शुक्रवार, 7 अक्टूबर 2011

सब कुछ स्टीव्ह जॉब्स


अ‍ॅपल कंपनीचे सह-संस्थापक व माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांचे बुधवारी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. जॉब्स गेली अनेक वर्षे कॅन्सरमुळे आजारी होते. जॉब्स यांचा जन्म १९५५ साली झाला. १९७६ साली जॉब्स यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये एका गॅरेजमध्ये अ‍ॅपल कंपनीची स्थापना केली. 

२००१ साली आलेला आयपॉड, २००७मध्ये टचस्क्रीन आयफोन आणि २०१० मध्ये आलेल्या टच स्क्रीन टॅबलेट कॉम्प्युटर या त्यांच्या अद्ययावत उपकरणांमुळे जगात संगीत, मोबाईल व कम्यपटर क्षेत्रामध्ये अक्षरश: क्रांती घडली.

ऍपलची स्थापना
स्टीव्ह जॉब्ज आणि त्यांचे शाळेतील मित्र स्टीफन वॉझनिक व माइक मार्कुला आणि इतरांनी यांनी 1976मध्ये कॅलिफोर्नियात ऍपल कंपनीची स्थापना केली.

ही कंपनी सोडण्याची वेळ जॉब्जवर 1984च्या शेवटाला आली. याबद्दल जॉब्ज म्हणतो, ""यशस्वी झाल्याने जडपणा आला होता. पहिल्यापासून सुरवात करावी लागणार असल्याने हलके वाटते आहे.''

अ‍ॅपलच्या दुस-या इनिंगमध्ये जॉब्ज अधिक झपाटय़ाने व तितक्याच हेकेखोरपणे वावरले. ‘मायवे ऑर द हायवे’ असे त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी गमतीनं म्हटलं जायचं. 1998 पर्यंत आयबीएम व मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी मॅकिंटोशची सद्दी संपवून त्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

पण जॉब्ज यांनी त्यांच्या भात्यातला पहिला ‘आय’ बाहेर काढला व आय-मॅक हा कम्प्युटर बनवला. यासाठीची ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टच्या एमएसच्या तोडीची होती.

डिझायनिंगमध्ये आय-मॅक आयबीएमपेक्षा अव्वल होता. थोडा महाग होता, पण श्रीमंत वर्गात रुची निर्माण करणारा होता. आय-बुक हे लॅपटॉपचे आद्य भावंडही याच काळात बनवले गेले.

 लौकिकार्थाने शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या म्हणजे अर्ध्यातच कॉलेजला रामराम ठोकणा-या जॉब्स यांनी २१व्या वर्षी अ‍ॅपलची स्थापना एका गॅरेजमध्ये एका मित्रासोबत केली. दैवदुर्विलास म्हणजे आपल्याच कंपनीतून त्यांना १९८५मध्ये बाहेर पडावे लागले. त्यानंतर अ‍ॅपलचा उतरता काळ सुरू झाला आणि जिवापाड प्रेम केलेल्या या कंपनीला तारण्यासाठी १२ वर्षांनी जॉब्स पुन्हा अ‍ॅपलच्या सेवेत दाखल झाले.

 प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे जॉब्स यांनी ऑगस्ट २०११ मध्ये अ‍ॅपलच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी टीमोथी कुक यांना निवडण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच स्टीव्ह जॉब्स यांच्या अनुपस्थितीत अ‍ॅपल कंपनीने आयफोन ४-एस हा नवा फोन बाजारात आणला होता.

जॉब्स यांची कारकिर्द म्हणजे तंत्रज्ञानातील चमत्कार, व्यक्तिगत आयुष्यात नशीबाचे फटके याचे अजब मिश्रण होते. २४ फेब्रुवारी १९५५ रोजी जन्मलेल्या जॉब्ज यांची आई जोन सिम्पसन कुमारी माता होती. तिने जॉब्सच्या वडीलांशी म्हणजे अरबी वंशाच्या अब्दुल फताह जंडाली यांच्याशी नंतर विवाह केला, परंतु त्यापूर्वी तिने लहानग्या स्टीव्हला क्लारा व पॉल या जॉब्स दांपत्याला दत्तक दिले.

 त्यानंतर अवघ्या चार वर्षांत १००० गाणी खिशात मावणा-या आयपॉडच्या लाँचने क्रांती केली आणि मग अ‍ॅपलने या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला. टच स्क्रीनचा आयफोन, टॅबलेट कम्प्युटर अशा एकापेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांमुळे जग जॉब्स यांच्या प्रेमात पडले.

जॉब्सना ओळखणारी माणसे सांगतात की स्टीव्ह यांची घडण उद्योजकाची नव्हती. कॉलेज सोडलेला, कॅलिग्राफीत रमलेला तो एक वेडा माणूस होता. इतर लोक कुठल्या रस्त्याने जातात याचा विचार न करता त्यांनी आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीवर प्रेम केले, तिला वाव दिला. आपण जे उत्पादन बनवणार आहोत, ते सोपे असावे, लोकांना सहज वापरता यावे आणि आपल्या उत्पादनाच्या केंद्रस्थानी ती वापरणारी व्यक्ती असेल अशी साधीसोपी धारणा जॉब्स यांचे वैशिष्ट्य होती.

वाईट गोष्ट पण प्रभावी मार्केटिंगच्या जीवावर खपवता येते असा दृढ समज असलेल्या कालखंडामध्ये, जर उत्पादन लोकांच्या उपयोगाचे असेल तर त्याची प्रसिद्धी आपोआप होते अशी श्रद्धा जॉब्स यांनी जपली.

स्टीव्ह जॉब्स गुरुवारी सकाळी कालवश झाले. भारतीय धारणेप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी बरीच वर्षे मृत्युशी झुंज दिल्यावर मरण पावलेल्या जॉब्स यांचे सोनेच झाले.

 2004 मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. पण या काळातही जॉब्ज यांची ऊर्जा, जिद्द, विचारशक्ती जराही कमी झाली नाही. ती कमी झाली याची जाणीव झाल्याक्षणी म्हणजे गेल्या 24 ऑगस्ट रोजी त्यांनी निवृत्ती जाहीर केली आणि टिम कुक यांना उत्तराधिकारी नेमले.


2007 मध्ये टचस्क्रीनवाला स्मार्टफोन आय-फोनचे अनावरण झाले. 2010 मध्ये आय-पॅड हा टॅब्लेट पीसी जगासमोर आला. या वर्षी जूनमध्ये आय-क्लाउड या ऑनलाइन स्टोरेज प्रणालीचे अनावरण झाले. या ‘आय’कॉनिक उत्पादनांचे प्रणेते जॉब्जच होते.


अ‍ॅपलने अमेरिकेच्या एक्झॉन मोबिलला मागे टाकले. या वर्षाच्या सुरुवातीस गूगलला मागे टाकून अ‍ॅपल हा जगातील सर्वाधिक मूल्यवान ब्रँड बनला. एका गॅरेजमध्ये 35 वर्षापूर्वी सुरू झालेल्या छोटय़ा कंपनीने अशी थक्क करणारी भरारी घेतली. या भरारीमागील इंजिन आता थंड पडले आहे.


 स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 रोजी झाला. त्यांची आई जोआन सिम्पसन त्यावेळी एक कॉलेज विद्यार्थिनी होती. जॉब्ज यांचे वडील अब्दुलफत्ता जंदाली हे सिरियन होते. जोआन आणि अब्दुलफत्ता यांचा त्यावेळी विवाह झालेला नव्हता.

त्या विस्कळीत जोडप्याला एखादे मूल वाढवणे झेपण्यासारखे नव्हते, म्हणून जोआनने स्टीव्हला क्लारा आणि पॉल जॉब्ज यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांचेच आडनाव स्टीव्ह यांच्या नावापुढे लागले. कॅलिफोर्निया राज्यात लॉस अल्टोस येथे लहानपणीच दत्तक आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे स्टीव्हना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये रुची निर्माण झाली.

11 व्या वर्षी ‘नासा’च्या एम्स सेंटर प्रयोगशाळेत त्यांनी पहिल्यांदा कम्प्युटर पाहिला. शाळा सोडण्यापूर्वीच स्टीव्ह यांना ह्युलेट-पॅकार्ड कंपनीत उन्हाळी उमेदवारी (समर जॉब) करण्याची संधी मिळाली. अ‍ॅपलचा आणखी एक संस्थापक स्टीव्ह वॉझनियॅक याची त्यांची भेट येथेच झाली. स्टीव्ह जॉब्ज तेथून पुढे टेक्नॉलॉजी वगळता इतर कोणत्याही क्षेत्राकडे वळण्याची शक्यता नव्हती.

1972 मध्ये जॉब्ज यांनी ओरगॉन राज्यात रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण शिक्षणाचा खर्च कुटुंबीयांना परवडेना. अखेरीस अध्र्या सेमिस्टरमध्येच कॉलेजला गुडबाय केला आणि स्टीव्ह जॉब्ज त्यांच्या पिढीतील अनेक तरुणांसारखे ‘ड्रॉपआउट’ बनले.
रीड कॉलेजात असताना जॉब्ज तिथल्या हरे कृष्ण मंदिरातील मोफत जेवण घेत. कॅलिग्राफीशी संबंध याच काळात आला.


भारतात हिंदू धर्मातील अध्यात्म त्यांच्या परिचयाचे बनले. दोनच वर्षानी अनेक अमेरिकी तरुणांसारखे जॉब्जही निर्वाणाच्या शोधार्थ भारतात आले. उत्तरांचलमध्ये नीम करोली बाबांच्या आश्रमात एका मित्रासमवेत राहिले. पण येथील हवा त्यांना मानवले नाही. तरीही हिंदू धर्माऐवजी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते अमेरिकेस परतले.

‘अतारी’ या व्हिडियोगेम बनवणा-या कंपनीत जॉब्ज यांनी प्रथम नोकरी केली. 1976 मध्ये वॉझनियॅक यांच्या मदतीनं जॉब्ज यांनी अ‍ॅपल कम्प्युटरची स्थापना केली. वॉझनियॅक हे हार्डवेअर इंजिनियर होते. त्यांच्यावर कम्प्युटर असेंब्लीची जबाबदारी होती. पण तो विकून कंपनी वाढवण्याची जबाबदारी जॉब्ज यांनी घेतली. वॉझनियॅक सिनियर होते. पण त्यांनीही त्यावेळी जॉब्ज यांचे नेतृत्व मान्य केले.

या कंपनीने प्रथम अ‍ॅपल -एक कम्प्युटर बनवला. पण त्याच्यापेक्षा अ‍ॅपल- 2ने कंपनीला यश मिळवून दिले आणि दखल घ्यायला लावली. 1983 मध्ये जॉब्ज यांनी पेप्सी-कोला कंपनीचे जॉन स्कली यांना अ‍ॅपलमध्ये सीईओ म्हणून आणले.

 ‘आयुष्यभर साखरपाणी विकणार, की माझ्याबरोबर येऊन जग बदलणार,’ असा सवाल त्यांनी त्यावेळी स्कली यांना केला होता! 1983 मध्येच अ‍ॅपलने लिसा हा पहिला पर्सनल कम्प्युटर आणला. पण त्याची किंमत त्यावेळी खूपच जास्त (10 हजार डॉलर्स) होती. मात्र 1984 मध्ये अ‍ॅपलने आणलेला मॅकिंटोश हा पर्सनल कम्प्युटर तुफान लोकप्रिय ठरला.



1985 मध्ये जॉब्ज व स्कली यांच्यात मतभेद झाले व जॉब्ज यांना अ‍ॅपल सोडावी लागली. माझ्या दृष्टीने ही अत्यंत लाभदायी घडामोड होती, कारण त्यामुळे पुन्हा एकदा नवीन गोष्टींचा शोध सुरू झाला, असे जॉब्ज यांनी नंतर म्हटले. अ‍ॅपलमधून बाहेर पडल्यानंतर जॉब्ज यांनी नेक्स्ट ही कंपनी स्थापन केली. जवळपास 10 वर्षानी अ‍ॅपलनेच नेक्स्ट खरेदी केली व जॉब्ज पुन्हा मूळ कंपनीत परतले.

पण या 10 वर्षाच्या ‘अज्ञातवासात’ही जॉब्ज यांनी काही क्रांतिकारी संकल्पनांचा पाठपुरावा केला होता. एज्युकेशन सॉफ्टवेअर, इंटरनेट, कम्प्युटर जनरेटेड अ‍ॅनिमेशन या क्षेत्रांमध्ये काही महत्त्वाची उत्पादने आणली. भरमसाट किमतींमुळे ती लोकप्रिय झाली नाहीत. पण सिलिकॉन व्हॅली व टेक्नॉलॉजी वर्तुळात त्यांची चर्चा झाली.




नवीन सहस्र्काच्या सुरुवातीपासूनच जॉब्ज आणि अ‍ॅपल यांची ‘आय’ सुभेदारी सुरू झाली! कम्प्युटरच्या पलीकडे इतर उपकरणांबाबत विचार आणि संशोधन सुरू झालेच होते. 2001 मध्ये आय-पॉड, 2003 मध्ये ऑनलाइन म्युझिक स्टोअर आय-टय़ून यांनी संगीत जगतात क्रांती केली.


गेल्या वर्षी अ‍ॅपलच्या नफ्यात 68 टक्क्यांची अवाढव्य वाढ झाली. यंदा जगात सर्वाधिक उलाढाल असलेली कंपनी म्हणून अ‍ॅपलने अमेरिकेच्या एक्झॉन मोबिलला मागे टाकले. या वर्षाच्या सुरुवातीस गूगलला मागे टाकून अ‍ॅपल हा जगातील सर्वाधिक मूल्यवान ब्रँड बनला.

एका गॅरेजमध्ये 35 वर्षापूर्वी सुरू झालेल्या छोटय़ा कंपनीने अशी थक्क करणारी भरारी घेतली. या भरारीमागील इंजिन आता थंड पडले आहे. पण स्टीव्ह जॉब्ज यांच्या अनेक ‘आय’डिया आपल्याबरोबर यापुढेही अनेक वर्ष राहतील, हे नक्की!

मृत्यूची चाहूल लागली होती..


जगाचे भविष्य ओळखून गॅजेट्सची निर्मिती करणा-या स्टीव्ह जॉब्ज यांना स्वत: च्या मृत्यूचीही चाहूल लागली होती. जॉब्ज यांनी आपण लवकरच मरणार, असे आठवडाभरापूर्वीच अ‍ॅपलचे सहसंस्थापक वॉल्टर इसाक्सन यांनी लिहिलेल्या ‘आयस्टीव्ह : द बूक ऑफ जॉब्ज’ या आत्मचरित्रात म्हटले होते. हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच जॉब्ज यांनी जगाला निरोप दिला व पुस्तकात दिलेला शब्दसुद्धा खरा करून दाखवला.

शांतचित्ताने निरोप घेतला

 गेल्या सात वर्षापासून कर्करोगाशी सुरू असलेली स्टीव्हची लढाई संपली. त्यांनी शांतचित्ताने निरोप घेतला, असे जॉब्ज यांचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. जेव्हा तो हे जग सोडत होता, त्यावेळी सर्व कुटुंबीय त्याच्या भोवती होते.





ग्राहकाची प्रत्येक गरज ओळखून तयार केलेले उत्पादन व त्याचे मनमोहक डिझाईन ही "ऍपल'च्या उत्पादनांची ओळख...या सर्व उत्पादनांच्या मागचा ब्रेन होता कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज. सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या या अवलियाने गुरुवारी आपला प्रवास थांबवला...या अवलिया "संशोधका'विषयी...

स्टीव्ह पॉल जॉब्ज ऊर्फ स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. शिक्षण कॅलिफोर्नियामध्ये कुपरटिनो ज्युनिअर व होमस्टेड महाविद्यालयात झाले. पदवीनंतर 1972मध्ये पोर्टलॅंड येथील रीड कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला.

 जॉब्जने पहिल्या सेमिस्टरनंतर कॉलेज सोडले. कोकच्या बाटल्या विकून पोट भरायला सुरवात केली. या काळात मित्रांच्या खोलीवर जमिनीवर झोपणे व हरे कृष्ण मंदिरामध्ये मोफत भोजनाच्या सुविधेचा लाभ घेणे, असा त्याचा दिनक्रम होता.

1972मध्ये जॉब्ज पुन्हा कॅलिफोर्नियामध्ये परतला व व्हिडिओ गेम बनविणाऱ्या "अटारी' या कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरीला लागला. त्याने भारताला भेट दिली व बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डोक्‍यावरचे सर्व केस कापून व पारंपरिक भारतीय वेशात तो अमेरिकेला परतला. "अटारी'मध्ये आता त्याच्याकडे सर्किट बोर्ड बनविण्याचे काम होते. आर्थिक कारणावरून त्याने ही कंपनी सोडली.

'नेक्‍स्ट'ची स्थापना व विक्री
'ऍपल'मधून 1985मध्ये बाहेर पडल्यानंतर जॉब्जने 70 लाख डॉलर खर्च करून "नेक्‍स्ट कॉम्प्युटर' या कंपनीची स्थापना केली. जॉब्जने "नेक्‍स्ट क्‍यूब' या उत्पादनाच्या माध्यमातून पर्सनल ते इंटरपर्सनल कॉम्प्युटर ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.

नेक्‍स्ट मेल व नेक्‍स्ट इ-मेल या संकल्पनेचा भाग होते. जॉब्जने 1996मध्ये "वेब ऑब्जेक्‍ट्‌स' हे वेब ऍप्लिकेशन तंत्रज्ञान बाजारात आणले.


1997मध्ये ऍपलने "नेक्‍स्ट' विकत घेतली व वेब ऑबजेक्‍ट्‌सचा वापर ऍपल स्टोअर, मोबाईल मी व आय-ट्यून्समध्ये केला गेला. जॉब्जच्या नावावर अमेरिकेमध्ये 338 पेटंट दाखल आहेत. "ऍपल'च्या बाहेर असताना जॉब्ज यांनी ल्युकास फिल्मकडून पिक्‍सार हा ग्राफिक डिझायनर विभाग 1 कोटी डॉलरला विकत घेतला. "टॉय स्टोरी' या चित्रपटामुळे कंपनीला मोठे नाव मिळाले.

पुन्हा ऍपलमध्ये
"ऍपल'मध्ये 1996मध्ये पुन्हा प्रवेश झाल्यानंतर कंपनी पुन्हा फायद्यात आणण्यासाठी जॉब्जने मार्च 1998मध्ये न्यूटन, सायबरडॉग व ओपनडॉक यांसारख्या उत्पादनांची घोषणा केली. त्यानंतर ग्राहकांना उपयोगी पडतील अशा उत्पादनांचा सपाटाच जॉब्जने सुरू केला.

यात "आयपॉड' हा म्युझिक प्लेअर, आयट्यून्स व आयट्यून्स स्टोअर यांचा समावेश होता. 29 जून 2007ला ऍपलने मोबाईल फोनच्या व्यवसायात प्रवेश केला व "आयफोन' हे उत्पादन बाजारात आणले.

आजारपण व तंत्रज्ञानाची घोडदौड
जॉब्जने 2004च्या मध्यालाच आपण कॅन्सरने आजारी असल्याचे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. प्रदीर्घ आजारपणानंतर ऑगस्ट 2011मध्ये त्याने सीइओपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी जॉब्ज केवळ 1 डॉलर पगार घेत होता; मात्र त्याची संपत्ती 8.3 अब्ज डॉलर एवढी होती.

स्टे हंग्री, स्टे फूलिश!
'येणारा प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस म्हणून जगलो, तर एक दिवस त्या सगळ्या जगण्याचा अर्थ कळतो,' असं कुठेतरी वाचलं होतं. कर्करोगाचं निदान झालं तेव्हा डॉक्‍टरांनी फक्त तीन महिने शिल्लक आहेत असं सांगितलं होतं.

मात्र, शस्त्रक्रिया झाली आणि पुढे त्याचं आयुष्य वाढलं. मृत्यूचा हा स्पर्श खूप काही शिकवून गेला. आपल्या हातातला बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो; पण आपल्या मनाचा कौल ऐका, त्यापेक्षा मोठे जगात काहीही नसते. स्टे हंग्री, स्टे फूलीश!!
जॉब्जचा हा विचार सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे....

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly