बुधवार, 19 अक्तूबर 2011

मराठी उखाणे 16









------रावांचं नांव घेतें शंभर रुपये तोळा.
पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेचीं पानं, खायला छान, चिमणा आंबा,
त्याच्या केल्या फोडी, आईबापांना गोडी, समोर होती तुळशीची बाग, बागेंत
होती सीता, तिच्याजवळ होती कळशी, कळशींत होतं गंगेचं पाणी
------रावांचं नांव घेतें पंचामृतावाणी.
समोर होता कोनाडा, कोनाडयांत होती सरी, सरी गेली सरकून, नांव घेतें पारखून
------रावांच्या हाताखालीं पांचशें कारकून.
काळ्या मण्यांची पोत हें सौभाग्याचं लेणं
------रावांच्या जिवावर ------चं अवलंबून जिणं.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
------रावांचं नांव घेतें माझी वाट सोडा.
सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्यांची पोत
------रावांच्या चरणीं अर्पण करते माझी जीवनज्योत.
सासू सासरे भाग्याचे दीर माझे हौशी
------रावांचें नांव घेतें हळदी कुंकवाचे दिवशीं.
मंगलदेवी मंगलमाते नमन करतें तुला
------रावांचं नांव घेतें अखंड सौभाग्य दे मला.
आशिर्वाद लाखाचा, अहंकार फुकाचा
------रावांचा संसार करीन मी सुखाचा.
सकाळच्या प्रहरीं नमन करतें दत्ताला
------रावांचं नांव घेतांना आनंद होतो चित्ताला.
काशीसारखें शहर, प्रजेसारखा राजा
------रावांचं नांव घेतें केल्या पुण्यांत अर्धा हिस्सा माझा.
रुक्मीणीनं पण केला कृष्णाला मी वरीन
------x x रावांचा संसार सुखाचा मी करीन.
पांची पांडव सहावी द्रौपदी
------रावांसारखे मिळाले पति, तर देवाचे आभार मानूं किती.
द्राक्षाच्या वेलाखाली चरत होत्या हरिणी
------रावांचं नांव घेतें वडिल मंडळींच्या चरणीं.
जीवनरुपी सागरांत पतीपत्नींेचा खेळ
------रावांचं नांव घेतें संध्याकाळची वेळ.
मणी मंगळसूत्र हें माझें द्र्व्य
------रावांच्या आज्ञेंत रहाणें हेंच माझें कर्तव्य.
देशांत देश हिंदुस्थान, जगामध्यें त्याचा मान
------रावांची कांता देशासाठीं करील दान.
हत्तीवर अंबारी, उंटावर झारी
------रावांची आली स्वारी, तर पहातात नगरच्या नारी.
संसाराच्या देव्हार्यांतत नंदादीप समाधानाचा,
------रावांचा संसार करतें भाग्याचा.
संसारुपी सागरांत पती-पत्नींदची होडी, ईश्वरा सुखी ठेव
------रावांची नि माझी जोडी.
यमुनेच्या तीरीं कृष्णदेव वाजवितो बांसरी,
------रावांच्या जिवावर मी आहें सुखी सासरीं.



















कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly