मंगलवार, 25 अक्तूबर 2011

आजचे विचार

१.       Buy Low – Sell High (Perfect )

२.     थोडीशी सबुरी व थोडासा प्रयत्न  अपयशाला यशात बदलू शकतो.

३.     शेअर वास्तविकतेच्या आधारे नव्हे तर अपेक्षेच्या आधारे खरेदी केले जातात.

४.     पैशांचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जरा कोणाकडे उधार मागून बघा.

५.    नियम क्र. १.: कधीच आपली संपत्ती गमावू नका.

        नियम क्र. २.: कधीच नियम क्र.१ विसरू नका.

६.      जेव्हा ब्रोकर सुद्धा निराश होतात तेव्हाच शेअरची खरेदीची उत्तम वेळ असते.

७.    आपले भविष्य यावर अवलंबून असते की, आपण वर्तमानात काय करतो आहोत.

८.     तेजीवाले व मंदीवाले दोघे पैसे कमावतात पण लालची व घाबरट लोक पैसे गमावतात.

९.      ९९ % वित्त प्रबंधक कुशल नसतात.- विलियम बर्नस्तिंन

१०. तेजीत खरेदी व मंदीत विक्री कधीच करू नये, परंतु प्रत्यक्षात असेच होते.

११.  ६० वर्षाच्या अनुभवातून मी हेच शिकलो की, लोकांना शेअर बाजाराची भविष्यवाणी करण्यात सफलता प्राप्त होत नाही. – -ग्राहम बेंजामिन

१२.  जर तुम्हाला भीती वाटते, तर सर्वात अगोदर घाबरून बाहेर पडा.

१३. रुपये खताप्रमाणे आहेत. जर तुम्ही ते पसरवले नाहीत तर ते सडून त्याचा वास येऊ लागेल.- जे.पौल. गेट्टी

१४.ऑक्टोबरमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होते. तशीच ती पुढील महिन्यातही होते. : जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे.

१५. जर व्यापारात वाढ झाली तर आज किंवा उद्या ती वाढ शेअर मध्ये जरूर दिसेल.- वौरेन बफे

१६.   जमा वजा खर्च म्हणजे फायदा हे लोकांना सतत सांगत रहा म्हणजे लोकांना तुम्ही हुशार वाटाल.

१७. तेच विका जे जास्तीत जास्त लोक खरेदी करू इच्छितात व तेच खरेदी करा जे लोकांना नको.

१८.  खरीददार तोच जो शेअरचे भाव वाढतील असे समजतो आणि विक्रेता तो, जो शेअरचे भाव पडतील असे समजतो. या दोघांपैकी एकजण चुकीचा ठरतो.

१९.   ब्रोकर म्हणाला म्हातारपणासाठी हा शेअर खरेदी करा आणि खरेच तो शेअर खरेदी केल्यानंतर मी एका आठवड्यात म्हाता-याप्रमाणे झालो. – जडी केन्तर

२०. गुंतवणूकदारांनी कितीही काळजी घेतली किंवा काहीही केले तरी त्याला रिस्क हि घ्यावीच लागते.

२१.  गुंतवणूकदारांनी या चार शब्दापासून सावध रहावे.: “यावेळी परिस्थिती वेगळी आहे.”

२२. कालची तयारी आजच करा.

२३. एकाच टोपलीत सर्व अंडी ठेऊ नका.

२४.जोखीम घेणे चांगले असते, परंतु त्याचे नियोजन नसणे खतरनाक असते.

२५.सफल व्यक्ती नेहमी नशिबाने बनतो. विश्वास नसेल तर असफल व्यक्तीला विचारून बघा.

२६.बुद्धी पेराशूट प्रमाणे असते. ती खुली असेल तरच काम करते.

२७. मी कधीच पडलो नाही हि गौरवाची गोष्ट नाही , . गौरवाची गोष्ट हि आहे की, मी पडून उठलो.

२८. जर तुम्हाला पाचवीचे गणित येतेय तर नक्कीच तुम्हाला शेअर बाजार समजण्याची अक्कल आहे.

२९. शेअर बाजारात ९० % लोक बिना तयारीचे उतरतात.

३०. मी ५० हून अधिक हॉट टिप्स देणा-यांची सेवा खरेदी केली व त्या सर्व टिप्स मध्ये मी गुंतवणूक केली असती तरी मी नुकसानीत राहिलो असतो.- चार्ल्स स्क्वेब


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly