PAVITRA PORTAL : खाजगी व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या इ ९ वी ते इ १२ वी या गटातील मराठी/इंग्रजी माध्यमाची रिक्त पदे पाहण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे.
सूचना
1. उमेदवारांकडून त्यांना आलेले प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करण्याबाबत NIC कडे विचारणा करण्यात येत आहे. याबाबत उमेदवारांना सूचित करण्यात येते की, पवित्र पोर्टल Pvt. Management Vacant Posts अंतर्गत इ. 9वी ते 12वी या गटातील 10 संस्थांच्या रिक्त असलेल्या पदांचा व बिंदूनामावलीचा तपशील दाखविण्यात आलेला आहे. .
2. उमेदवारांनी त्यांचा स्वत:चा प्रवर्ग, समांतर आरक्षण, अथवा खुल्या प्रवर्गातील प्यूअर मध्ये रिक्त जागा, माध्यमानुसार आपल्या स्वत:च्या विषयाची जागा इ. बाबी तपासून आलेले प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करावी.
3. उमेदवारांस काही प्राधान्यक्रम आलेले नाहीत असे दिसून येत असेल तर आलेले प्राधान्यक्रम Delete करून पुन्हा Generate करून लॉक करावेत. असे करण्यासाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम Delete करण्याची सुविधा सुरू आहे.
4. उमेदवारांनी Login केल्यानंतर Report या मेनूतील Locked Preference वर Click करून Locked Preference ची प्रत दि.10/01/2020 पर्यंत स्वत:कडे जतन करून ठेवावी.
अ ) उर्दू माध्यम शिफारसपात्र उमेदवारांची यादी
१)उर्दू माध्यमातील रिक्त पदासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका यांची व्यवस्थापननिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या लॉगिंवर उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी सर्वसाधारण यादी पहावी. या यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी दि १०/०१/२०२० पर्यंत संबंधित संस्थेत उपस्थित राहून नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
ब ) इ ९ वी ते इ १२ वी या गटातील खाजगी संस्थातील रिक्त पदे
१. मा.उच्च न्यायालय,खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार खाजगी संस्थेतील इ. ९ वी ते इ १२ वी या गटासाठी नव्याने प्रक्रिया करण्यात येत असल्याने शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी प्राधान्यक्रम दिलेले उमेदवार आणि नव्याने प्राधान्यक्रम देणारे उमेदवार या सर्वानी आपले प्राधान्यक्रम दि १०/०१/२०२० पर्यंत लॉक केलेले असणे बंधनकारक आहे.
२. ज्या उमेदवारांना पदव्युत्तर पदवीतील श्रेणी अपडेट करण्याची सुविधा दिलेली होती त्या उमेदवारांना प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांचे पूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम विचारात घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नव्याने प्राधान्यक्रम जेनरेट करून लॉक करणार नाहीत अशा उमेदवारांचा निवड प्रक्रियेत समावेश होणार नाही.
३. उमेदवारांना खाजगी संस्थेतील इ. ९ वी ते इ १२ वी या गटासाठीचेच प्राधान्यक्रम उपलब्ध होतील, पूर्वी लॉक असलेले अन्य प्राधान्यक्रम दिसणार नाहीत. कारण सध्या इ. ९ वी ते इ १२ वी या गटासाठी निवड प्रक्रिया करण्यात येत आहे.
४ . Mahatma Phule Shikshan Sanstha Urun-Islampur Tal. Walwa Dist. Sangli.(273509SC017) या संस्थेच्या Health & Physical Education या पदासाठी पूर्वी प्राधान्यक्रम मुलाखतीसाठी यासाठी आलेले होते त्याऐवजी आता मुलाखतीशिवाय यासाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे M.P.Ed. पदव्युत्तर पदवी वा समकक्ष अर्हता असणाऱ्या उमेदवारांनी पूर्वी आलेले प्राधान्यक्रम Delete करून नव्याने Generate करून पुन्हा लॉक करावेत.
५). इ ११ वी ते इ १२ वी या गटातील पदासाठी ज्या उमेदवारांची व्दितीय श्रेणी अपडेट करणे आवश्यक होते तसेच इ ९ वी ते इ १० वी या गटातील प्राधान्यक्रम न आलेल्या सर्व उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे.
६). ज्या उमेदवारांनी यापूर्वी शैक्षणिक पात्रतेमुळे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जेनरेट करण्यापूर्वी समांतर आरक्षण विषयक माहिती Self Declaration (Social category And Creamy Layer etc) यावर क्लिक करून Declaration Details समोर क्लिक करून yes साठी टिक करावे त्यानंतर Creamy Layer Details, Social Category Details अन्य तपशील तील माहिती समोर योग्य त्या ठिकाणी टिक करावे त्यानंतर Save बटन वर क्लिक करावे. Save केलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून येणाऱ्या फॉर्मसमोर Ok वर क्लिक करावे. यामुळे समांतर विषयक माहिती पूर्ण होईल.
७). नव्याने प्राधान्यक्रम भरणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची ( उदा. महिला,माजी सैनिक ,अंशकालीन ,प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त,खेळाडू ,अनाथ इत्यादी ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती save केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून save करून येणाऱ्या फॉर्मसमोर Ok वर क्लिक केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.
८). ज्या उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नव्हती अशा उमेदवारांनी त्यांचे यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम Report या मेनूमध्ये View Locked preferences (Without Interview) मध्ये केवळ इ ९ वी ते इ १२ वी साठीचे दाखविण्यात आलेले आहेत . सदर लॉक केलेले प्राधान्यक्रम यापूर्वी दिलेल्या पसंतीक्रम नुसार दर्शविण्यात आलेले आहेत.
९). वरील अ क्र ८ मध्ये ज्या उमेदवारांना यापूर्वी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमातील पसंतीक्रमध्ये बदल करावयाचा असल्यास Delete All Preferences Without Interview यावर क्लिक करून पूर्वीचे प्राधान्यक्रम Delete करावेत त्यानंतर Generate, Assign , Confirm Preferences, Lock preferences करावेत.त्यानंतर त्यांना Report मेनू मध्ये जाऊन लॉक केलेले प्राधान्यक्रमाची प्रिंट घेता येईल. ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रमामध्ये बदल करावयाचे नाहीत त्यांनी विना कारण lock असलेले प्राधान्यक्रम delete करू नयेत.
१०). खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत. अशा उमेदवारांनी लॉगिन करून त्यांच्या समांतर आरक्षण विषयक माहिती भरावी व प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत.
११). उमेदवारांना दि ०१/०१/२०२० ते दि १०/०१/२०२० या कालावधीमध्ये मुलाखतीशिवाय संस्थांचे माधयमिक आणि उच्च माध्यमिक साठीचे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीच्या दुस-या टप्प्यामध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याची निवड यादी प्रसिद्ध करण्याचा क्रम खालीलप्रमाणे असेल.
१.बृहन्मुंबई मनपा शाळा (सुधारित यादी)
२. उर्दू माध्यमाच्या शाळांतील रिक्त राहिलेली पदे
३. मा. उच्चन्यायालय, नागपुर यांचे आदेशानुसार इ. ९ वी ते इ. १ २ वी खाजगी संस्थांमधील पदांची निवड यादी
४. वरील सर्व निवड यादी व्यतिरिक्त रिक्त राहिलेल्या माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त पदांची निवड यादी
५. मुलाखतीसह खाजगी संस्थामधील पदांसाठीची निवड यादी
वरील क्रमाने प्रसिद्ध होणा-या निवड यादीत उमेदवारांची एकदा शिफारस झाल्यास पुढील कुठल्याही यादीत त्यांचा निवड प्रक्रियेसाठी विचार होणार नाही, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
ब) उर्दू माध्यम रिक्त पदे
१. पवित्र प्रणाली अंतर्गत दि०९/०८/२०१९रोजी नियुक्तीस शिफारस पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे.
२. शिल्लक राहिलेली समांतर आरक्षणासह आरक्षित पदे खुल्या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणा सह दर्शविण्यात आलेली आहेत त्यामुळे खुला प्रवर्ग विचारात घेऊन पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत.
3.ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या दि.०९/०८/२०१९ च्या निवडयादी मध्ये शिफारस झालेली नाही. अशा सर्व पात्र उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवाराचा शिल्लक रिक्त पदावरील पद भरतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
४.यापूर्वी दिलेले प्राधान्यक्रम प्रथम निवड यादीसाठी विचारात घेण्यात आलेले आहेत.त्यामुळे यापूर्वीचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरीत रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून नव्याने भरण्यात येणार असल्यामूळे पात्र सर्व उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम मागविण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र सर्व उमेदवारांनी रिक्त पदांसाठी नव्याने प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.
५.सदर उर्दू माध्यमातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारा कडून प्राधान्यक्रम मागविण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. प्राधान्यक्रम मागविण्याचा कालावधी पोर्टलवर कळविण्यात येईल .
६. दि.०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या यादी नंतर प्रवर्ग निहाय रिक्त राहिलेल्या समांतर आरक्षणातील जागा खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणा मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. समांतर आरक्षण व PURE प्रवर्गातील पदे विचारात घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे समांतर आरक्षणातील रिक्त राहणारी पदे PURE प्रवर्गा मध्ये रूपांतरित करून उर्वरित सर्वच उमेदवारांना विचारात घेऊन स्वतंत्रपणे शिफारसपात्र उमेदवारांची दुसरी निवडयादी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या यादी मध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांना दुस-या यादीमध्ये Betterment चा पर्याय राहणार नाही याची नोंद घ्यावी. वरील बाब विचारात घेवूनच प्राध्यान्यक्रम द्यावेत .
७.पद भरतीसाठी उपलब्ध होणारी खुला प्रवर्गातील समांतर आरक्षणनिहाय ,गट, विषयनिहाय शिल्लक रिक्त पदे उमेदवारांना पवित्र पोर्टल च्या होम पेजवर Management-wise urdu medium vacant Post या Menu अंतर्गत Zilla Parishad, Mahanagarpalika,NagarPalika यावरClick करून त्या त्या व्यवस्थापनाच्या शिल्लक रिक्त पदाची स्थिती पाहता येईल.
८. बृहन्मुंबई महानगरपालिका व खाजगी संस्थातील (मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या) इ. ९ ते इ. १२ साठीची या पूर्वीची निवड यादी सुधारित होणार असल्याने या संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना उर्दू माध्यमासाठी पात्र असल्यास त्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहेत.
९. उर्दू माध्यमातील माजी सैनिकांची सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातील PURE प्रवर्गामध्ये रुपांतरीत करण्यात आलेली आहेत.
१0.उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यांनतर (मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त झाल्यानंतर लॉग आऊट करण्यापूर्वी) Report Menu मध्ये जाऊन लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची स्वतःच्या माहितीसाठी प्रिंट कॉपी स्वतःकडे ठेवावी.
क) खाजगी शाळातील इ ९ वी ते इ १२ वी नियुक्ती बाबत
१. मा.उच्चन्यायालय,खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्याशर्ती ) नियमावली१९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान व्दितीय श्रेणी असणा-या उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन या उमेदवारांसह यापूर्वी प्राधान्यक्रम दिलेले उमेदवार यांची जाहिराती नुसार आरक्षण,विषय, प्राधान्यक्रम विचारात घेऊन गुणवतेनुसार इ. ९ वी ते इ १२वी या गटासाठी सुधारित शिफारस पात्र यादी तयार करण्यात येणार आहे.
२. यापूर्वी मुलाखतीशिवाय निवडीसाठी खाजगी व्यवस्थापनाच्या इ ९ वी ते इ १२ वी ची दि ०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध केलेली शिफारस पात्र यादी रद्द करण्यात येत आहे.
३. ज्या उमेदवारांना या पूर्वी इ. ११ वी ते इ. १२ वी या गटासाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या श्रेणीची माहिती यापूर्वी पोर्टलवर घेण्यात आलेली नसल्यामुळे केवळ अशा उमेदवारांकडून किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असल्याची माहिती घेण्यात येणारआहे.
४. त्यानंतर या माहितीच्या आधारे उमेदवारांच्या शैक्षणीक अर्हतेमध्ये इ.९वीतेइ. १०वी या गटातील पदांसाठी पदवीमध्ये उत्तीर्ण परंतु, ५० टक्केपेक्षा कमी गुण असणा-या उमेदवारांकडुन मुलाखतीसह/मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येतील.
५. त्याचप्रमाणे इ. ११वी ते इ १२वी या गटातील पदांसाठी पदव्युत्तर पदवीमध्ये व्दितीय श्रेणी असणा-या परंतु, ५० टक्के पेक्षा कमी गुण असणा-या उमेदवारांकडुन मुलाखतीसह/ मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येतील.
६. ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.
७. खासगी संस्थांकडून मुलाखतीशिवाय निवड करण्यासाठी संस्थांची यापूर्वी पोर्टलवर नोंद केलेल्या बिंदु नामावलीतून इ. १ ली ते ८ वी गटातील निवड केलेली पदे वगळून इ ९वी ते १२ वी साठी पदे पोर्टलवर सुधारित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे करण्यात येईल .
८. वरील प्रक्रीयेसाठी पवित्र पोर्टलवर आवश्यक सुविधा झाल्यानंतर श्रेणीची माहिती भरण्याचे/ प्राध्यान्यक्रम देण्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे देण्यात येईल.
ड ) माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदे भरण्याबाबत
१. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या रिक्त जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील PURE मधून भरण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.( उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत. )
२. त्या त्या सामाजिक आरक्षणातील माजी सैनिक या समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर रिक्त पदे त्यात्या सामाजिक आरक्षणातील PURE मधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत.
३. दि ०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये समांतर आरक्षणातील काही पदांसाठी शिफारस न झालेल्या काही उमदेवारांकडुन निवेदने प्राप्त झाली होती. सदर निवेदने तपासण्यात आलेली आहेत. त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात येईल.
इ) मुलाखतीसह पदभरती
१. वर नमूद केलेली कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत उमेदवारांमधून खाजगी संस्थातील मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांसाठी एका पदासाठी उपलब्धतेनुसार १० उमेदवार या प्रमाणात व एका उमेदवारास गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० पदासाठी मुलाखतीद्वारे निवडीसाठी शिफारस करण्यात येईल.
-------*******-------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें