलमान खानचा डेब्यू? अनेक वर्षे एका क्षेत्रात असूनही दोन व्यक्ती अनेकदा एकमेकांना भेटत नाहीत. एकमेकांबरोबर काम करत नाहीत. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि यश चोपडा हे त्यापैकीच! एकाच क्षेत्रात असूनही त्यांनी एकत्र काम का केले नाही याची कारणे असतील पण आता मात्र ते एकत्र येण्याची शक्‍यता आहे. म्हणजे थेट एकत्र काम नाही पण यशराज बॅनरचा चित्रपट सलमान करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सलमानने आपला चित्रपट करावा, अशी "न्यूयॉर्क'चा दिग्दर्शक कबीर खानची खूप इच्छा आहे आणि त्याचा हा चित्रपट "यशराज बॅनर' निर्माण करत आहे. सामान्यतः या प्रॉडक्‍शनच्या चित्रपटांत प्रामुख्याने शाहरुख खानच हिरो असतो मग यावेळी सलमानला मागणी कशी? असा प्रश्‍न त्याच्या चाहत्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. याचं मुख्य कारण "दबंग'चे यश हेच असावे कारण याआधी या चित्रपटासाठी जॉन अब्राहमचा विचार सुरू होता. "दबंग'च्या यशानंतर मात्र दिशा बदलली. आता केवळ दिग्दर्शक कबीर खानच नव्हे, तर आदित्य चोप्राही सलमानने हा चित्रपट स्वीकारावा यासाठी प्रयत्नशील आहे.
Read More »



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly