रविवार, 19 मई 2013

अध्यात्म

अध्यात्म
स्वच्छतेचे वळण
शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा यांना शास्त्रानुसार त्यांचे कर्म करण्यासाठी कार्यक्षम बनविणे म्हणजेच शुचिता-स्वच्छता. आपले व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन सुदृढ, श्रेष्ठ, उन्नत, ऐश्वर्यशाली करावयाचे असेल, तर आपण शुचितेचे महत्त्व ओळखले पाहिजे. काही म्हणतात, आमचे मन स्वच्छ आणि शुद्ध आहे मग आमचे शरीर, घर हे कसे का असेना! याउलट, काहींचे म्हणणे असते, की आमचे शरीर, घर स्वच्छ आहे, मन कसे का असेना! हे दोन्ही विचार एकांगी आहेत. गाव आणि घर, घर आणि अंगण, शरीर आणि मन, साध्य आणि साधन, व्यक्ती आणि समाज या सगळ्या जोड्या स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, पवित्र राखणे अत्यावश्‍यक आहे. त्यांची स्वच्छता परस्परांवर अवलंबून आहे. आज घरांत आणि बाहेर, शरीरांत आणि मनांत केरकचरा साठला आहे जाळ्याजळमटे झाली आहेत. मोठमोठ्या नद्यांचे पाणी दूषित झाले आहे. वास्तविक, या सृष्टीतील प्रत्येक कण-कण ईश्वराचे आसन आहे, आपल्या देहाचे अंगप्रत्यंग म्हणजे देवाचे वसतिस्थान आहे, अशी आपली श्रद्धा हवी. मग आपोआप आपल्याला स्वच्छतेचे वळण लागेल आणि स्वच्छतेची कल्पना कपड्यांपुरती, शरीरापुरती मर्यादित राहणार नाही.
Read More »

शुद्धीकरणाचे प्रयोग
धावपळ, कमालीची गतिमानता, वेगवेगळे ताण यांमुळे आलेल्या अनारोग्याने आज अनेक जण त्रस्त आहेत. आपल्या संस्कृतीत शरीरशुद्धीसाठी, मनःशांतीसाठी किती तरी उपाय सांगितलेले आहेत. ती जीवनशैली स्वीकारली, तर अनारोग्याच्या तक्रारी निश्‍चित दूर होतील पण तसा प्रयत्न करणारे परिपूर्ण उपाययोजना न करता, आरोग्याची अपेक्षा करीत असतात. यांतील शरीरशुद्धीकडे, शारीरिक आरोग्याकडे जेवढ्या डोळसपणाने, जागृतीने पाहिले जाते, तेवढे महत्त्व मनाच्या आरोग्याला दिले जात नाही किंबहुना मनाचे व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे, हेच फारसे लक्षात घेतले जात नाही. शरीरशुद्धीच्या उपायांनी मनाच्या आरोग्याचे काही लाभ होतातही पण ते मर्यादित असतात. शरीराप्रमाणेच मनाच्या शुद्धीकरणाचेही प्रयत्न मुद्दाम करावे लागतात. आपल्याच मनोव्यापारांचे तटस्थ निरीक्षण ही त्यातील पहिली पायरी. मनाची गती, दिशा त्यातून समजते. दीर्घकालीन सवयीनुसार मनाला हवे तिकडे फिरू द्यावे पण या भ्रमंतीतील दोष नंतर नीट ओळखावेत. ते एकेक करीत काढून टाकतच मनःशुद्धीकडे जाता येते. समर्थ रामदासस्वामींचे "मनाचे श्‍लोक' हे यावरील महान भाष्य आहे.
Read More »

शुद्धीकरणाचे प्रयोग
धावपळ, कमालीची गतिमानता, वेगवेगळे ताण यांमुळे आलेल्या अनारोग्याने आज अनेक जण त्रस्त आहेत. आपल्या संस्कृतीत शरीरशुद्धीसाठी, मनःशांतीसाठी किती तरी उपाय सांगितलेले आहेत. ती जीवनशैली स्वीकारली, तर अनारोग्याच्या तक्रारी निश्‍चित दूर होतील पण तसा प्रयत्न करणारे परिपूर्ण उपाययोजना न करता, आरोग्याची अपेक्षा करीत असतात. यांतील शरीरशुद्धीकडे, शारीरिक आरोग्याकडे जेवढ्या डोळसपणाने, जागृतीने पाहिले जाते, तेवढे महत्त्व मनाच्या आरोग्याला दिले जात नाही किंबहुना मनाचे व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे, हेच फारसे लक्षात घेतले जात नाही. शरीरशुद्धीच्या उपायांनी मनाच्या आरोग्याचे काही लाभ होतातही पण ते मर्यादित असतात. शरीराप्रमाणेच मनाच्या शुद्धीकरणाचेही प्रयत्न मुद्दाम करावे लागतात. आपल्याच मनोव्यापारांचे तटस्थ निरीक्षण ही त्यातील पहिली पायरी. मनाची गती, दिशा त्यातून समजते. दीर्घकालीन सवयीनुसार मनाला हवे तिकडे फिरू द्यावे पण या भ्रमंतीतील दोष नंतर नीट ओळखावेत. ते एकेक करीत काढून टाकतच मनःशुद्धीकडे जाता येते. समर्थ रामदासस्वामींचे "मनाचे श्‍लोक' हे यावरील महान भाष्य आहे.
Read More »

जीवनात समतोल हवा
गरजेपेक्षा काहीही अधिक झाले, की तोल बिघडतो. आहाराचा समतोल बिघडला, की आरोग्यावर परिणाम होतो. वर्तनाचा समतोल बिघडला, की कृतीचा, स्वभावाचा तोल कोलमडतो. सप्तसुरांचा ताल बिघडला, की सुरांचा बेरंग होतो. यासाठी सुरवातीपासूनच तोलाकडे, तालाकडे लक्ष दिले, तर समतोल टिकून राहतो. मानवी षड्रिपूंच्या बाबतीत तर तोलाचे गणित बिघडून चालतच नाही. आजूबाजूला जे जे अनर्थ, संघर्ष दिसत आहेत, ते या शत्रूंचा समतोल बिघडल्यामुळेच. आरोग्याच्या तपासण्यासाठी आत्याधुनिक साधने उपलब्ध असतात. त्यांच्या आधारे आहार-विहारांत, व्यायामांत बदल सुचविले जातात. त्यांचा अवलंब केला, की प्रकृती ठिकाणावर येते. स्वास्थ्य सुधारते. जीवनाचा तोल मोजण्यासाठी काहीच मोजमापे उपलब्ध नसतात. तोल बिघडला आहे, हे त्याचे परिणाम दिसू लागल्यावरच लक्षात येते. आपली नजर वर्तनावर, विचारांवर, स्वभावावर असेल, तरच तोल राखता येतो. दिवसाकाठी काही वेळ शांत बसून विचारांवर, त्यांच्या येण्या-जाण्यावर लक्ष केंद्रित करायचा अभ्यास या तोलाचे मोजमाप सांगू शकतो. ही कुठली गूढगहन साधना नव्हे, तर हा स्वतःचा स्वतःशी केलेला संवाद असतो. माणसामाणसांतील संवाद आज आक्रसत चालला आहे तसाच हा संवादही.
Read More »

त्यागही सात्त्विक हवा
त्याग म्हणजे टाकणे किंवा सोडून देणे. त्याग म्हणजे निःसंग, निश्‍चिंत आणि निर्द्वंद होणे. त्यागाचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. मानवी जीवनातील सर्व अवस्था, स्तर यांतील उत्कर्षासाठी त्यागाची गरज आहे. म्हणून जेथे महानता असेल, तेथे तिच्या मुळाशी त्यागाचेच पाणी घातले गेलेले असते, हे निर्विवाद. त्यागाचेही सात्त्विक, राजस, तामस असे प्रकार असतात. फलाशा न ठेवता निरहंकारी वृत्तीने केलेला त्याग सात्त्विक. यश, नावलौकिक, ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठीचा स्वार्थबुद्धीने केलेला त्याग राजस. स्वतःला आणि जगाला फसविण्यासाठी केलेले त्यागाचे नाटक म्हणजे तामस त्याग. सात्त्विक त्याग उत्तम, राजस मध्यम आणि तामस गैरलागू आहे. मन तर गुंतलेले आहे, सोडता सोडवत नाही पण निरुपाय होऊन अथवा प्रतिष्ठेखातर त्याग करावा लागत आहे अशा स्थितीत केलेला त्याग खरा नव्हे. पिकलेले फळ जसे देठापासून पूर्णतः सुटून गळून पडते किंवा एखादे बंधन जसे तटकन्‌ तुटते तसा त्याग असतो. त्याग म्हणजे स्वामित्व सोडणे. दानही महत्त्वाचे आहेच पण त्याग त्यापेक्षाही श्रेष्ठ, वरची पायरी आहे.
Read More »

स्वाभिमान ही प्रेरक शक्ती
स्वतःच्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल आवड, जिव्हाळा, आस्था किंवा श्रद्धा असणे म्हणजे स्वाभिमान बाळगणे. स्वाभिमान ही प्रेरक शक्ती आहे. अनेक महापुरुषांची जीवने प्रारंभी सामान्य होती पण त्यांच्याकडे कसला ना कसला स्वाभिमान होता. तो काही कारणाने डिवचला गेला आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. अभिमानाने त्यांना जागृत, प्रगत आणि सर्वोन्नत केले. अभिमानामुळे नव्या सामर्थ्याचा संचार होतो आणि बुद्धी नवनवी क्षितिजे ओलांडून जाते. लहानमोठ्या संकटांनी काही जण घाबरून जातात पण अभिमानी माणसे संकट आणणाऱ्या व्यक्तीली किंवा परिस्थितीला लगेच आव्हान देतात आणि यशस्वी होतात. मनुष्याला अभिमान असावा पण दुरभिमान नसावा. दुरभिमान सूक्ष्म आणि तरल असतो. वाळवी ज्याप्रमाणे घराचे खांब पोखरतेत्याप्रमाणे दुरभिमान माणसाचे आणि समाजाचे मन पोखरतो. ज्याला प्रगती करायची आहे, त्याने आपल्या सद्‌गुणांचा आणि सत्कार्यांचा देखील अभिमान बाळगू नये. "आपण मोठे आहोत, असे वाटले, की माणसाने वर पाहावे आणि लहान आहोत, असे वाटले, की खाली पाहावे,' या सद्‌वचनाचा भावार्थ हाच आहे. "गर्वाचे घर नेहमी खाली'च असते.
Read More »

सर्वव्यापी क्रोधावर विजय
रागावर विजय मिळवा, अक्रोधी व्हा, असे सांगितले जाते पण ते वाटते तेवढे सोपे नाही. आपल्याकडून कोणालाही मानसिक, शारीरिक क्‍लेश पोचू नये, अशी मनाची सहजप्रवृत्ती बनणे म्हणजे अक्रोधी होणे. मनाची स्थिती क्रोधविहीन असली, तरच दया, क्षमा, शांती, सेवा, परोपकार हे गुण संभवतात. क्रोध एका क्षणात मोठी हानी करतो. तो कोणतेही प्रतिफल देत नाही. पूर्वी व्यक्तिगत पातळीवर असणारा क्रोध आता सामूहिक झाला आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून समूहाचा क्रोधाग्नी केव्हा पेट घेईल आणि तो किती पसरेल, याचा भरवसा नाही. दंगलींच्या, हिंसाचारांच्या रूपाने आपण आज त्या आगीत होरपळत आहोत. घरात आणि बाहेर, पारिवारिक जीवनात, कार्यालयांत-कारखान्यांत आणि बाजारांत जिकडे तिकडे आज ठिणग्या उडताना दिसतात. क्रोध आज सर्वव्यापी बनला आहे. मोठे दुष्टचक्र क्रोध ही एक प्रकारची दुर्बलता आहे. शरीराने, मनाने आणि बुद्धीने दुर्बल असलेले लवकर क्रोधवश होतात. क्रोधवश झाल्यामुळे ते अधिक दुर्बल बनतात. आपला क्रोध इतरांना नंतर जाळतो पण त्याआधी तो आपल्यालाच जाळतो. क्रोध हे मोठे दुष्टचक्र आहे.&nbsp क्रोधाच्या मुळाशी अहंकार असतो.
Read More »

बोलण्यासारिखें उत्तर येते
कठोर वागणे किंवा बोलणे परिणामकारक ठरते व तसे केल्याने आपल्या मोठेपणाची छाप पडते, अशी अनेकांची समजूत असते पण कठोर बोलण्यापेक्षा मृदू बोलणेच प्रभावी ठरते, असा अनुभव येतो. "मी फारच स्पष्टवक्ता आहे, कोणाच्याही तोंडावर त्याचे दोष सांगायला मी मागेपुढे पाहत नाही,' असे काही लोक अभिमानाने सांगतात. खरे तर, असे बोलून ते काय साधतात? या जगात तोडणे फार सोपे आहे, जोडणे फार कठीण आहे. समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे ः पेरिलें ते उगवते । बोलण्यासारिखें उत्तर येते । तरी मग कर्कश बोलावें ते । काय निमित्य ।। विनयाचे एक प्रकट रूप म्हणजेच मृदुता. म्हणून "विद्या विनयेन शोभते' हे वचन सतत ध्यानात ठेवले पाहिजे. दुर्बलतेमुळे किंवा आत्मविश्वास नसल्यामुळे अनेक लोक कठोर बोलतात. कित्येक जण स्वतःच्या दोषाचे खापर दुसऱ्याच्या माथी मारू पाहतात. दुर्बल, अयोग्य व अकुशल मनुष्य चिडचिड करतो आणि वाटेल त्याला कटू बोलत सुटतो. महापुरुषांची वृत्ती "वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमादपि' अशीच असते.&nbsp मृदुता म्हणजे दुबळेपणा नाही. दुसऱ्याच्या "हो'ला "हो' करणे नाही किंवा खोटेनाटे ऐकून घेणे नाही.
Read More »

तेजोपासक व्हा
देव म्हटला, की त्याच्याभोवती तेजोवलय असलेच पाहिजे, अशी आपली धारणा आहे. देव हा शब्द "दिव्‌' धातूपासून बनलेला आहे. "दिव्‌' म्हणजे प्रकाशणे. देव स्वतः प्रकाशमान असतात आणि ते सगळ्या जगाला प्रकाश देतात. देवांच्या ठिकाणी असामान्य सामर्थ्य आणि तेज असते किंबहुना जेथे म्हणून असामान्य सामर्थ्य आणि तेज असेल, तेथे देव आहे, असे आपण म्हणतो. वायू, अग्नी, जल, सूर्य, उषा, संध्या इत्यादी सर्व वस्तूंच्या ठायी आपण देवत्व पाहतो. अशा तेजांची उपासना करीत, स्वतः तेजोमय बनणे हाच आपला सनातन आदर्श आहे. असंख्य उपासकांनी उग्र तपश्‍चर्यांनी आणि ध्यानधारणांनी तेजाचा मार्ग प्रशस्त करून ठेवलेला आहे. तेजस्विता रणक्षेत्रात असते, तशीच धर्मक्षेत्रातही असते. ती मारण्यात असते, तशीच मरण्यातही असते. ती युद्धात असते, तशीच शांतीतही असते. ती व्याख्यान-प्रवचनांत असते, तशीच मौनातही असते. .................... कोणत्याही संकटांना न जुमानता आपल्या ईप्सित कार्यात यश मिळविण्यासाठी सतत वाढत्या आवेशाने झटणे म्हणजे तेजस्विता होय. जे महापुरुष आपल्या अंतःकरणातील ध्येयवादाचा स्फुल्लिंग सतत जागृत ठेवतात, त्यांच्या ठायी तेजस्विता असते.
Read More »

ज्ञानेश्वरी - क्षमाशीलतेचे व्याख्यान
श्रीज्ञानेश्वरमहाराजांना कोवळ्या वयात वणवण करावी लागली. जातिबहिष्कृत होऊन अनेक संकटे झेलावी लागली. राजमहालात राहणाऱ्या सम्राटांनी ज्यांच्या चरणी मस्तक ठेवावे, त्यांना राहायला धड झोपडीही नव्हती. संन्याशाची मुले म्हणून जगाने त्यांची हेटाळणी केली पण त्यांनी मात्र सर्वांवर अमृतसिंचन केले. ज्ञानेश्वरांचे अंतःकरण म्हणजे जणू क्षमाशीलतेचा महासागर होता. त्यांच्या वाङ्‌मयात कोणाविरुद्ध तक्रार नाही. क्रोध, रोष, ईर्ष्या, मत्सर यांचा लवलेशही त्यात नाही. सगळी ज्ञानेश्वरी म्हणजे क्षमाशीलतेचे विराट व्याख्यानच आहे. लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात पण ते सर्वांना पिकलेली फळे देते - या रूपकाचा अर्थ ज्ञानेश्वरांच्या जीवनात दिसतो. &nbsp "योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ।। विश्व झालिया वन्ही । संतमुखे व्हावे पाणी ।।' यातच क्षमाशीलतेचे सार आहे. ................................. - क्षमाशीलता म्हणजे दुबळेपणा नव्हे. वास्तविक, दुबळा मनुष्य क्षमा करूच शकत नाही. क्षमा हे सामर्थ्यरूपी वृक्षाला लागणारे फळ आहे. ते लहानसहान झुडपांना कधीच लागत नाही.
Read More »



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly