रविवार, 5 जनवरी 2020

फुगड्यांचे उखाणे (Fugdyanche Marathi Ukhane)

फुगड्यांचे उखाणे (Fugdyanche Marathi Ukhane)


  • चांदीचा हार माणकांनी भरा, फुगड्या खेळायला सुरूवात करा.
  • सासूने दिली सोन्याची बांगडी, तुझी नि माझी पहिली फुगडी.
  • आम्ही दोघी मैत्रिणी माडीवर माडीवर, फोटो काढू साडीवर साडीवर.
  • बटाट्याची भाजी आंबली कशी - आंबली कशी, माझी मैत्रीण दमली कशी - दमली कशी.
  • खोल-खोल विहीरीला उंच उंच चिरे, तुझी नि माझी फुगडी गरा गरा फिरे.
  • तुझी माझी फुगडी गिरकेदार, सगळ्यांना आवडे फारच-फार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly