रविवार, 19 मई 2013

महिला शास्त्रज्ञ

महिला शास्त्रज्ञ
अंतराळशास्त्रतज्ज्ञ डॉ. हेलन ओकोआ
अंतराळ क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासशाखांमध्ये आज अनेक महिला कार्यरत आहेत. "ऑप्टिक्‍स' (दृष्टीविषयक प्रकाशशास्त्र), "ऑप्टिकल रोबोटिक्‍स' (यंत्रमानवशास्त्र), "इमेजिंग टेक्‍नॉलॉजी, "स्पेसक्रॉफ्ट कम्युनिकेशन' अशा विद्याशाखांमध्ये केलेल्या संशोधनासाठी ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, त्या अंतराळशास्त्रतज्ज्ञ डॉ. एलन ओकोआ यांच्या कार्याची माहिती कर्तृत्वासाठी स्त्रियांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नाही, हे सिद्ध करणारी आजच्या काळातली एक प्रसिद्ध अंतराळशास्त्रतज्ज्ञ म्हणजे डॉ. एलन ओकोआ. सध्या डॉ. एलन या अमेरिकेतील ह्यूस्टन येथील "जॉन्सन स्पेस सेंटर'च्या उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. एलन यांचा जन्म मे 1958 मध्ये कॅलिफोर्नियातील ला मेसा इथे झाला. त्यांचे वडील किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करत असत तर त्यांची आई साधी संसारी महिला होती. आपली मुलगी पुढे अंतराळात विहार करणार आहे, याची कसलीही कल्पना या दांपत्याला तेव्हा नसणे स्वाभाविकच होते. एलन यांनी मात्र पुढे ती प्रत्यक्षात आणली.

Read More »

जीवरसायन व औषधनिर्माणशास्त्रज्ञ ईलियन गर्ट्रुड
अनेक जीवघेणे रोग, साथीचे आजार यांचा धुमाकूळ आपण नजीकच्या काही वर्षांत अनुभवला आहे. हे रोग आटोक्‍यात आणण्यासाठी वापरली जाणारी औषधे कोणी शोधली, त्यासाठी त्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागले, कुठले कष्ट उपसावे लागले...ते संशोधक मात्र पडद्याआडच राहिलेले दिसतात. अशाच एका अपरिचित राहिलेल्या संशोधनाची हा गाथा - आपण एड्‌स, ल्युकेमिया, हर्पिस, आर्थरायटिस, गाऊट यासारख्या अनेकानेक जीवघेण्या रोगांची नावे सहज घेतो. त्यांवरील उपायांविषयी सरसकट बोलतो पण या रोगांवर उपलब्ध असणारी औषधे कुणी शोधली, ते मात्र आपल्याला कधीच माहिती नसते. उपरोक्त रोगांचेच उदाहरण घेतले तर या रोगांवरील औषधांचा शोध एका महिला शास्त्रज्ञाने लावला, हे आवर्जून सांगायला हवे. ही महिला शास्त्रज्ञ म्हणजे ईलियन गर्ट्रुड! प्रसिद्ध जीवरसायन, औषधनिर्माणशास्त्रतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधिका! ईलियन गर्ट्रुड यांचा जन्म न्यूयॉर्क येथे1918 साली झाला. कर्करोगावर संशोधन करावे, असा विचार तिच्या मनात शालेय शिक्षणाच्या सुरवातीपासूनच होता. हंटर कॉलेजमधून तिने पहिली पदवी मिळवली पण एक स्त्री असल्याचे सांगून कुणीही तिला नोकरी दिली नाही.
Read More »

संगणकशास्त्रज्ञ ग्रेस मरे हॉपर
सुमारे 80 वर्षांपूर्वी "इंटरनेट'चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून "प्रोग्रॅमिंग'मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या "नेव्हल ऑफिसर' ठरल्या. त्यांच्या कार्याचा परिचय - संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. त्या पहिल्या अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ आणि पहिल्या यू. एस. नेव्हल ऑफिसर म्हणून विख्यात होत्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि अमेरिकन नौदलातील असामान्य कामगिरीमुळे त्यांचा उल्लेख "अमेझिंग ग्रेस' असाही केला जातो. इतकेच नव्हे तर यू. एस. नेव्ही डिस्ट्रॉयरला "यू. एस.एस. हॉपर हे नाव त्यांच्याच नावावरून दिले गेले आहे, हा केवढा मोठा गौरव आहे. ग्रेस मरे यांचा जन्म 9 डिसेंबर 1906 रोजी न्यूयॉर्क येथे झाला. शालेय शिक्षणही तेथेच झाले.
Read More »

उत्खननशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ मेरी डग्लस लिकी
मुक्त जीवनाची आवड असणाऱ्या मेरी डग्लसने औपचारिक शिक्षणात रस घेतला नाही पण निरीक्षण आणि अनुभव यांच्या जोडीने अफाट परिश्रमांनी तिने जागतिक स्तरावरील शोधकार्य केले आणि मान्यता मिळवली. जुन्या वस्तू, दगड-धोंडे, मातीचे ढिगारे, ज्वालामुखीची राख ही तिची आवडती शोधक्षेत्रे होती. आपल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा तिने यातूनच मिळवल्या. उ त्तर टांझानियामधल्या रूसिंग बेटावरच्या खडकामधून उत्खनन करून चिपांझीच्या कवटीचे अवशेष प्रथम शोधून काढणारी पहिली महिला उत्खनन-मानववंशशास्त्रज्ञ म्हणजे मेरी डग्लस लिकी! मेरीचा जन्म अर्स्किन आणि सिसिलिया निकोल यांच्या पोटी 1913 साली लंडनला झाला. आर्स्किन हे चित्रकार होते आणि जलरंगातील उत्तम चित्रे काढत असत. त्यांच्या या छंदामुळे ते सतत फिरत असत. फ्रान्स, इटली आणि इजिप्त इथे त्यांचे वारंवार जाणे असे. तेथील निसर्गाची चित्रे काढायची आणि इंग्लंडला येऊन विकायची हाच त्यांचा पोटापाण्याचा धंदा होता. इजिप्तमधील चित्रे काढताना तेथील मोडकळीस आलेले जुने अवशेष, तेथील उत्खनन याविषयी त्यांना उत्सुकता वाटू लागली. मेरी लहानपणापासून वडिलांबरोबर अशा ठिकाणी जात असे. तासन्‌तास बसत असे.
Read More »

पहिली रसायनशास्त्रज्ञ
कोलेस्टेरॉल, पेनिसिलिन, जीवनसत्त्व B - 12, इन्शुलिन अशा आजच्या युगातल्या चिरपरिचित संज्ञा आणि त्याविषयीचे महत्त्वपूर्ण संशोधन सातत्याने 35 वर्षे करत राहणारी पहिली महिला रसायनशास्त्रज्ञ म्हणजे डोरोथी हॉजकिन. जीवनसत्त्व B - 12 च्या संशोधनासाठी तिला 1964 मध्ये रसायनशास्ज्ञाचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. प्र थिनांमधील स्फटिकांचा शोध आणि एक्‍स रे क्रिस्टलोग्राफीचा शोध घेणारी जगातील पहिली महिला रसायनशास्त्रज्ञ म्हणजे डोरोथी हॉजकिन्‌! या संशोधनानंतरचे तिचे संशोधनही विज्ञानविश्‍वात महत्त्वपूर्ण मानले जाते. तिच्याआधीच्या शास्त्रज्ञांची, जिवाणूमधील त्रिमितीयुक्त रचनेचा शोध घेण्याची एक ठराविक पद्धत होती. त्यात क्ष किरणांचा उपयोग केल्यास ती पद्धत अधिक सुकर होते, हे डोरोथीने आपल्या संशोधनाने सिद्ध करून दाखवले. B - 12 या जीवनसत्वामधील रचनेचा तिने लावलेला शोध तिला 1964 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गेला. कुठलेही संशोधन करायचे म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याचे अतिशय किचकट काम न कंटाळता वर्षानुवर्षे कसे करायचे, हे डोरोथीने आपल्या संशोधनाने सिद्ध करून दाखवले.

Read More »

निसर्गाचा विरोधाभास ः लेह-लडाख-कारगिल
नंदनवन असलेल्या काश्‍मीरला पूर्वी गेले होते. निसर्गाची अनेक रंगांची उधळण बघताना मन आनंदाने न्हाऊन निघाले. तेव्हा दल लेकमधील बोटीत राहिलो होतो. छोट्या होडींतून जा-ये करावी लागत असे. ती होडी चालवणारा एक छोटा मुलगा होता. तो तुम्ही लडाखला चला, तेथील निसर्ग बघा, असा सतत आग्रह करायचा. लडाखला जाण्यापूर्वी दल लेकमधील बोटीवर उभी असताना त्याची हटकून आठवण झाली. या प्रवासात प्रामुख्याने विरोधाभास जाणवला. श्रीनगर ओलांडून सोनमर्गमार्गे निघालो. द्रास व कारगिल ही छोटी गावे आहेत पण युद्धामुळे ओळखीची झालेली. समोर दिसणाऱ्या टायगर हिलवरून पाकिस्तानने बॉंबिंग केले. येथील ब्रीज उडविण्याचा विचार होता. तो उडाला असता तर लेहशी संपर्क तुटला असता. आपल्या बोफोर्स तोफांनी चोख उत्तर दिले. उजवीकडील डोंगर आपल्या भागातले. डावीकडच्या डोंगराच्या मागे पाकव्याप्त काश्‍मीर. येथे वॉर मेमोरियल व विजयपथ आहे. तसेच लेहला दुसरे मेमोरियल आहे. येथे आतापर्यंत झालेल्या युद्धात जवान किती कठीण परिस्थितीत लढले याची कल्पना देणारी मोठी चित्रे, त्यांनी वापरलेली आयुधे आहेत. शहिदांचे फोटो बघताना मन भरून येते.

Read More »

इकॉलॉजिस्ट लेखिका राकेल कार्सन.
&nbsp माणूस हा निसर्गाचा एक प्रमुख घटक आहे, स्वामी नाही, हे वास्तव स्वीकारून जीवनभर आपले संशोधन आणि लेखन करणारी ज्येष्ठ अभ्यासक म्हणजे इकॉलॉजिस्ट राकेल कार्सन. वैज्ञानिक स्वरूपाचे पण लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेले कार्सन यांचे लेखन नियतकालिके आणि ग्रंथरूपानेही जगभर लोकप्रिय ठरले. ------- सजीव सृष्टी आणि भोवतालची परिस्थिती यांच्या अन्योन्य क्रिया-प्रतिक्रियांचा सखोल अभ्यास करणारी ज्येष्ठ अभ्यासक, इकॉलॉजिस्ट लेखिका आणि शास्त्रज्ञ म्हणजे राकेल कार्सन. तिचा जन्म 1907 मध्ये पेन्सिल्व्हेनियातील स्प्रिंगडेल नावाच्या छोट्या खेड्यात झाला. आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाची तिला जात्याच आवड होती. त्या निसर्गाचाच एक घटक असणाऱ्या प्राणीसृष्टीविषयीचे कुतूहल आणि ओढ तिच्यात निर्माण झाली ती तिच्या आईमुळे. भूतदयेचा नेमका अर्थ तिला आईमुळेच समजला. आईचेच संस्कार तिच्यावर उमटले. मग या सगळ्या आवडीचे रूपांतर तिच्या लेखनात, अभ्यासात व्हावे यात नवल नव्हते. &nbsp कॉलेजशिक्षणासाठी राकेलने जेव्हा "मरिन बायोलॉजी' हा विषय निवडला तेव्हाच आसपासच्या जीवसृष्टीविषयीचे तिचे प्रेम लक्षात येऊ लागले.
Read More »

इकॉलॉजिस्ट लेखिका राकेल कार्सन
&nbsp राकेल कार्सन &nbsp माणूस हा निसर्गाचा एक प्रमुख घटक आहे, स्वामी नाही, हे वास्तव स्वीकारून जीवनभर आपले संशोधन आणि लेखन करणारी ज्येष्ठ अभ्यासक म्हणजे इकॉलॉजिस्ट राकेल कार्सन. वैज्ञानिक स्वरूपाचे पण लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेले कार्सन यांचे लेखन नियतकालिके आणि ग्रंथरूपानेही जगभर लोकप्रिय ठरले. &nbsp स जीव सृष्टी आणि भोवतालची परिस्थिती यांच्या अन्योन्य क्रिया-प्रतिक्रियांचा सखोल अभ्यास करणारी ज्येष्ठ अभ्यासक, इकॉलॉजिस्ट लेखिका आणि शास्त्रज्ञ म्हणजे राकेल कार्सन. तिचा जन्म 1907 मध्ये पेन्सिल्व्हेनियातील स्प्रिंगडेल नावाच्या छोट्या खेड्यात झाला. आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाची तिला जात्याच आवड होती. त्या निसर्गाचाच एक घटक असणाऱ्या प्राणीसृष्टीविषयीचे कुतूहल आणि ओढ तिच्यात निर्माण झाली ती तिच्या आईमुळे. भूतदयेचा नेमका अर्थ तिला आईमुळेच समजला. आईचेच संस्कार तिच्यावर उमटले. मग या सगळ्या आवडीचे रूपांतर तिच्या लेखनात, अभ्यासात व्हावे यात नवल नव्हते. कॉलेजशिक्षणासाठी राकेलने जेव्हा "मरिन बायोलॉजी' हा विषय निवडला तेव्हाच आसपासच्या जीवसृष्टीविषयीचे तिचे प्रेम लक्षात येऊ लागले.

Read More »



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly