बुधवार, 19 अक्तूबर 2011

मराठी उखाणे 20

------रावांचं नांव घेतें संध्याकाळच्या वेळीं.
राम बसले रथांत, सीता बसली अंकावर,
------रावांचं तेज झळके माझ्या कुंकवावर.
नीलवर्ण आकाशांत चमकतो शशी,
------रावांचं नांव घेतें संक्रांतीच्या दिवशीं.
कनकाच्या कोंदणांत हिरकणी शोभते,
------रावांची नि माझी जोडी अशीच खुलून दिसते.
सोन्याचं तबक झाकतें शालूच्या पदरानं, शीलवती मी
------रावांचं नांव घेतें विनयानं.
शोधिली वसुंधरा प्रेमलुब्ध माता,
------रावांची मी सुशीला कांता
उभारला ज्यांनीं उत्सव, मैत्रिणी माझ्या हौशी
------रावांचं नांव घेतें मंगल दिवशीं.
अक्राळ विक्राळ वीर चमकते ढगात
.------रावांचं नाव घेते धन्य़ झालें मनांत
खोल्यांत खोल्या सात खोल्या , उघडून गेले आंत ,मधल्या खोलीत ताट
लाडवानं भरलं काठोकाठ , ताटाला केली खूण ------रावांचे नांव घेते
------ची सून
तुळशी तुळशी , तूं माझी काशी, वृंदावनी एकादशी,पाणी घालीन गंगेच,
विमान येईल महाविष्णूचे , विष्णू तूं गाता, जवळ होती रुक्मीणी माता,
तिन सांगितल्या दोन खुणा, आम्ही अज्ञान लेकरुं कृपा करुन चालवावी माय
भक्तीनं वाढ्वावे सन्मानाने दे सत्यनारायणा आशीर्वाद, तुला करते भक्तिचा नमस्कार.
तुळ्शी तुळशी चंद्रभागा सुंदरी , तुझ्या उदकांत भिजली माझी निरी , हाती
ओल्या पडदिनीच्या निर्याा उभी द्वारकेच्या दारी, भेटु दे गोकुळचा श्रीहरी.
उत्तम ऋषी , गौतमऋषी, फुलं तोडते निशिगंधाची ,
न् भेट घेते ------ची
सीतेला चालणं पडलं रामाच्या रथात ,सुखी राहीन
------मी रावांच्या संसारात.
जिर साळीचा करते भात, येळ लवंगाची केली शाक, वनगाईचं पिवळं तूप,दारी
चंदनाचा पाट,चूळ भरावी नदीची , कृष्णाबाईचं तिरीथ, दारी दवबिन्याचं रोप,
चांदीच्या ताटाळ्यांत चिकनी सुपारी , कडुकांत जातें, बंदुला शेला पदर
पालवीतें, जा ग वहिनी उद्यां येते
------रावांच नांव तुमच्या देखत घेते.
जरीचा पदूर अडकला तोड्यांत
------रावांच नांव घेते बाळातनीच्या वाड्यांत.
चांदीच्या ताटांत केशरी बर्फी
------मालक निवडून आले आमच्या ग्रामपंचायती तर्फी.
आपुल्या मुलुखांतच व्हायचा आपल्या भाषेचा मान
------रावांचा नांव घेते ऐका देऊन कान.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly